Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedदेश-विदेशी पर्यटकांना शहरातही मिळणार टुरीस्ट होम

देश-विदेशी पर्यटकांना शहरातही मिळणार टुरीस्ट होम

पुणे दि. 17 : देश-विदेशातील पर्यटकांच्या निवास व्यवस्थेकरीता टुरीस्ट होम, होम स्टे, पर्यटन व्हिला, पर्यटक अपार्टमेंट या योजनेच्या माध्यमातून व्यवसायाची संधी पर्यटन संचालनालय पुणे विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक तसेच पर्यटक व्यावसायिकांनी नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे विभागाच्या प्र. उपसंचालक शमा पवार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

 

या योजनेमुळे देश-विदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांना शहरातील जीवनशैली, संस्कृती अणि परंपरा जवळून अनुभवता येणार आहे. तसेच स्थानिक स्वयंपाक, मराठमोळे पाहुणचार व कुटुंबातील गप्पा गोष्टींमुळे पर्यटकांचा प्रवास अधिक संस्मरणीय होईल. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. 8080035134 यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments