पुणे, 18 जुलै 2025 – भारतातील आघाडीचे फॅशन, लाइफस्टाईल आणि गिफ्टिंग डेस्टिनेशन असलेल्या शॉपर्स स्टॉपने एका ग्राहकाच्या लग्न खरेदीचा प्रवास अविस्मरणीय अनुभवात रूपांतरित केला आहे. त्यांच्या अत्यंत यशस्वी ठरलेल्या ‘इंडिया वेड्स’ अभियानाअंतर्गत शॉपर्स स्टॉपने पुण्यातील श्री. अर्जुन चव्हाण यांना युरोप सफरीच्या स्वप्नवत व्हेकेशनसाठी लकी विनर म्हणून घोषित केले.
शॉपर्स स्टॉप, फिनिक्स मार्केटसिटी, पुणे येथे झालेला सत्कार समारंभ हा अत्यंत खास आणि विचारपूर्वक आयोजित करण्यात आला होता. अर्जुन यां चा शॉपर्स स्टॉपसोबतचा हा महत्वाचा टप्पा मोठ्या उत्साहात आणि स्टाइलमध्ये साजरा करण्यात आला. फुलांची सजावट आणि रेड कार्पेटवर स्वागत झाल्यानंतर, हा क्षण खास करण्यासाठी फोटो झोन, केक कटिंग आणि भव्य चेकचे अनावरण यासारख्या आकर्षक गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. या क्षणाने केवळ आठवणी निर्माण केल्या नाहीत, तर शॉपर्स स्टॉप आपल्या ग्राहकांचे खास प्रसंग किती विचारपूर्वक साजरे करते, याचेही उत्तम उदाहरण ठरले. हा संपूर्ण अनुभव ‘इंडिया वेड्स’ अभियानाच्या गाभ्याशी पूर्णपणे सुसंगत होता. हा उपक्रम शॉपर्स स्टॉपला भारतातल्या लग्नाच्या खरेदीसाठी प्रमुख प्रीमियम ठिकाण म्हणून अधोरेखित करतो. हळदीपासून ते रिसेप्शनपर्यंत, ही मोहीम दाखवते की शॉपर्स स्टॉप आपल्या ग्राहकांच्या लग्नाच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या सोबत असते, आणि फॅशन, ब्युटी व गिफ्टिंगचे खास पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते.
शॉपर्स स्टॉपचे कस्टमर केअर असोसिएट आणि चीफ मार्केटिंग ऑफिसर श्री. जितेन महेंद्र म्हणाले, “शॉपर्स स्टॉपमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांसोबत साजरे होणारे प्रत्येक क्षण मनापासून जपतो. ‘इंडिया वेड्स विथ शॉपर्स स्टॉप’या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला आमच्या ग्राहकांचे आभार मानण्याची ही आनंददायी संधी मिळाली आहे, जिथे आम्ही त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने अविस्मरणीय अनुभव तयार करत आहोत. या हंगामात ग्राहकांनी दाखवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे आम्हाला लग्न खरेदीचा अनुभव नव्याने मांडता आला, आणि त्यांच्या अपेक्षांपेक्षा अधिक काही देण्याची प्रेरणा मिळाली, ज्यात युरोपच्या स्वप्नवत सहलीचाही समावेश आहे. ही आमच्या कृतज्ञतेची एक खास भेट आहे.”
500 हून अधिक प्रीमियम ब्रँड्स, वैयक्तिक शॉपिंग सल्लागार सेवा आणि ‘फर्स्ट सिटिझन क्लब’मार्फत मिळणारे लॉयल्टी बेनिफिट्स यांच्या जोरावर शॉपर्स स्टॉप भारतीय रिटेल क्षेत्रातील खरेदीचा दर्जा उंचावणारा अनुभव सातत्याने देत आहे.
पुण्यातील हा सत्कार सोहळा ‘इंडिया वेड्स विथ शॉपर्स स्टॉप’ अभिनायातील विजेत्यांच्या देशव्यापी सन्मानमालिकेचा एक भाग आहे. हैदराबाद आणि बेंगळुरूमध्येही अशाच प्रकारचे खास क्षण नियोजित आहे
त.


