Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedदेशभरात भव्य जनजागृती मोहीम आणि कर्ज वितरण याद्वारे शेतकऱ्यांना सक्षम बनवत राष्ट्रीय...

देशभरात भव्य जनजागृती मोहीम आणि कर्ज वितरण याद्वारे शेतकऱ्यांना सक्षम बनवत राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात पोहोचून बँक ऑफ इंडियातर्फे किसान माह आणि किसान दिवस साजरा

मुंबई, 19 जुलै 2025: भारतातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ इंडियाने संपूर्ण जुलै महिना किसान माह म्हणून आणि 19 जुलै 2025 रोजी किसान दिवस म्हणून साजरा केला. हा उपक्रम बँकेच्या राष्ट्रीयीकरण दिनानिमित्त होता तसेच भारतीय कृषी आणि शेतकरी समुदायाच्या महत्त्वपूर्णतेचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा इत्यादी राज्यांमध्ये आणि बँकेच्या इतर प्रमुख विभागांमध्ये भारतभरात मेगा आऊटरीच कार्यक्रम राबवला. या ऐतिहासिक उपक्रमात व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रजनीश कर्नाटक तसेच कार्यकारी संचालक श्री. पी. आर. राजगोपाल, श्री. राजीव मिश्रा आणि श्री. सुब्रत कुमार उपस्थित होते. त्यांच्यासोबत मुख्य महाव्यवस्थापक आणि महाव्यवस्थापक हे देखील उपस्थित होते. कृषी क्षेत्रातील प्रगती आणि ग्रामीण सामाजिक-आर्थिक विकासासाठी असलेली बँकेची दृढ वचनबद्धता त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.

 

 

 

19 जुलै ते 25 जुलै 2025 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या आऊटरीच मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांसोबत संवाद सत्र, कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण, आर्थिक समावेशनासाठी जनजागृती उपक्रम तसेच शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासकीय योजनांचे प्रसार यांचा समावेश आहे. या मेगा आऊटरीच उपक्रमाद्वारे बँक ऑफ इंडियाचे कृषी क्षेत्राशी आपले संबंध अधिक दृढ करणे, शेतकऱ्यांच्या बदलत्या गरजांची समज वाढवणे आणि नाविन्यपूर्ण व शेतकऱ्यांसाठी सानुकूलित बँकिंग उत्पादने आणि सेवा-सुविधा विस्तारणे हे ध्येय आहे.

 

 

 

या उपक्रमात कृषी आणि संबंधित विविध उपक्रियांचा विशेष समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड (KCC) वितरण, स्वयं-सहायता गट (SHG), दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय यांसारख्या क्षेत्रांना प्राधान्य, तसेच ट्रॅक्टर व अन्य कृषी अवजारे यांसाठी वित्तीय सहाय्य यांचा समावेश आहे. जोडीला बँक थंड साठवण सुविधा, गोदामांची पायाभूत सुविधा आणि राइस मिल, पल्स मिल यांसारख्या कृषी अन्न प्रक्रिया युनिट्ससाठीही कर्ज उपलब्ध करून देत आहे. हे सर्व उपक्रम शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार, उत्पादनक्षमता वाढवणे आणि मूल्यवर्धनाला चालना देण्याच्या उद्देशाने राबवले जात आहेत.

 

 

 

या काळात बँक ऑफ इंडियाकडून डिजिटल बँकिंग विषयक परिसंवाद, आर्थिक साक्षरता शिबिरे, कृषी वित्तीय सेवा देणारी अॅग्री क्लिनिक्स तसेच किसान क्रेडिट कार्ड (KCC), आत्मनिर्भर भारत योजना आणि इतर सरकारी योजनांतील लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबवण्यात येणार आहेत.

 

 

 

बँक ऑफ इंडिया देशातील शेतकऱ्यांप्रती आपली निष्ठा अधोरेखित करत असून कृषी विकास व ग्रामीण समृद्धीसाठी आपली सक्रीय भूमिका भविष्यातही सुरू ठेवण्याचे आश्वासन देत आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments