Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedजितेंद्र भुरुक यांना स्व. मोहम्मद रफी पुरस्कार जाहीर अनुबंध सेवा प्रतिष्ठानच्या वतीने...

जितेंद्र भुरुक यांना स्व. मोहम्मद रफी पुरस्कार जाहीर अनुबंध सेवा प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार

पुणे : अनुबंध सेवा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा स्वर्गीय मोहम्मद रफी पुरस्कार गायक जितेंद्र भुरुक यांना यंदा प्रदान करण्यात येणार आहे. बुधवार दिनांक ३० जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती अनुबंध सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली.

माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते जितेंद्र भुरुक यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी आमदार हेमंत रासने, माजी उपमहापौर दीपक मानकर, उद्योजक कृष्णकुमार गोयल, विश्वेश्वर बँकेचे अनिल गाडवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली पाटील, नाट्यपरिषद अध्यक्ष मेघराजराजे भोसले, अभिनेते प्रवीण तरडे, माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, भाजप पुणे सरचिटणीस बापू मानकर, राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष विजय कदम यावेळी उपस्थित राहणार आहेत.

प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक यांना प्रती किशोर कुमार म्हणून ओळखले जाते. गायन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ‘याद ए रफी’ हिंदी गाण्यांचा सुरेल कार्यक्रम होणार आहे. गायिका राजेश्वरी पवार, अशोक जाधव आणि जितेंद्र भुरुक हे कार्यक्रमात गायन करणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून शिल्लक पासेस बालगंधर्व रंगमंदिरात उपलब्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments