Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedखरा इतिहास समोर आणणे ही हिंदुत्वाच्या कामाची गरज भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र...

खरा इतिहास समोर आणणे ही हिंदुत्वाच्या कामाची गरज भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माधव भंडारी यांचे मत : मंजिरी मराठे यांना सार्वजनिक काका पुरस्कार प्रदान

पुणे : देशात हिंदुत्वासाठी काम करणाऱ्याचा सत्कार करायला २०२५ साल उजाडावे लागले. धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर. ज्या प्रमाणे इतर धर्मीय धर्मांतर करतात त्याच प्रमाणे हिंदूंना धर्मांतर करवून घेण्याचा अधिकार आहे. हा आपला संविधानिक अधिकार आहे. तो कसा करू शकतो याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. धर्मांतराच्या आक्रमणामुळे भारताचे तुकडे झाले. जर आपण वेळच्या वेळी कृती केली नाही, तर हे कुठल्या दिशेने जाईल सांगता येत नाही. आजपर्यंत जो इतिहास आपल्यापर्यंत आला, तो खरा नाही. खरा इतिहास समोर आणणे ही हिंदुत्वाच्या कामाची गरज आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी व्यक्त केली

 

पुणे सार्वजनिक सभेच्या वतीने सार्वजनिक काका पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन अरण्येश्वर चौकातील सुपर्ण कार्यालय येथे करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक मुंबईच्या विश्वस्त आणि कोषाध्यक्ष मंजिरी मराठी यांना सार्वजनिक काका पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विद्याधर नारगोलकर, कार्याध्यक्ष अनिल शिदोरे, सुरेश कालेकर, धनाजी चन्ने, विजय मराठे, विमल भालेराव, सुभाष कुलकर्णी यांसह कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते. सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.

 

माधव भंडारी म्हणाले, सार्वजनिक काका आजच्या पिढीला फारसे माहिती नाहीत. पुण्याने जी वैशिष्ट्यपूर्ण नवरत्न देशाला दिली, ज्याची नोंद फारशी घेतली नाही त्यातील सार्वजनिक काका एक होते. ते लोकविलक्षण व्यक्तिमत्व होते. त्यांनी उभी केलेली संस्था १५५ वर्ष जिवंत ठेवणे हे मोठे काम आहे, हे काम जे करत आहेत त्यांचे अभिनंदन. संस्था अशीच पुढे टिकून राहण्यासाठी सगळ्यांनी मदत करायला पाहिजे.

 

ते पुढे म्हणाले, आपण हिंदू आहोत याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. समाज समर्थ आणि एकसंध म्हणून उभा राहील यासाठी सगळ्यांनी काम करायला पाहिजे. सावरकरांपासून हेगडेवार यांच्यापर्यंत ज्यांनी हिंदुत्वासाठी आयुष्य खर्च केले, त्यांच्या परिश्रमाच्या जीवावर आपण इथपर्यंत आलो. भारतातील हिंदुत्वाचा विचार मांडणारे पहिले व्यक्ती अटल बिहारी वाजपेयी होते. त्यांच्यामुळेच इथून पुढे जाण्यासाठी वाट प्रशस्त आहे.

 

मंजिरी मराठे म्हणाल्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार कालातीत आहेत. आज त्यांचे विचार प्रत्येक ठिकाणी आहेत. संन्यस्त खड्ग नाटक पुण्यात थांबविण्यात आले. अहिंसेचा अतिरेक चुकीचा आहे. व्यक्तिगत हा विचार चालेल, परंतु राष्ट्राची हानी होणार असेल तर अहिंसेचा अतिरेक उपयोगाचा नाही. तिथे तलवारच उचलावी लागते, असे सावरकर म्हणत. पहलगाम हल्ल्यात २६ जण मारले गेले. त्यावेळी प्रत्येक जण पेटून उठलो. आपण लढण्यासाठी तयार नव्हतो. त्यामुळे तो हल्ला झाला. आपण लढण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आज प्रत्येकाने रायफल प्रशिक्षण घेतले पाहिजे, असेही त्यांनी सांगितलें

 

मी मराठी, मी गुजराती यासोबतच सध्या हिंदी भाषा वाद सुरू आहे. हिंदी आपली भाषा भगिनी आहे, ती आपली संपर्क भाषा आहे, त्यामुळे ती आपल्याला यायला हवी. आपल्याला भाषा, प्रांत, धर्म यावर विभागणी नको. आपण एकत्र आलो नाही तर आपले अस्तित्व टिकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

 

त्या पुढे म्हणाल्या, आज हिंदुत्ववादी सरकार आहे, म्हणून आपले अस्तित्व आहे. जेव्हा हिंदुत्ववादी सरकार नसेल तर आपले शेवटचे क्षण असतील. आज जर काँग्रेसकडे सत्ता गेली तर आपली काही वर्ष शिल्लक राहतील. आत्मनिर्भर भारतासाठी आपले योगदान आपण देऊ शकतो. स्वदेशीचा पुरस्कार आपण केला पाहिजे. हे सावरकरांचे विचार आहेत, परंतु आपल्याला ते जाणून घ्यायचे नाहीत, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

अनिल शिदोरे म्हणाले, समाजामध्ये वेगळे काम करून समाजाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार देऊन त्यांना समाजासमोर आणण्याचे काम पुरस्काराच्या माध्यमातून केले जाते. सार्वजनकीक सभेची स्थापना १५५ वर्षे झाली आहेत. सामाजिक प्रश्नाला व्यासपीठ देण्यासाठी सार्वजनिक सभेची स्थापना झाली. आज ही सभेचे काम सुरू आहे. कोरोना काळात लसीकरण, रमाबाई रानडे पुरस्कार, शिक्षकांचा सन्मान, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अशी कामे सार्वजनिक सभेच्या माध्यमातून केली जातात, असेही त्यांनी सांगितले. विद्याधर नारगोलकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. विजय मराठे यांनी आभार

मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments