Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाजी सैनिक, विधवांच्या पाल्यांना कल्याणकारी निधीमधून शिष्यवृत्ती योजना

माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांना कल्याणकारी निधीमधून शिष्यवृत्ती योजना

पुणे दि. 22 : जिल्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा यांच्या पाल्यांना सन 2024-25 मध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवून 10 वी, 12 वी व पदवी परिक्षा उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेत आहेत अशा सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार आहे.

शिष्यवृत्तीचे अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असून संबंधितांनी त्यांचे पाल्यांचे अर्ज दिनांक 15 ऑक्टोबर 2025 पूर्वी आवश्यक त्या कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत. असे आवाहन ले. कर्नल हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments