Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedइंडियन असोसिएशन ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ पुणे शाखेद्वारे ऑक्युपेशनल हेल्थ डे निमित्त विशेष...

इंडियन असोसिएशन ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ पुणे शाखेद्वारे ऑक्युपेशनल हेल्थ डे निमित्त विशेष कार्यक्रम संपन्न

पुणे,14 जुलै 2025 : इंडियन असोसिएशन ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ (आयएओएच) ने नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेन्टर च्या सहकार्याने ऑक्युपेशनल हेल्थ डे (13 जुलै) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.रामी ग्रँडमध्ये झालेल्या या कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रातील कार्यरत असलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.यावर्षीची संकल्पना कनेक्टेड,कंपॅशनेट ॲन्ड इनक्लुझिव्ह : अ न्यू एरा ऑफ रेझिलियंट ॲन्ड हेल्दी वर्क प्लेसेस ही होती.

 

आयएओएच पुणेचे अध्यक्ष डॉ.अमित कुमार कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत करत उद्घाटनपर भाषण केले.त्यानंतर दीप्रज्वलन करण्यात आले आणि आयएओएचचे मानद सचिव डॉ.दीपाली खोडे यांनी यंदाच्या दिनविशेष संकल्पनेबद्दल ओळख करून दिली.याप्रसंगी डॉ.पंकज राऊत,डॉ.रोतीथोर,डॉ.सुहास कानिटकर आणि डॉ.अजय धोंगडे उपस्थित होते.

 

या कार्यक्रमात ऑक्युपेशनल हेल्थ क्षेत्रातील शैक्षणिक योगदानाबद्दल डॉ.बी.जी सहस्त्रबुध्दे यांचा सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे पहिला प्रा.डॉ.बी.जी.सहस्त्रबुध्दे ॲकेडेमिक पुरस्कार 2025 हा व्यावसायिक उत्कृष्टता आणि कार्यातील योगदानाबद्दल डॉ.एस.पी.टेंबे यांना प्रदान करण्यात आला.

 

डॉ.टेंबे यांनी आधुनिक कार्यस्थळी सहानुभूती,समावेशकता आणि लवचिकतेचे महत्त्व स्पष्ट करत एक मार्मिक बीजभाषण केले.

 

यानंतर या कार्यक्रमात तज्ञांद्वारे वैज्ञानिक सादरीकरण करण्यात आले.डॉ.गोविंद नरके यांनी पीसीएमसीमधील टीबी मुक्त कार्यस्थळ उपक्रमाबद्दल माहिती दिली,तर ऑटोमोबाईल उद्योगातील शॉप फ्लोअर कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या एर्गोनॉमिक्स कार्यक्रमांच्या परिणामकारकतेवर डॉ.पंकज राऊत यांनी मांडणी केली.

 

ऑक्युपेशनल हेल्थ क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यावसायिकांमध्ये ज्ञानाचे आदान-प्रदान,सन्मान आणि परस्परसंवादाचे हे उत्तम व्यासपीठ ठरले.

 

कार्यक्रमाचा समारोप नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे आयोजित सीएमई (कंटिन्युईंग मेडिकल एज्युकेशन) या सत्राने झाला. सीएमईमध्ये तज्ञांनी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या दुखापती आणि आजारांसाठी प्रगत उपचार आणि प्रतिबंध यासारख्या विविध महत्त्वाच्या विषयांवर सादरीकरण केले, ज्यामध्ये हाताच्या दुखापतींवर उपचार, डोकेदुखी आणि मानदुखी, मौखिक, आरोग्य जागरूकता इत्यादींचा समावेश होता. डॉ. एस.के. राऊत, डॉ. रवी स्वामीनाथन, डॉ. चंद्रशेखर रमण, डॉ. भूपेंद्र गुप्ता आणि डॉ. अक्षय राऊत यांनी सादरीकरण केले .

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments