पुणे — भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व युवक नेते ऍड कुणाल टिळक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नोकरी महोत्सवत 65 कंपनी व 1500 तरुण तरुणीनी उत्स्फूर्त सहभागी झाले. 300 युवक युवतीना ऑन डी स्पॉट जॉब ऑफर लेटर कंपन्यातर्फे देण्यात आले. या महोत्सवात सुमारे 600 युवक युवतीना रोजगार उपलब्ध झाला.
या नोकरी महोत्सवाचे उदघाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे माजी भाग संचालक श्री किशोर शशितल यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्राचे उच्चं व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार सौ मेधा कुलकर्णी आमदार हेमंत रासने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या नोकरी महोत्सवात श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते युवक युवतीना ऑन दि स्पॉट जॉब ऑफर लेटर्स देण्यात आले. मिराताई पावगी, राघवेंद्र मानकर, माजी नगरसेवक अजय खेडेकर,योगेश समेळ, गायत्री खडके,दिलीप काळोखे, आर पी आय युवा नेते मंदार जोशी, करणं मिसाळ, हर्षदा फरांदे, राजेंद्र काकडे अमित कंक, छगन बुलाखे,नामदेव माळवदे श्रीराम नानजकर, विश्वजित देशपांडे, मंदार रेडे, सचिन टापरे, निखिल पंचभाई, केदार मानकर, शंतनू कांबळे, पियुष कश्यप तुषार रायकर, रौनक शेट्टी, रमाकांत कापसे, महेश कुलकर्णी,मनोज खत्री, बाबू खैर, विश्वास घोलप, प्रमोद वसगडेकर, अविनाश आपटे, अश्विनी पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, युवक युवतीना नोकरीं महोत्सवामार्फत नोकरी मिळवून देण्यासारखं मोठे सामाजिक कार्य नाही. हल्लीच्या काळात शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित भर देऊन कंपनी युवक युवतीना नोकरी देत आहे.
आय टी कंपनी, बँकिंग, इन्शुरन्स मॅन्युफॅक्टरिंग सेल्स मार्केटिंग, रिटेल कंपनी, ऍक्सिस बँक, एस बि आय लाईफ इन्शुरन्स, बेलाराईज इंडस्ट्रिज, लोकमान्य मल्टीपरपज कंपनी, पी एन जी एक्सकलूजिव्ह ए बी इन्फोतेक कंपनी आदी नामवंत कंपन्या या नोकरी महोत्सवात सहभागी झाल्या होत्या.
भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळ ऍड कुणाल टिळक यांनी आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवात तरुण – तरुणीचा उत्स्फूर्त प्रतिसाद –
RELATED ARTICLES


