Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedरा.स्व.संघाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

रा.स्व.संघाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

🔹
पुणे – समरसता गतिविधी कात्रज व पर्वती भाग यांच्यावतीने आज शुक्रवार दि. 1 ऑगस्टला बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास 105 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. रा.स्व.संघाचे कात्रज भागाचे संघचालक शिवाजीराव मालेगावकर आणि समरसता गतिविधी प. महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्या डाॅ. उज्वलाताई हातागळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच सामाजिक समरसता मंच येरवडा आणि वडगाव शेरी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे सभागृह( गुंजन सिनेमा) येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी सद्भाव, समरसता मंच येरवडा आणि वडगाव शेरी विभाग तसेच विश्रांत वाडी नगरातील संघ कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments