Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedहंगामा ओटीटीची नवीन मालिका 'रोज गार्डन' ने लॉयल्टी टेस्टपासून ते मर्डर मिस्ट्रीपर्यंतच्या...

हंगामा ओटीटीची नवीन मालिका ‘रोज गार्डन’ ने लॉयल्टी टेस्टपासून ते मर्डर मिस्ट्रीपर्यंतच्या थ्रिलरसाठी नवीन अर्थ प्रस्थापित केले आहेत.

आकांक्षा पुरी, नियती फतनानी, मानिनी डे आणि नील समर्थ अभिनीत ही सिरीजचे हंगामा ओटीटीवर स्ट्रीमिंग झाले आहे.

देशातील अग्रगण्य डिजिटल एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या हंगामा ओटीटीने १७ जुलै २०२५ रोजी आपली नवीन ओरिजिनल सिरीज ‘रोज गार्डन’ लाँच केली. ही एक क्राईम थ्रिलर सिरीज असून, यात रहस्य, रोमान्स आणि भावनिक गुंतागुंत कथेमध्ये गुंफलेली आहे. जबरदस्त सीन्स, धक्कादायक ट्विस्ट आणि उत्कृष्ट अभिनयाने नटलेल्या या सिरीजमध्ये आकांक्षा पुरी, नियती फतनानी, मानिनी डे आणि नील समर्थ प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.

या सिरीजची कथा पंजाबमधील एका शांत गावाभोवती फिरते. ‘रोज गार्डन’ ही सिरीज दोन सुंदर बहिणी आणि त्यांच्या आईच्या रहस्यमय जीवनावर आधारित आहे. ज्यांच्या भयानक भूतकाळाची सावली त्यांच्या वर्तमानावरही पडू लागते. आई आपल्या मुलींना दोन गोष्टी शिकवते. या परिसरातील सर्वात सुंदर गुलाबांच्या बागेची काळजी कशी घ्यावी आणि प्रेम व्यक्त करणाऱ्या पुरुषांच्या निष्ठेची परीक्षा घेण्यासाठी एक धोकादायक खेळ कसा खेळायचा. जेव्हा एक बहीण प्रेमात पडते, तेव्हा एका बेपत्ता व्यक्तीच्या प्रकरणामुळे पोलीस गावात येतात आणि त्यानंतर अशा अनेक गोष्टींचा उलगडा होतो, ज्यामुळे सर्वकाही उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण होते.

हंगामा डिजिटल मीडियाचे सीईओ सिद्धार्थ रॉय यांनी या सिरीजच्या लॉन्चबद्दल बोलताना सांगितले, “रोज गार्डन ही एक भावनिक आणि रंजक कथा आहे जी प्रेम, कुटुंब आणि लपलेली सत्ये उलगडते. ही हळूहळू उलगडणारी रहस्यमय कथा आहे जी तुम्हाला पहिल्या दृश्यापासूनच खिळवून ठेवते आणि शेवटपर्यंत काय होईल याचा अंदाज लावायला लावते. दमदार अभिनय आणि उत्कृष्ट कथेमुळे, ही अशी सिरीज आहे जी संपल्यानंतरही तुमच्या मनात दीर्घकाळ घर करून राहते.”

या सिरीजमध्ये ‘गीत’ची भूमिका साकारणाऱ्या आकांक्षा पुरी म्हणाल्या, “गीतची भूमिका साकारल्याने मला माझ्यातील दमदार आणि निडर कलाकाराला जाणून घेण्याची संधी मिळाली. हे फक्त कथेसोबत पुढे जाणारे पात्र नाही, तर ती वादळासारखी कथेत येते आणि याच कारणामुळे ही भूमिका साकारणे खूप थरारक होते. तिचे जग पडद्यावर आणणे म्हणजे अशा गोष्टींशी जोडले जाणे ज्याचा मी नेहमीच खूप आनंद घेतला आहे. कारपासून ते ट्रक आणि ट्रॅक्टरपर्यंत मी सर्व काही चालवले आहे आणि म्हणूनच ‘रोज गार्डन’मधील माझे स्वतःचे सीन्स करणे केवळ रोमांचकच नव्हे तर सशक्त करणारे होते.”

या सिरीजमध्ये सिमरनची भूमिका साकारणाऱ्या नियती फतनानी यांनी सांगितले, “सिमरन दिसायला गोड वाटत असली तरी तिच्या भूमिकेत एक वेगळेपण आहे. तिचे मन नेहमी गणिते किंवा विचारांमध्ये गुंतलेले असते, जे तिच्या आकर्षक चेहऱ्यामुळे लगेच लक्षात येत नाही. ती नेहमी एक पाऊल पुढे विचार करते, प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलते. सिमरनने मला तिच्या विचारांमुळे आकर्षित केले, ती आपल्या कमकुवतपणाचा एक रणनीती म्हणून उपयोग करते. या भूमिकेला साकारणे म्हणजे गोष्टींमध्ये फेरफार करण्याची, इच्छांवर आणि गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याची इच्छा असलेल्या पात्राला सादर करणे होते.’रोज गार्डन’ ही चेकमेट आणि सत्ता मिळवण्याच्या संघर्षाची कथा आहे आणि सिमरनला जिंकण्यासाठी कसे खेळायचे हे चांगलेच माहिती आहे.”

मालिकेत आईची भूमिका साकारणाऱ्या मानिनी डे म्हणाल्या, “ही केवळ एका आईची कथा नाही, तर एका अशा महिलेची कथा आहे जिने विश्वासघात, गोष्टी गमावणे आणि भीती अनुभवली आहे – आणि यातून जगण्याचे महत्त्वाचे धडे घेतले आहेत. कथेची सुरुवात हरलीन कौरपासून होते; तिच्या निर्णयांवरूनच कथेची पुढील दिशा ठरते. ती प्रेमाची एक खूप वेगळी व्याख्या शिकवते आणि या विरोधाभासी पात्राला सादर करणे वेदनादायक तसेच मनोरंजकही होते. तिचा प्रत्येक निर्णय भूतकाळातील वेदनेने भरलेला असतो. मला वाटते की अनेक प्रेक्षक, विशेषतः महिला, तिला पाहून खोल संघर्ष अनुभवतील आणि म्हणूनच शूटिंग संपल्यानंतरही हे पात्र माझ्यासोबत दीर्घकाळ राहिले.”

सिरीजमध्ये एक महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या नील समर्थ यांनी सांगितले, “सुरुवातीला माझे पात्र एका स्वप्नवत जगात प्रवेश करते.दोन सुंदर बहिणी, एक शांत गाव आणि एक मनमोहक गुलाबाचे गार्डन. पण लवकरच हे सुखद दृश्य एका भयावह गोष्टीत बदलते. या भूमिकेसाठी संयम, भावनिक खोली आणि सततचा तणाव यांचा काळजीपूर्वक समतोल राखणे आवश्यक होते. ‘रोज गार्डन’ रूढीवादी विचारांना आव्हान देते. ती विश्वास, फसवणूक आणि प्रेमाचा खरा अर्थ प्रेक्षकांसमोर आणते आणि त्याच्या सीमांनाही पुढे नेण्याचे काम करते. यामुळेच हा अनुभव खूप आकर्षक ठरला.”

अप्रतिम दृश्ये आणि भावनिक चढ-उतारांनी भरलेली ‘रोज गार्डन’ सिरीज प्रेक्षकांना प्रेम, निष्ठा आणि रहस्याबद्दल अनेक प्रश्नांच्या गर्तेत उभे करते. ही सस्पेन्सने भरलेली क्राईम थ्रिलर आजच हंगामा ओटीटी आणि टाटा प्ले बिंज, वॉचो, बीएसएनएल, प्लेबॉक्स टीव्ही, रेलवायर ब्रॉडबँड, एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले आणि डोर टीव्ही यांसारख्या इतर पार्टनर प्लॅटफॉर्मवर नक्की

पहा.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments