Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedदगडूशेठ गणपती ट्रस्ट* *जय गणेश रुग्णसेवा अभियान* *ज्येष्ठ नागरिकांना* *५००...

दगडूशेठ गणपती ट्रस्ट* *जय गणेश रुग्णसेवा अभियान* *ज्येष्ठ नागरिकांना* *५०० श्रवणयंत्रांचे वाटप*

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, लक्ष्य फाउंडेशन आणि भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांचे शिबिर भरविण्यात आले. त्यात ५०० श्रवणयंत्रांचे वाटप मोफत करण्यात आले.

हे शिबिर सोमवारी, फडके हॉल येथे भरविण्यात आले होते. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.शिवराज कदम यांच्या हस्ते गणरायाच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. शिबिरात वैद्यकीय पथकाने ज्येष्ठ नागरिकांच्या श्रवण क्षमतेची तपासणी केली आणि त्यानुसार ५०० ज्येष्ठ नागरिकांना श्रवण यंत्रांचे वाटप केले. या प्रसंगी अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने, तसेच मंगेश सूर्यवंशी, राहुल चव्हाण, प्रकाश चव्हाण, राजाभाऊ घोडके, विलास रासकर,तुषार रायकर आदी पदाधिकारी आणि विश्वस्त, लक्ष्य फाउंडेशनचे रोशन मराठे, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगमचे कमलेश यादव आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे, सुवर्णयुग तरूण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments