Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedयोकोगावा इंडिया तर्फे पुण्यात ॲडव्हान्स्ड एएक्सजी फ्लोमीटरची पहिली डिलिव्हरी

योकोगावा इंडिया तर्फे पुण्यात ॲडव्हान्स्ड एएक्सजी फ्लोमीटरची पहिली डिलिव्हरी

पुणे,16 जुलै 2025 : इंडस्ट्रीयल ऑटोमेशन आणि प्रोसेस कंट्रोल क्षेत्रात आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या योकोगावा इंडिया लि.(वायआयएल) ने महाराष्ट्रात नेक्स्ट जनरेशन एएक्सजी मॅग्नेटिक फ्लोमीटरच्या पहिल्या डिलिव्हरीसह एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

 

ही डिलिव्हरी योकोगावाची संपूर्ण उपकंपनी असलेल्या ॲडेप्ट फ्लुडाईन प्रा.लि.तर्फे करण्यात आली असून भारतातील झपाट्याने विकसित होणाऱ्या औद्योगिक क्षेत्राला जागतिक दर्जाच्या इंस्ट्रुमेंटेशन सोल्युशन्स पुरविण्याची आणि स्थानिक पातळीवर आपली उपस्थिती अधिक दृढ करण्याप्रती कंपनीची कटिबद्धता दर्शविते. हा महत्त्वाचा टप्पा योकोगावाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या उपस्थितीत ॲडेप्टच्या पुण्यातील सुविधेमध्ये एका कार्यक्रमाच्या माध्यमातून नुकताच साजरा करण्यात आला.याप्रसंगी योकोगावा इंडिया लि.चे. संचालक कात्सुया इकेजावा,योकोगावा मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशनचे अध्यक्ष हिरोशी नागाई,योकोगावा प्रॉडक्टस मुख्यालयाचे प्रमुख,सीटीओे, कार्यकारी संचालक व वरिष्ठ उपाध्यक्ष हिरोशी तानोगुची, ॲडेप्ट फ्लुडाईन प्रा.लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक गद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

1983 साली सुरू झालेली आणि आता योकोगावाची संपूर्ण उपकंपनी असलेल्या ॲडेप्ट फ्लुडाईनला फ्लो तंत्रज्ञानात तीन दशकांहून अधिक असा समृध्द वारसा आहे.जल,सांडपाणी आणि औद्योगिक प्रक्रिया अशा महत्त्वाच्या क्षेत्रात 70,000 हून अधिक मॅग्नेटिक व अल्ट्रासोनिक फ्लोमीटर्स आजवर कंपनीने पुरविले असून मेजरमेंट क्षेत्रातील अभिनवतेच्या अग्रस्थानी आहे.2010 साली अल्ट्रा फ्लोमीटर्स सादर केल्यानंतर आयओटी गेटवेज,स्मार्ट वॉटर मीटर्स आणि फ्लोमीटर कॅलिब्रेशन या सेवा आपल्या सेवा संचामध्ये समाविष्ट केल्या असून विस्तार केला आहे.भारतभरात मजबूत विक्रीजाळे आणि 25 हून अधिक देशांमध्ये निर्यात करत ॲडेप्टने योकोगावाच्या परिसंस्थेमध्ये आपले एकत्रीकरण केले असून स्मार्ट,व्यापक व जागतिक दर्जाचे विश्वासार्ह सोल्युशन्स पुरविण्याची समूहाची क्षमता अधिक वाढवली आहे.

 

योकोगावा इंडिया लि.चे. संचालक कात्सुया इकेजावा म्हणाले की, हा टप्पा म्हणजे केवळ उत्पादन पुरवठा नसून योकोगावाच्या मेक इन इंडियाच्या वचनबध्दतेचे आणि क्षमतांवरील आमच्या विश्वासाचे प्रतीक आहे. एएक्सजी फ्लोमीटर अचूकता,मजबूती आणि स्मार्ट डायग्नोस्टिक्समध्ये एक मापदंड प्रस्थापित करते,जे भारताच्या औद्योगिक भविष्यासाठी पूर्णपणे उपयुक्त आहे.

 

योकोगावा प्रॉडक्टस मुख्यालयाचे प्रमुख,सीटीओे, कार्यकारी संचालक व वरिष्ठ उपाध्यक्ष हिरोशी तानोगुची म्हणाले की, भारतातील प्रमुख औद्योगिक क्षेत्रांमध्ये आमचे एएक्सजी सारखे ॲडव्हान्स्ड सोल्युशन्स स्विकारले जात आहेत,याचा आम्हाला आनंद आहे. ही डिलिव्हरी मजबूत तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि ग्राहकांची विश्वासार्हता दर्शविते.

 

योकोगावा मॅन्युफॅक्चरींग कॉर्पोरेशनचे अध्यक्ष हिरोशी नागाई म्हणाले की,आमचे फ्लोमीटर्स हे योकोगावाच्या जागतिक दर्जाच्या गुणवत्ता आणि उत्पादन प्रक्रियांच्या मापदंडांचा पुरावा आहे.डिझाईन ते उत्पादन,प्रत्येक युनिट अभियांत्रिकी उत्कृष्टताप्रती असलेली आमची कटिबध्दता दर्शवत अचूकता,विश्वासार्हता आणि दीर्घकालीन शाश्वतता साध्य करते.आमचे जागतिक दर्जाचे उत्पादन भारतातील औद्योगिक नवोपक्रमाला समर्थन देताना बघणे अत्यंत आनंददायी आहे.

 

ॲडेप्ट फ्लुडाईन प्रा.लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक गद्रे म्हणाले की, हा सोहळा केवळ यशस्वी पुरवठ्यासाठी नव्हता तर फ्लो उद्योगातील वारसा आणि भविष्य साजरा करणारा होता.योकोगावाबरोबर एकत्रितपणे आम्ही अधिक मजबूत,व्यापक व इंटेलिजंट फ्लो सोल्युशन्स प्रदान करण्यासाठी सज्ज आहोत.

 

या सोहळ्यात औद्योगिक व्यावसायिक,तंत्रज्ञान नेतृत्व आणि सर्व महत्त्वाचे भागीदार

उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments