पुणे, दि. 29 : खत विक्रेत्यांनीअनुदानित रासायनिक खतांची विक्री ई-पॉस प्रणालीच्या माध्यमातून करणे बंधनकारक असून नोंदी तात्काळ आणि अचूक पद्धतीने प्रणालीमध्ये अद्यावत करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
विक्रेत्याच्या ई-पॉस प्रणालीवरील खतसाठा व प्रत्यक्ष गोडाऊनमधील साठ्यामध्ये तफावत राहू नये, याकरिता रासायनिक खतांच्या विक्रीची नोंद आयएफएमएस प्रणालीमध्ये तात्काळ घेणे बंधनकारक आहे. ई-पॉसवरील खतसाठा व प्रत्यक्षसाठा यामध्ये फरक आढळणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने नियामोचित कारवाई करण्याच्या सूचना परवाना अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
ज्या विक्रेत्यांनी अद्याप नवीन एल 1 सेक्युरिटी ई-पॉस मशीन प्राप्त वो केलेले नाहीत, त्यानी कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधून 19 ऑगस्ट 2025 पूर्वी ई-पॉस मशीन प्राप्त करुन कार्यान्वित करावे, असेही श्री. काचाळे यांनी कळविले आहे.
00000


