Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई ; रु. ९.१९...

महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई ; रु. ९.१९ कोटींच्या बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट प्रकरणी दोन आरोपींना अटक

मुंबई, दि. २३ : राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागामार्फत बोगस बिलिंग प्रकरणी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मे. अ‍ॅक्युरेट एंटरप्रायजेस (GSTIN: 27AAZFA6898H2ZE) या भागीदारी व्यवसायाविरुद्ध तपासात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान बनावट खरेदी दाखवून वस्तू व सेवा करांतर्गत खोटी कर सवलत (इनपुट टॅक्स क्रेडिट) घेऊन सुमारे रुपये ९.१९ कोटींची महसूल हानी करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी जबाबदार व्यक्ती त्रिभुवन सिन्हा (वय ५०) आणि अख्तर खान (वय ५५) यांना दिनांक २९ जुलै २०२५ रोजी अटक करण्यात आली असून, अप्पर मुख्य महानगर दंडाधिकारी, मुंबई यांनी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई सहायक राज्यकर आयुक्त चंदर कांबळे, दादासाहेब शिंदे, राजेश बदर (अन्वेषण ‘अ’, मुंबई) यांनी राज्यकर सहआयुक्त (भा.प्र.से.) प्रेरणा देशभ्रतार आणि राज्यकर उपायुक्त अनिल कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.या कारवाईत राज्यकर निरीक्षकांचे विशेष सहकार्य लाभले.

राज्य वस्तू व सेवा कर विभागाने सर्वसमावेशक नेटवर्क विश्लेषण साधने वापरून आणि अन्य संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत अशा प्रकारच्या करचुकवेगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांविरोधात कठोर कारवाई सुरू ठेवली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ही सहावी आणि सातवी अटक आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments