दर्शनी मूल्य ₹1 प्रत्येक शेअरसाठी किंमत पट्टा ₹640 ते ₹675 निश्चित करण्यात आला आहे (इक्विटी शेअर).
● बोली / ऑफर मंगळवार, 29 जुलै 2025 रोजी सुरू होईल आणि गुरुवार, 31 जुलै 2025 रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली प्रक्रिया सोमवार, 28 जुलै 2025 रोजी होईल.
● किमान 22 इक्विटी शेअरसाठी बोली लावता येईल आणि त्यानंतर 22 शेअर्सच्या पटीत अर्ज करता येईल.
● कर्मचारी आरक्षण विभागात पात्र कर्मचाऱ्यांसाठी प्रति इक्विटी शेअर ₹60 ची सवलत देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय, 24 जुलै 2025: आदित्य इन्फोटेक लिमिटेड (“कंपनी”) आपल्या प्रारंभिक समभाग विक्रीसंदर्भात बोली/ऑफर मंगळवार, 29 जुलै 2025 रोजी सुरू करणार आहे.
इक्विटी शेअर्सच्या एकूण विक्रीचा आकार ₹13,000 मिलियन [₹1,300 कोटी] इतका असून, त्यामध्ये ₹5,000 मिलियन [₹500 कोटी] किमतीच्या नव्या शेअर्सचा समावेश आहे (फ्रेश इश्यू) आणि ₹8,000 मिलियन [₹800 कोटी] किमतीचे समभाग विद्यमान शेअरधारकांकडून विक्रीसाठी (ऑफर फॉर सेल) ठेवण्यात आले आहेत. (“एकूण विक्रीचा आकार”).
अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली प्रक्रिया सोमवार, 28 जुलै 2025 रोजी पार पडेल. बोली/ऑफर मंगळवार, 29 जुलै 2025 रोजी खुली होईल आणि गुरुवार, 31 जुलै 2025 रोजी बंद होईल.
ऑफरचा प्राइस बँड ₹640 ते ₹675 प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 22 इक्विटी शेअर्ससाठी करता येईल आणि त्यानंतर 22 च्या पटीत बोली लावता येईल.
कर्मचारी आरक्षण विभागात बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति शेअर ₹60 ची सूट दिली जाईल. कंपनीने फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ रकमेचा वापर काही ठरावीक कर्जे पूर्वपरतफेड किंवा पूर्ण/आंशिक परतफेड करण्यासाठी करणार आहे; उर्वरित रक्कम कंपनीच्या सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरण्याची योजना आहे. (“ऑब्जेक्ट ऑफ इश्यू”)
विक्रीसाठीची ऑफरमध्ये आदित्य खेमका यांच्या वतीने ₹5,240.04 मिलियन किमतीचे इक्विटी शेअर्स, अनन्मय खेमका यांच्या वतीने ₹123.16 मिलियन आणि ऋषी खेमका यांच्या वतीने ₹2,000.00 मिलियन किमतीचे इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत (प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स), याशिवाय हरि शंकर खेमका (एचयूएफ) यांच्या वतीने ₹426.40 मिलियन, श्रद्धा खेमका यांच्या वतीने ₹198.90 मिलियन आणि आदित्य खेमका (HUF) यांच्या वतीने ₹11.50 मिलियन किमतीचे शेअर्स (प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डर्स) ऑफरमध्ये आहेत. (एकत्रितपणे, विक्री करणारे शेअरहोल्डर्स)
या आयपीओसाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वी आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) म्हणून काम करीत आहेत.
हे इक्विटी शेअर्स कंपनीच्या 23 जुलै 2025 रोजी तयार झालेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (आरएचपी) अंतर्गत ऑफर केले जात आहेत, ज्यास दिल्ली आणि हरियाणातील रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, नवी दिल्ली (आरओसी) येथे नोंदणी करण्यात आली आहे व या शेअर्सची नोंदणी बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) वर करण्यात येणार आहे.
ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे केली जात आहे, जी सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) रूल्स, 1957 च्या (एससीआरआर) नियम 19(2)(b) आणि सेबी आयसीडीआर नियमांच्या कलम 31 नुसार व सेबी आयसीडीआर नियमांच्या कलम 6(2) चे पालन करत आहे. यामध्ये निव्वळ ऑफरचा कमीतकमी 75% हिस्सा प्रमाणानुसार प्रमाणित संस्थात्मक खरेदीदारांना (QIBs) वाटपासाठी उपलब्ध असतो. (“क्यूआयबी पोर्शन”). कंपनी आणि बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) यांच्या सल्ल्यानुसार, क्यूआयबी पोर्शनच्या 60% पर्यंत अँकर गुंतवणूकदारांना स्वतंत्र निर्णयाने वाटप करता येते (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन”). अँकर इन्व्हेस्टर पोर्शनचा एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी राखीव राहील, जर देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून अँकर गुंतवणूकदारांना दिल्या जाणाऱ्या किमतीवर किंवा त्याहून अधिक किमतीवर वैध बोली मिळाली, तर सेबी आयसीडीआर नियमांनुसार वाटप केले जाईल. जर अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये बोली कमी पडली किंवा वाटप झाले नाही, तर उर्वरित इक्विटी शेअर्स क्यूआयबी पोर्शनमध्ये (अँकर पोर्शन वगळता) समाविष्ट केले जातील (“नेट QIB पोर्शन”).
तसेच निव्वळ क्यूआयबी पोर्शनचा 5% हिस्सा प्रमाणानुसार वैध बोली ऑफर किमतीवर किंवा त्याहून अधिक किमतीवर प्राप्त झाल्यास फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असेल आणि निव्वळ क्यूआयबी पोर्शनचा उर्वरित हिस्सा प्रमाणानुसार QIBs (अँकर गुंतवणूकदारांशिवाय), ज्यात म्युच्युअल फंडांचा समावेश आहे, यांना वैध बोली ऑफर किमतीवर किंवा त्याहून अधिक किमतीवर प्राप्त झाल्यास वाटपासाठी उपलब्ध असेल, तसेच निव्वळ ऑफरच्या जास्तीतजास्त 15% हिश्श्यास नॉन-इंस्टिट्युशनल बिडर्स यांना वाटपासाठी राखीव ठेवले गेले आहे, (ज्यातून नॉन-इंस्टिट्युशनल बिडर्ससाठी उपलब्ध असलेल्या हिश्श्याचा एक तृतीयांश हिस्सा ₹0.20 मिलियनपेक्षा जास्त आणि ₹1.00 मिलियनपर्यंत अर्ज असलेल्या बिडर्ससाठी राखीव आहे व दोन तृतीयांश हिस्सा ₹1.00 मिलियनपेक्षा जास्त अर्ज असलेल्या बिडर्ससाठी राखीव आहे. मात्र, या दोन उपवर्गांपैकी एका उपवर्गात अनविक्रीत हिस्सा दुसऱ्या उपवर्गातील बिडर्सना वाटप केला जाऊ शकतो आणि निव्वळ ऑफरच्या जास्तीतजास्त 10% हिश्श्यास रिटेल इंडिव्हिज्युअल बिडर्स यांना वाटपासाठी राखीव ठेवले गेले आहे (SEBI ICDR नियमांनुसार, ज्यांना ऑफर किमतीवर किंवा त्याहून अधिक किमतीवर वैध बोली मिळाल्यास).
तसेच कर्मचारी आरक्षण विभागांतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना (वैध बोली ऑफर किमतीवर किंवा त्याहून अधिक किमतीवर प्राप्त झाल्यास) प्रमाणानुसार इक्विटी शेअर्स वाटप केले जातील. अँकर गुंतवणूकदारांशिवाय सर्व बिडर्सना अनिवार्यपणे ॲप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट (“एएसबीए”) प्रक्रियेद्वारे या ऑफरमध्ये भाग घेणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना त्यांचे संबंधित एएसबीए खाते (खाली परिभाषित केलेले) आणि UPI बिडर्स असल्यास (खाली परिभाषित केलेले) यूपीआय आयडी प्रदान करावा लागेल, ज्याद्वारे त्यांच्या बोली रकमेची रक्कम सेल्फ-सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स (“एससीएसबीज”) किंवा UPI यंत्रणेंतर्गत प्रायोजक बँकांद्वारे त्यांच्या संबंधित बोली रकमेच्या प्रमाणात रोखली जाईल. अँकर गुंतवणूकदारांना ASBA प्रक्रियेचा वापर करून ऑफरमध्ये भाग घेण्याची परवानगी नाही. अधिक माहितीसाठी, RHP च्या पृष्ठ 477 वर असलेल्या “ऑफर प्रक्रिया” पाहा.


