Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई क्रेटा - दशकभराचा विश्वास, नाविन्‍यता आणि निर्विवाद नेतृत्‍व

ह्युंदाई क्रेटा – दशकभराचा विश्वास, नाविन्‍यता आणि निर्विवाद नेतृत्‍व

गुरूग्राम, जुलै २१, २०२५: अभिमान, वारसा आणि भावनेने भरलेल्या क्षणी ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएआयएल) भारतात ह्युंदाई क्रेटाची १० गौरवशाली वर्षे साजरी करत आहे. जुलै २०१५ मध्ये एचएआयएलने ही कार लाँच करत मध्‍यम आकाराच्‍या एसयूव्‍ही सेगमेंटमध्ये धाडसी पाऊल टाकले. ही कार आज भारतातील १.२ दशलक्ष कुटुंबांमध्‍ये क्षमता, शैली आणि महत्त्वाकांक्षेचे प्रतीक बनली आहे.

 

लाँच झाल्‍यापासून ह्युंदाई क्रेटा अद्भुत कार राहिली आहे. या कारचा प्रभाव इतका आहे की मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटला आता देशात “क्रेटा सेगमेंट” म्हणून संबोधले जाते. वाढत्या स्पर्धेनंतरही ह्युंदाई क्रेटा आघाडीवर आहे आणि २०१५ मध्ये लाँच झाल्यापासून दरवर्षी देशात निर्विवाद पहिले स्थान कायम ठेवले आहे.

 

या महत्त्वपूर्ण टप्‍प्‍याबाबत मत व्‍यक्‍त करत ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. उन्‍सू किम म्‍हणाले, “ह्युंदाई क्रेटाचा प्रवास फक्‍त आमच्यासाठीच नाही तर प्रत्येक ग्राहकासाठी भावनिक आहे, ज्यांनी या कारला आपल्या जीवनाचा भाग बनवले आहे. ही कार स्‍वप्‍ने, स्‍वावलंबीत्व व प्रगतीचे प्रतीक आहे. क्रेटा सर्वोत्तम असण्‍यासोबत एसयूव्‍ही सेगमेंटमध्‍ये क्रांती घडवून आणत आहे. गेल्या १० वर्षांत, ही कार भारतीय एसयूव्ही खरेदीदारांसाठी सुवर्ण मानक बनली आहे. क्रेटाच्या प्रवासातील प्रत्येक टप्‍प्‍यामधून नाविन्‍यता, दर्जा आणि ग्राहक-केंद्रित विचारसरणीप्रती ह्युंदाईची कटिबद्धता दिसून येते. भारतात क्रेटाला १० वर्षे पूर्ण होत असताना आम्ही एक चळवळ साजरी करतो, जिने भारतात एसयूव्ही चालवण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणला. ग्राहकांनी आमच्‍यावर दाखवलेल्या प्रेम, विश्वास आणि निष्ठेमुळे आम्हाला खूप आनंद होत आहे, तसेच आम्‍ही दर्जा उंचावण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.”

 

क्रेटाच्‍या १० वर्षांच्‍या यशाबाबत मत व्‍यक्‍त करत ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे पूर्ण-वेळ संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. तरूण गर्ग म्‍हणाले, “ह्युंदाई क्रेटा मॉडेलपेक्षा अधिक असून उत्‍साही वारसा आहे, जी बारकाईने डिझाइन करण्‍यात आली आहे, तंत्रज्ञानासह विकसित झाली आहे आणि लाखो ग्राहकांची या कारला पसंती आहे, ज्‍यांनी ही कार खरेदी केली आहे. ह्युंदाई क्रेटामधून महत्त्वाकांक्षा, प्रगती आणि विश्वास दिसून येतो. भारतीयांच्‍या एसयूव्‍हीसंदर्भात महत्त्वाकांक्षा वाढण्‍यासह क्रेटामध्‍ये देखील मोठी सुधारणा करण्‍यात आली आणि मी ठामपणे सांगू शकतो की, ही कार त्‍यांच्‍या महत्त्वाकांक्षांच्‍या पुढे गेली आहे. २०१५ मध्‍ये फक्‍त २ मॉडेल्‍सवरून आज १२ मॉडेल्‍सपर्यंत मध्यम-एसयूव्‍ही विभाग अत्‍यंत स्पर्धात्मक बनला आहे, तरीही ह्युंदाई क्रेटाने निर्माण केलेल्या श्रेणीचे नेतृत्व, वाढ करणे आणि श्रेणीला नव्‍या उंचीवर नेणे सुरूच ठेवले आहे. आज, आम्‍ही दशकभरातील नाविन्‍यता, नेतृत्व आणि ग्राहकांच्या अतूट विश्वासााला उजाळा देत असताना ह्युंदाईने स्मार्ट, शाश्वत आणि मानवतेने प्रेरित गतिशीलता प्रदान करण्याची आपली कटिबद्धता अधिक दृढ केली आहे.”

 

ह्युंदाई क्रेटाची आकडेवारी – निर्विवाद, अनोख्या नेतृत्‍वाचा प्रवास

 

· लाँच झाल्यापासून क्रेटाची वार्षिक विक्री दुप्पट झाली आहे (कॅलेंडर वर्ष २०१६ मध्ये ९२,९२६ युनिट्सवरून २०२४ मध्‍ये १८६,९१९ युनिट्स), ज्यामुळे मागणी आणि महत्त्वाकांक्षेमध्ये नवीन मापदंड स्थापित झाले आहेत.

 

· भारतात १.२ दशलक्षहून अधिक क्रेटांची विक्री झाली आहे, जी मध्यम आकाराच्या एसयूव्‍ही क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी आहे.

 

· भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योगात ३१ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मार्केट शेअरसह क्रेटा मध्यम आकाराच्या एसयूव्‍ही विभागात अग्रस्‍थानी आहे.

 

· सनरूफ असलेल्या व्‍हेरिएण्‍ट्सचा क्रेटाच्‍या विक्रीत सुमारे ७० टक्‍के वाटा आहे. (जानेवारी-जून २०२५)

 

· कॅलेंडर वर्ष २०२५ मध्ये (जानेवारी-जून), ह्युंदाई क्रेटा भारतातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्‍ही आहे आणि या वर्षीच्या ६ पैकी ३ महिन्यांत सर्व श्रेणींमध्ये सर्वाधिक विक्री होणारी मॉडेल ठरली आहे.

 

· ह्युंदाई क्रेटामध्ये पहिल्यांदाच कार खरेदी करणाऱ्यांचे योगदान २०२० मध्ये १२ टक्‍क्‍यांवरून २०२४ मध्ये २९ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे.

 

· पेट्रोल, डिझेल, टर्बो आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध असलेली ह्युंदाई क्रेटा मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन या दोन्‍ही पर्यायांमध्‍ये येते.

 

· मेड-इन-इंडिया क्रेटा १३ हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाते आणि आतापर्यंत, एचएमआयएलने २.८७ लाखांहून अधिक युनिट्स निर्यात केले आहेत.

 

आता दुसरी पिढी असलेल्‍या ह्युंदाई क्रेटाने आपला दर्जा उंचावला आहे, जेथे यशस्‍वी मॉडेलवरून भारतातील एसयूव्‍ही क्षेत्रात आयकॉन बनली आहे. गेल्‍या दशकभरात ह्युंदाई क्रेटाचा प्रवास नवीन व्‍हेरिएण्‍ट्सच्‍या लाँचसह, तसेच आधुनिक काळातील ग्राहकांच्‍या बदलत्‍या प्राधान्‍यक्रमांशी जुळून जाण्‍याकरिता निरंतर क्रांती घडवून आणत उंचावला आहे. अग्रस्‍थानी राहण्‍याप्रती कटिबद्धतेसह ह्युंदाईने सतत क्रेटाची वैशिष्‍ट्ये, पॉवरट्रेन, ट्रान्‍समिशन आणि तंत्रज्ञानामध्‍ये अर्थपूर्ण अपडेट्स केले आहेत. नियमितपणे अपग्रेड्स करण्‍यासोबत ह्युंदाईने दोन विशेष एडिशन्‍स लाँच केले – नाइट एडिशन आणि अॅडव्‍हेंचर एडिशन. प्रत्‍येक एडिशन बारकाईने डिझाइन करण्‍यात आले आहे, ज्‍यामधून वैविध्‍यपूर्ण जीवनशैली आणि महत्त्वाकांक्षा दिसून येते, ज्‍यामुळे हे एडिशन्‍स अधिकाधिक ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. दोन्‍ही स्‍पेशल एडिशन्‍सनी यशोगाथा सिद्ध केल्‍या, ग्राहकांच्‍या महत्त्वाकांक्षांची पूर्तता केली आणि क्रेटाची वैविध्‍यता व आकर्षकता दृढ केली. वर्षानुवर्षे ह्युंदाई क्रेटाने आपला दर्जा उंचावला आहे. फक्‍त एसयूव्‍ही न राहता भावना, महत्त्वाकांक्षेची प्रतीक बनली आहे, जी प्रत्‍येक एसयूव्‍हीप्रेमींशी सखोलपणे संलग्‍न होते.

