*
पुण्यातील कौशिक आश्रम आणि अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने रविवारी, २७ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चतुर्थ सरसंघचालक प्रो. राजेंद्रसिंहजी उर्फ रज्जूभय्या यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिवर्षी हे शिबिर आयोजित करण्यात येते.
मित्रमंडळ कॉलनीतील कौशिक आश्रम येथे हे शिबिर होणार असून रविवारी सकाळी आठ वाजता शिबिराचे उद्घाटन होईल. ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार, प्रथितयश स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. लीना पाटणकर आणि संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्रा. डॉ. सुरेश उर्फ नाना जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. हे शिबिर सायंकाळी पाचपर्यंत सुरू राहील. डॉ. हेडगेवार रक्तकेंद्र सोलापूर आणि जनकल्याण रक्तकेंद्र पुणे यांच्या सहयोगाने हे शिबिर आयोजिण्यात आले आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन कौशिक आश्रम आणि अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील राऊत यांनी केले आहे.


