Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedपक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन

पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन

पुणे, दि. 30 :- पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ऑगस्ट महिन्यात पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे 4 व 5 ऑगस्ट, मंचर येथे 11,12 व 13 ऑगस्ट, जुन्नर येथे 18,19 व 20 ऑगस्ट, वडगाव मावळ येथे 25 व 26 ऑगस्ट तर लोणावळा येथे 28 व 29 ऑगस्ट या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा 30 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता उपलब्ध होणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी कळविले आहे.

०००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments