Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedवार्षिक डीएचएल एक्सप्रेस ‘राखी एक्सप्रेस’ मोहिमेत आंतरराष्ट्रीय पार्सल सेवांवर सवलती; केवळ ₹3,099...

वार्षिक डीएचएल एक्सप्रेस ‘राखी एक्सप्रेस’ मोहिमेत आंतरराष्ट्रीय पार्सल सेवांवर सवलती; केवळ ₹3,099 * मध्ये सर्व खर्चांसह सेवा उपलब्ध

ही सवलत 9 ऑगस्ट 2025 पर्यंत वैध असेल.
आंतरराष्ट्रीय राखी आणि भेटवस्तू पाठवणाऱ्यांसाठी सवलतीचा दर ₹3,099* पासून सुरू होतो, तर घरगुती शिपमेंटसाठी ₹250 पासून सुरू होतो.
ही ऑफर 700 हून अधिक DHL Express आणि ब्ल्यू डार्ट रिटेल केंद्रांवर तसेच DHL च्या वेबसाइटवर (https://bit.ly/459cmwq) उपलब्ध आहे.

मुंबई, 29 जुलै 2025: आंतरराष्ट्रीय एक्सप्रेस लॉजिस्टिक्स क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी DHL Express ने आपली वार्षिक सणासुदीची खास सेवा ‘राखी एक्सप्रेस’ सुरू केली आहे. ही सेवा भावंडांमधील राखीच्या नात्याचा सन्मान राखत अंतर कमी करते आणि ग्राहकांना आपल्या कुटुंबासोबत रक्षाबंधन साजरे करण्यास मदत करते. या उपक्रमाअंतर्गत आकर्षक सवलती देण्यात येत असून आंतरराष्ट्रीय राखी व भेटवस्तू पाठवण्यासाठी सेवा शुल्क केवळ ₹3,099* पासून सुरू होते. ही ऑफर DHL च्या संपूर्ण भारतभरातील 700 हून अधिक रिटेल केंद्रांवर आणि अधिकृत वेबसाइटवर 9 ऑगस्ट 2025 पर्यंत वैध आहे. ही ऑफर स्टोअरमध्ये वापरणाऱ्या ग्राहकांनी शिपमेंट बुक करताना फक्त RAKHIGIFTS हा प्रोमो कोड वापरावा लागेल.

रक्षाबंधन हा सण भावंडांमधील नात्याचा—विशेषतः परस्पर प्रेम आणि संरक्षणाचा—सन्मान करतो. आजच्या परस्परसंलग्न जगात शैक्षणिक कारणे, व्यावसायिक जबाबदाऱ्या किंवा जीवनशैलीमुळे अनेक वेळा कुटुंबे भौगोलिकदृष्ट्या विभक्त होतात, ज्यामुळे रक्षाबंधनासारखे सण एकत्र साजरे करणे कठीण होते. ‘राखी एक्सप्रेस’च्या माध्यमातून DHL एक्सप्रेस अशा कुटुंबांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना संदीप जुनेजा, उपाध्यक्ष – कमर्शियल, DHL एक्सप्रेस इंडिया म्हणाले, “DHL मध्ये व्यापार सुलभ करणे आणि लोकांना जोडणे हेच आमचे प्रमुख काम आहे. रक्षाबंधनासारख्या सणांदरम्यान, आमचे प्रत्येक ग्राहक त्यांच्या प्रियजनांसोबत प्रत्यक्ष हजर नसले तरीही ‘घरी असण्याची’ आठवण अनुभवावी, हीच आमची इच्छा असते. दरवर्षी ‘राखी एक्सप्रेस’ हे दूर अंतरामुळे विभक्त झालेल्या कुटुंबांसाठी प्रेमाचे दुवे निर्माण करणारे माध्यम बनते. यंदा आम्ही एक आकर्षक ऑफर घेऊन आलो आहोत, जिच्यामध्ये आंतरराष्ट्रीय शिपमेंट्स केवळ ₹3,099* पासून सुरू होतील. ‘राखी एक्सप्रेस’च्या माध्यमातून आम्ही केवळ उत्कृष्ट सेवा पुरविण्याचा नाही, तर आनंद, प्रेम आणि या सणाशी जोडलेल्या आठवणी जगभरातील आमच्या ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत.”

DHL एक्सप्रेस चे जागतिक नेटवर्क 220 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये कार्यरत असून, जलद व विश्वासार्ह पार्सल सेवा आणि सुरळीत वितरणासाठी एंड-टू-एंड शिपमेंट ट्रॅकिंग सुविधा पुरवते. ग्राहक त्यांच्या शिपमेंट्सचा मागोवा घेऊ शकतात, वेळोवेळी SMS व ईमेलद्वारे अद्ययावत माहिती मिळवू शकतात, तसेच ‘ऑन डिमांड डिलिव्हरी’सारख्या सेवांचा लाभ घेऊन त्यांचे पार्सल कसे आणि केव्हा वितरित व्हावे हे स्वतः ठरवू शकतात—यामुळे संपूर्ण वितरण प्रक्रिया अधिक सुलभ व सोयीस्कर बनते.

या ऑफरबाबत अधिक माहितीसाठी ग्राहकांनी DHL Express शी टोल-फ्री क्रमांक 1800 30 345 वर संपर्क साधावा, https://bit.ly/46pTfjX या चौकशी पृष्ठाला भेट द्यावी किंवा https://bit.ly/459cmwq या DHL वेबसाइटवर जाऊन शिपमेंटसाठी अंदाजित दर मिळवावा आणि ऑनलाइन बुकिंग करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments