Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान नितीन गडकरी यांच्या रुपाने महाराष्ट्रातील कृतीशील आणि संवेदनशील व्यक्तीमत्वाचा सन्मान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विचारांची ठाम भूमिका घेणारे आणि राष्ट्रसेवेची अखंड तळमळ असणारे असामान्य नेते होते. त्यांच्याच विचारावर चालणाऱ्या श्री.गडकरी यांची पुरस्कारासाठी झालेली निवड अत्यंत योग्य आहे. महाराष्ट्राचे सुपूत्र असलेल्या गडकरींनी पुरस्कार मिळणे ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे.नितीन गडकरी हे केवळ यशस्वी राजकारणी नसून प्रयोगशील शेतकरी आणि दूरदृष्टी असलेले उद्योजक आहेत. ते सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि विकासाची दृष्टी असलेले नेते आहेत.

श्री.गडकरी हे विकासाच्या विषयावर सतत चिंतन करणारे नेते असून आणि नवी माहिती एकत्रित करण्याचा ध्यास असतो. प्रत्येक निर्णय घेतांना त्यांचा विचार स्पष्ट असतो आणि निर्णयातही धडाडी दिसून येते. त्यामुळेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशात रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. त्यांनी पक्षीय राजकारणापुढे जावून समाजकारणाकडे लक्ष केंद्रीत केले. त्यांचे कार्य इतरांसाठी मार्गदर्शक आहे. बोलण्यातल्या स्पष्टपणासोबत स्वभावातील संवेदनशीलताही त्यांनी जपली आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास धरून त्यांनी अनेक महत्वाचे मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसीत केले आहेत. महाराष्ट्राच्या किर्तीचा सुगंध ते देशात पसरवीत आहेत. स्वभावातील विनय आणि सहकार्याचा धागा जपून वाटचाल करणाऱ्या विकासनिष्ठ, विवेकशील आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा हा सन्मान आहे, असे श्री.पवार म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहित टिळक यांनी केले.ते म्हणाले, १९८३ मध्ये कै.जयंतराव टिळक यांनी या पुरस्काराची सुरुवात केली. पहिला पुरस्कार एस.एम. जोशी यांना देण्यात आला होता. भारताला प्रगतीशील राष्ट्र करण्यासाठी आणि जगभरात देशाचा लौकीक वाढविणाऱ्या व्यक्तिंचा लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. देशभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान या पुरस्काराने करण्यात आला आहे. यावर्षी आपल्या कार्याने रस्त्यांच्या माध्यमातून देशाला जोडण्याचे कार्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ट्रस्टने एकमताने निवड केली आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी स्वर्गीय दिपक टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित व्यक्तिंच्या कार्याची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याला आमदार विजय शिवतारे, भीमराव तापकीर,

विश्वजीत कदम, बापूसाहेब पठारे तसेच हर्षवर्धन पाटील, प्रकाश जावडेकर आदी उपस्थित होते.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments