Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतात आजपासून सॅमसंग गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड७, झेड फ्लिप७, झेड फ्लिप७ एफई, वॉच८,...

भारतात आजपासून सॅमसंग गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड७, झेड फ्लिप७, झेड फ्लिप७ एफई, वॉच८, वॉच८ क्‍लासिकच्‍या विक्रीला सुरूवात

गुरूग्राम, भारत – जुलै 28, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज भारतातील ग्राहकांसाठी त्‍यांचे सातव्‍या पिढीमधील फोल्‍डेबल स्‍मार्टफोन्‍स – गलॅक्‍सी झेड फोल्‍ड७, गलॅक्‍सी झेड फ्लिप७, गलॅक्‍सी झेड फ्लिप७ एफई, तसेच गॅलॅक्‍सी वॉच८ सिरीजच्‍या विक्रीच्‍या शुभारंभाची घोषणा केली. आजपासून गलॅक्‍सी झेड फोल्‍ड७, गलॅक्‍सी झेड फ्लिप७, झेड फ्लिप७ एफई आणि गॅलॅक्‍सी वॉच८ सिरीज तुमच्‍या जवळच्‍या रिटेल आऊटलेट्समध्‍ये उपलब्‍ध असतील. ग्राहक Samsung.com, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर देखील डिवाईसेस खरेदी करू शकतात.

गलॅक्‍सी झेड फोल्‍ड७, गलॅक्‍सी झेड फ्लिप७ आणि,गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ एफई या स्‍मार्टफोन्‍सना मोठे यश मिळाले आहे, जेथे स्‍मार्टफोन्‍सनी विक्रमी प्री-ऑर्डर्सची नोंद केली आहे. यामधून ब्रँडच्‍या फोल्‍डेबल स्‍मार्टफोन्‍सच्‍या सातव्‍या पिढीसाठी ग्राहकांकडून मोठी मागणी व उत्‍साह दिसून येतो. गलॅक्‍सी झेड फोल्‍ड७, गलॅक्‍सी झेड फ्लिप७ आणि गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ एफई या स्‍मार्टफोन्‍सनी पहिल्‍या ४८ तासांमध्‍ये २१०,००० प्री-ऑडर्स संपादित करत मागील विक्रम मोडून काढला आणि जवळपास या वर्षाच्‍या सुरूवातीला गॅलॅक्‍सी एस२५ सिरीजने संपादित केलेल्‍या प्री-ऑर्डर्सचा टप्‍पा गाठला.

गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड७ आणि झेड फ्लिप७: अत्‍यंत सडपातळ आणि वजनाने हलके असण्‍यासह सर्वोत्तम इंटेलिजन्‍स

वर्षानुवर्षे उल्‍लेखनीय अभियांत्रिकी आणि प्रगत इंटेलिजन्‍ससह सुधारित करण्‍यात आलेले गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड७ आणि झेड फ्लिप७ स्‍मार्टफोन नाविन्‍यतेमधील भावी झेप आहेत. गलॅक्‍सी झेड फोल्‍ड७ आणि झेड फ्लिप७ सॅमसंगचे आतापर्यंतचे सर्वात सडपातळ, वजनाने हलके आणि सर्वात प्रगत झेड सिरीज डिवाईसेस आहेत. अत्‍याधुनिक कार्यक्षमता आणि विनासायासपणे एकीकृत गॅलॅक्‍सी एआयसह हे स्‍मार्टफोन्‍स सर्वोत्तम, अनुकूल सोबती आहेत, जे रिअल टाइममध्‍ये वापरकर्त्‍यांच्‍या गरजांना ओळखतात आणि प्रतिसाद देतात. मोठा व स्थिर डिस्‍प्‍ले, प्रो-ग्रेड कॅमेरे आणि संदर्भाशी संबंधित इंटेलिजन्‍सच्‍या माध्‍यमातून गलॅक्‍सी झेड फोल्‍ड७ आणि झेड फ्लिप७ उत्‍पादकता, सर्जनशीलता व कनेक्‍शनसह अद्वितीय अनुभव देतात.

गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड७ मध्‍ये गॅलॅक्‍सी प्रगतीशील वैशिष्‍ट्ये आहेत, जी त्‍याची व्‍याप्‍ती वाढतात. या आतापर्यंतच्‍या सर्वात सडपातळ, वजनाने हलका आणि सर्वात प्रगत झेड सिरीज स्‍मार्टफोनमधून अल्‍ट्रा-लेव्‍हल अनुभव मिळतो. या स्‍मार्टफोन्‍सच्‍या व्‍यापक स्क्रिनवर सर्वोत्तम, उच्‍च-स्‍तरीय कार्यक्षमता मिळते, ज्‍यामुळे वापरकर्ते गेमिंग, स्ट्रिमिंगचा आनंद घेण्‍यासोबत कन्‍टेन्‍ट निर्मिती करू शकतात. फोल्‍डेबल फॉर्मेटसाठी गॅलॅक्‍सीच्‍या खऱ्या एआय सोबती अनुभवामला देखील सानुकूल करण्‍यात आले आहे, ज्‍यामुळे मोठ्या स्क्रिनवर अधिक अॅप्‍स सहजपणे उपलब्‍ध होतात. कॅमेरा आणि जेमिनी लाइव्‍हच्‍या माध्‍यमातून स्क्रिन शेअरिंगसह वापरकर्ते जेमिनीला स्क्रिनवर पाहणाऱ्या गोष्‍टींबाबत सहजपणे विचारू शकतात. ते नवीन शहराचा शोध घेत असताना स्‍थानिक मिष्‍टान्‍नाचा फोटो शेअर करू शकतात आणि जेमिनीला जवळच्‍या रेस्‍टॉरँटबाबत विचारू शकतात.

तसेच, गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड७ चा अल्‍ट्रा-ग्रेड २०० मेगापिक्‍सल हाय-रिझॉल्‍यूशन कॅमेरा कोणत्‍याही कोनामधून सुस्‍पष्‍टपणे फोटो व व्हिडिओ कॅप्‍चर करतो, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना व्‍यावसायिक दर्जाचे कन्‍टेन्‍ट तयार करतात येतात. उदाहरणार्थ, जनरेटिव्‍ह एडिट सारखी सोईस्‍कर एडिटिंग वैशिष्‍ट्ये आता फोटोमधील मागील बाजूस असलेल्‍या व्‍यक्‍तींना ओळखू शकते आणि कोणाला फोटोमधून काढून टाकावे याची सक्रियपणे शिफारस करू शकते. ज्‍यामुळे मॅन्‍युअली निवडण्‍याची व एडिट करण्‍याची गरज दूर होते. या वैशिष्‍ट्यांव्‍यतिरिक्‍त गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड७ मध्‍ये अनुकूलता, टिकाऊपणा आणि लक्षवेधक नवीन डिझाइन आहे, जी असाधारण अनुभव देते.

गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ मध्ये सर्वोत्तम कार्यक्षमता आणि कॉम्‍पॅक्‍ट व आयकॉनिक फॉर्ममध्‍ये एकीकृत वैयक्तिक वैशिष्‍ट्ये आहेत. एज-टू-एज फ्लेक्‍सविंडोसह वापरकर्ते स्‍वत:ला अभिव्‍यक्‍त करू शकतात, त्‍यांच्‍यासाठी क्षणात प्रमुख वैशिष्‍ट्ये उपलब्‍ध होऊ शकतात आणि ते कनेक्‍टेड राहू शकतात, ज्‍यासाठी डिवाईस ओपन करण्‍याची गरज भासत नाही. गतीशील जीवनशैलीसाठी डिझाइन करण्‍यात आलेला गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ आकर्षक सेल्‍फीजपासून सिनेमॅटिक व्हिडिओ कॅप्‍चर करण्‍याच्‍या आणि कन्‍टेन्‍ट शेअर करण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये बदल करतो, जेथे ही गतीशीलता व सर्जनशीलता फक्‍त फ्लिप डिवाईसेसमध्‍ये उपलब्‍ध आहे. नाऊ बार गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ च्‍या फ्लेक्‍सविंडोवर उपयुक्‍त माहिती देते, ज्‍यामुळे वापरकर्ते त्‍यांच्‍या दिवसभरातील टास्‍क्‍सवर नियंत्रण ठेवू शकतात, जसे गाणी, करत असलेल्‍या कामाची प्रगती आणि राइडशेअर ईटीए. जेमिनी लाइव्‍ह वापरकर्त्‍यांना जेमिनीसह ते कॅमेऱ्याच्‍या माध्‍यमातून पाहणाऱ्या गोष्‍टी व चॅट रिअल टाइममध्‍ये फ्लेक्‍सविंडोवरून शेअर करण्‍याची सुविधा देते.

वापरकर्ते फ्लेक्‍स मोडमध्‍ये कॅमेरा देखील शेअर करू शकतात आणि जेमिनीसोबत हँड्स-फ्री संवाद साधू शकतात. गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ चा फ्लेक्‍सकॅम सहजपणे परिपूर्ण सेल्‍फी कॅप्‍चर करतो. फ्लेक्‍सविंडोवरील रिअल-टाइम फिल्‍टर्स त्‍वरित वापरकर्त्‍यांच्‍या फ्लेक्‍सकॅम सेल्‍फीजमध्‍ये बदल करू शकतात, ज्‍यामुळे ते अधिक एडिटिंग न करता फोटो पोस्‍ट किंवा शेअर करू शकतात. पाळीव प्राण्‍यांसाठी पोर्ट्रेट स्‍टुडिओ सारख्‍या धमाल नवीन वैशिष्‍ट्यांसह वापरकर्ते कोणताही कॅप्‍चर किंवा डाऊनलोड केलेला पाळीव प्राण्‍याचा फोटो कलाकृतीमध्‍ये बदलू शकतात. ते कलात्मक चित्रांसारख्या शैली, २डी कार्टून, फिशआय लेन्स फोटो किंवा व्यावसायिक दर्जाच्या पोर्ट्रेट्समधून निवड करू शकतात आणि फक्‍त एका टॅपमध्ये फ्रेममध्ये लावण्यासारखी कलाकृती तयार करू शकतात.

गॅलॅक्‍सी वॉच८ सिरीज: अधिक आरामदायीपणा व रिअल-टाइममध्‍ये आरोग्‍याबाबत माहिती

गॅलॅक्‍सी परिसंस्‍थेला पूर्ण करणाऱ्या गॅलॅक्‍सी वॉच८ सिराीजमध्‍ये गॅलॅक्‍सी वॉच८ आणि गॅलॅक्‍सी वॉच८ क्‍लासिक आहेत, जेथे नवीन स्‍मार्टफोन्‍समधील पुनर्रचनेचा दर्जा या सिरीजमध्‍ये देखील आहे. गॅलॅक्‍सी वॉच८ मध्‍ये प्रगत सेन्‍सर तंत्रज्ञान आहे आणि सर्वोत्तम एआय-समर्थित अनुभव देते, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना आरोग्‍यावर देखरेख ठेवण्‍यासोबत अधिक कनेक्‍टेड जीवनाचा आनंद घेता येतो. गॅलॅक्‍सी वॉच८ मध्‍ये अत्‍यंत सडपातळ कूशन डिझाइन, दिवसभर आरामदायीपणासाठी डायनॅमिक लग सिस्‍टम फ्लेक्‍स आणि अधिक अचूक सेन्‍सर कॉन्‍टॅक्‍ट आहे. सतत आरोग्‍यावर देखरेख ठेवण्‍यासाठी सॅमसंगच्‍या बायोअॅक्टिव्‍ह सेन्‍सरचा फायदा घेत हे वॉचेस् झोप, तणाव, पोषण व क्रियाकलापबाबत रिअल-टाइम माहिती व त्‍वरित रिवॉर्डस् किंवा अलर्टस् देतात. तसेच आरोग्‍याबाबत त्‍वरित, प्रेरणादायी अभिप्राय देखील देतात. याव्‍यतिरिक्‍त स्‍मार्टवॉचमध्‍ये पहिल्‍यांदाच गॅलॅक्‍सी वॉच८ मध्‍ये अॅण्टीऑक्सिडण्‍ट इंडेक्‍स सादर करण्‍यात आले आहे, जे वापरकर्त्‍यांना फक्‍त पाच सेकंदांमध्‍ये कॅरोटीनॉइडची पातळी मोजता येते आणि निरोगी वृद्धत्वासाठी माहितीपूर्ण जीवनशैली निवडता येते.

किंमत:

Model Name

Variant

Price

Galaxy Z Fold7

12GB+256GB

INR 174999

12GB+512GB

INR 186999

16GB+1TB

INR 216999

Galaxy Z Flip7

12GB+256GB

INR 109999

12GB+512GB

INR 121999

Galaxy Z Flip7 FE

8GB+128GB

INR 89999

8GB+256GB

INR 95999

Model Name

Price

Watch8 40mm BT

INR 32999

Watch8 40mm LTE

INR 36999

Watch8 44mm BT

INR 35999

Watch8 44mm LTE

INR 39999

Watch8 Classic 46mm BT

INR 46999

Watch8 Classic 46mm LTE

INR 50999

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments