यावर्षीची थीम आहे – ‘इनोव्हेशनद्वारे सक्षम विश्वास’
ग्राहकांचा अनुभव आणि विश्वास वाढवण्यासाठी ग्राहक-केंद्रित विविध उपक्रमांची घोषणा
Mumbai, July 22nd, 2025: बँक ऑफ बडोदाने आपल्या ११८व्या स्थापना दिनानिमित्त विश्वास, इनोव्हेशन आणि शाश्वत विकास यांप्रतीची आपली निष्ठा आणि बांधिलकी पुन्हा अधोरेखीत केली. ‘इनोव्हेशनद्वारे सक्षम विश्वास’ ही बँकेच्या 118व्या वर्षासाठीचे थीम असून, दीर्घकालीन ग्राहकविश्वास टिकवत आधुनिक बँकिंगचा भविष्यकाल आकार देण्याच्या दृष्टीकोनाला यामध्ये महत्त्व देण्यात आले आहे. स्थापना दिनानिमित्त आयोजित विशेष सोहळ्याला आर्थिक सेवा विभागाचे सचिव श्री एम. नागराजू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते..118 UNIT A
या विशेष प्रसंगी, बँक ऑफ बडोदाने डिजिटल आणि तंत्रज्ञान, शाश्वत बँकिंग आणि ग्रीन फायनान्स या क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण उत्पादने आणि उपक्रमांची विविध श्रेणी सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे. हे उपक्रम ग्राहकांच्या सतत बदलणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी, बँकिंग सेवा अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्यासाठी आणि शाश्वत विकासाला पाठबळ देण्यासाठी तयार करण्यात आले आहेत.
यापैकी काही उपक्रमांमध्ये पुढील उपक्रमांचा समावेश आहे. bob World Business ॲप – एमएसएमई, व्यापारी आणि कॉर्पोरेट ग्राहकांसाठी एक नवे आणि सर्वसमावेशक मोबाईल बँकिंग ॲप; एआय आणि थ्रीडी होलोग्राफिक तंत्रज्ञानाद्वारे समर्थित अत्याधुनिक Virtual Front Office ची चाचणी, जे ग्राहकांना अधिक आकर्षक आणि जीवन्त सेवा अनुभव देईल; bob इ Pay International, ज्यामध्ये bob इ Pay ॲपमध्ये जागतिक UPI सुविधा समाविष्ट करण्यात आल्या आहेत; bob inSIGHT ब्रेल डेबिट कार्ड, जे दृष्टिहीन ग्राहकांना सक्षम बनवण्यासाठी तयार करण्यात आले आहे; तसेच शाश्वत विकासाला पाठिंबा देणाऱ्या ग्रीन फायनान्सिंग योजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत.
आर्थिक सेवा विभागाचे सचिव श्री एम. नागराजू म्हणाले, “118व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ बडोदाची समृद्ध परंपरा हा दीर्घकाळ टिकलेल्या विश्वासाचा, लवचिकतेचा आणि इनोव्हेशनमधील वचनबद्धतेचा ठसा आहे. ‘विकसित भारत@2047’ च्या दृष्टीकोनाकडे वाटचाल करत असताना, बँक ऑफ बडोदा सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका समावेशक विकास घडवण्यात, एमएसएमईंना पाठिंबा देण्यात आणि तंत्रज्ञानावर आधारित बँकिंगच्या माध्यमातून युवकांना सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावत राहतील.”
या प्रसंगी बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री देबदत्त चंद म्हणाले, “शंभर वर्षांहून अधिक काळ बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांच्या आकांक्षांना पाठिंबा देत त्यांचा विश्वास संपादन केला आहे. हा विश्वास केवळ आपल्या परंपरेचा भाग नसून, आम्हाला सातत्याने नवे प्रयोग करण्याची आणि जबाबदारीने नवकल्पना राबवण्याची प्रेरणा देतो. त्यामुळेच आम्ही बँकिंग अधिक सोपे, स्मार्ट, सुरक्षित आणि सर्वांसाठी सहज उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या 118व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आज ज्या उपक्रमांची घोषणा करण्यात येत आहे त्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांसोबतच देशालाही पुन्हा एकदा वचन देत आहोत — अधिक समावेशक, शाश्वत आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम भारत घडवण्याच्या प्रवासात आम्ही ठाम भागीदार राहू.”


