पुणे,२३ जुलै 2025 : स्तनाच्या कर्करोगाच्या व्यवस्थापनामध्ये एक महत्त्वाचे पाऊल उचलत रूबी हॉल क्लिनिक तर्फे 19 जुलै 2025 रोजी महत्त्वाच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भारत व भारताबाहेरील 150 कर्करोग तज्ञ सहभागी झालेल्या या परिषदेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत तसेच स्तनाच्या कर्करोगाच्या व्यवस्थापनासाठी समग्र दृष्टीकोनासह कर्करोगाच्या उपचारातील प्रगतीवर प्रकाश टाकण्यात आला.
या परिषदेचे वैशिष्टय म्हणजे लाईव्ह रोबोटिक मॅस्टेक्टोमी जी आधुनिक काळातील स्तनाच्या कर्करोगाच्या व्यवस्थापनासाठी कमीत कमी छेद असलेली प्रक्रिया आहे.या शस्त्रक्रियेमध्ये अधिक अचूकता असून यामुळे कमी व्रण,जलद पुनर्प्राप्ती शक्य असून भारतातील स्तन कर्करोगाच्या उपचारामध्ये बदल दर्शविते.
या परिषदेमध्ये कर्करोग उपचारांमधील आधुनिक विकास पाहण्यासाठी भारत व भारताबाहेरील 150 हून अधिक कर्करोग व वैद्यकीय तज्ञ एकत्र आले होते.याप्रसंगी रूबी हॉल क्लिनिकचे विश्वस्त व फिजिशियन डॉ.सायमन ग्रांट उपस्थित होते.हा उपक्रम भारतात स्तनाच्या कर्करोगासाठी उच्च गुणवत्तेच्या उपचारांमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान व बहुविद्याशाखीय दृष्टीकोनाचा वापर तसेच रूग्णकेंद्रित कर्करोग उपचार आणि अचूकतेप्रती रूबी हॉल क्लिनिकची समर्पितता दर्शविते.
रूबी हॉल क्लिनिकमधील कन्सल्टंट ब्रेस्ट सर्जन डॉ.अनुपमा माने म्हणाल्या की,या परिषदेमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारांमधील आधुनिकता दर्शविण्यात आली.रोबोटिक मॅस्टेक्टोमी सुरक्षितता,वेग आणि रूग्णांची अधिक काळजी घेणारा मार्ग प्रदान करतो.केवळ स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारापलीकडे जाऊन हा मार्ग संपूर्ण व्यक्तीची काळजी घेते.
रूबी हॉल क्लिनिकचे चीफ कार्डिओलॉजिस्ट,अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.परवेझ ग्रांट यांनी संस्थेच्या सतत शिक्षण आणि अभिनवतेच्या समर्पणावर प्रकाश टाकला.ते म्हणाले की,भारतात कर्करोगाच्या उपचारांचा दर्जा वाढवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.अशा प्रकारच्या परिषदा म्हणजे रूग्णांना पुण्यात जागतिक दर्जाचे उपचार मिळवून देण्यासाठी आणि डॉक्टरांना नवीनतम माहिती प्रदान करण्याची आमची वचनबध्दता दर्शविते.
या उपक्रमाची रचना माहितीपूर्ण संवाद,लाईव्ह केस स्टडीज् त्याचबरोबर सर्वोत्तम पध्दती आणि अनुभवांची देवाणघेवाण आणि वैयक्तिकृत उपचार नियोजन,रूग्णांसाठी चांगले परिणाम याबद्दल चर्चा करण्यासाठी केली गेली होती.
जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पध्दती,प्रगत तंत्रज्ञान,बहुविद्याशाखीय दृष्टीकोन आणि रूग्णकेंद्रित पध्दतींद्वारे रूबी हॉल क्लिनिक आरोग्यसेवेत आघाडीवर आहे.