 

प्रत्‍येक पिढीसह ह्युंदाई क्रेटाची ब्रँड पोझिशनिंग देखील प्रबळपणे वाढली, ज्‍यामधून कारचे वाढते यश आणि एसयूव्‍ही विभागामध्‍ये आणलेले परिवर्तन दिसून येते. २०१५ मध्‍ये प्रथम ‘ए परफेक्‍ट एसयूव्‍ही’ या टॅगलाइनसह ही कार लाँच करण्‍यात आली आणि या टॅगलाइनने सर्वोत्तमतेसाठी पाया रचला. २०२० मध्‍ये सेकंड-जनरेशन क्रेटाने ‘द अल्टिमेट एसयूव्‍ही’सह आपला दर्जा सुधारला. २०२४ मध्‍ये अपडेट लॉंचसह या उत्‍क्रांतीला अधिक चालना मिळाली, जिला टॅगलाइन ‘अनडिस्‍प्‍युटेड अल्टिमेट एसयूव्‍ही’ मिळाले.

 

ह्युंदाई क्रेटाच्‍या १०व्‍या वर्धापन दिनाला साजरे करत एचएमआयएलने अनेक उपक्रमांचे नियोजन केले आहे, जसे:

 

• यूजीसी स्पर्धा – प्रतिष्ठित एसयूव्ही, अनडिस्प्युटेड अल्टिमेट क्रेटाच्या १०व्या वर्धापन दिनानिमित्त एचएमआयएलने ‘क्रेटा एक्स मेमरीज’ ही वापरकर्ता-निर्मित डिजिटल स्पर्धा मोहीम सुरू केली आहे. ही देशव्यापी स्पर्धा ह्युंदाई क्रेटाच्या मालकांना आणि चाहत्यांना एसयूव्हीसोबतच्या त्यांच्या सर्वात प्रिय आठवणी शेअर करण्याची संधी देते. तसेच त्‍यांना श्रीमती दीपिका पदुकोणसोबत भेटीगाठी करण्‍याची किंवा अॅप्‍पल आयफोन यांसारखी उत्‍साहवर्धक बक्षिसे जिंकण्याची संधी देखील आहे.

 

• ह्युंदाई ईक्रेटाच्या १० वर्षांच्या वारशाचे दर्शन घडवणारा शक्तिशाली जाहीरनामा चित्रपट, जो डिजिटल आणि प्रिंट मोहिमेच्‍या माध्‍यमातून प्रसारित करण्‍यात येईल.

 

• लेगसी ड्राइव्ह – क्रेटाच्या १० वर्षांच्या पूर्ततेनिर्मित एचएमआयएल फक्‍त अभिमानी क्रेटाच्या मालकांसाठी भव्य उत्सव क्रेटा लेगसी ड्राइव्हचे आयोजन करणार आहे. १०० क्रेटा कॉन्‍वॉय मोहीम २६ जुलै २०२५ रोजी गुरगाव येथील ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) मुख्यालयातून सुरू होईल.

 

ह्युंदाई क्रेटाच्‍या प्रवासामधून सातत्‍यपूर्ण नाविन्‍यता, दर्जा आणि ग्राहक-केंद्रित्वाप्रती ह्युंदाईची समर्पितता दिसून येते. क्रेटा प्रभुत्‍वाचे दशक पूर्ण करत असताना यशाची आयकॉन, तसेच भारतीयांच्‍या एसयूव्‍हीसंदर्भातील भावी महत्त्वाकांक्षांची प्रतीक ठरली आहे.

 

अधिक माहितीसाठी hyundai.co.in येथे लॉग ऑन करा.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments