Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedदुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु होणार

दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु होणार

पुणे दि. 18 : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे या कार्यालयांतर्गत नवीन दुचाकी वाहन प्रकाराची एम. एच 12 वायजे ही नोंदणी क्रमांकाची मालिका 19 जुलै पासून सुरू होत आहे. या मालिकेतील पसंतीचे नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्याची फेसलेस सेवा 19 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून होणार आहे. कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने पसंती क्रमांक शुल्क स्वीकारले जाणार नाही याची नोंद नागरिकांनी घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

 

फेसलेस स्वरुपाची सुविधा वापरण्यासाठी आधार लिंक मोबाईल क्रमांकाचा वापर करुन किंवा मोबाईल ओटीपी घेऊन https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन नोंदणी क्रमांक आरक्षीत करता येणार आहे. वैयक्तिक मालकीच्या नावे असलेल्या वाहनांव्यतिरिक्त, इतर प्रकारच्या वाहनांना आकर्षक नोंदणी क्रमांक कार्यालयामार्फत जारी करण्यात येतील.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments