पुणे,16 जुलै 2025 : पीबीएमएच्या एच व्ही देसाई आय हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालिका डॉ.सुचेता कुलकर्णी यांना अहमदाबाद येथे पार पडलेल्या व्हिजन 2020 या राष्ट्रीय परिषदेत वुमन लीड फॉर आय केअर या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.नेत्रसेवा आणि नेत्रशिक्षण क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन व उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत हा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सह सचिव विनय नेहरा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. ब्लाईंड पीपल्स असोसिएशनचे उपसंचालक डॉ.धर्मेंद्र कुमार जेना,सहसचिव डॉ.भूषण पुनानी आणि व्हिजन 2020 परिषदेचे अध्यक्ष डॉ.राजेश सैनी आदी मान्यवर उपस्थित होते.
व्हिजन 2020 : द राईट टू साईट इंडिया ही राष्ट्रीय परिषद ब्लाईंड पीपल्स असोसिएशन या 1954 पासून कार्यरत असलेल्या संस्थेतर्फे आयोजित केली जाते. परिषदेचे हे 19 वे सत्र होते व यामध्ये नेत्रचिकित्सेशी संदर्भात विविध वैज्ञानिक सत्रात भारतभरातून नेत्रचिकित्सक सहभागी झाले होते
.


