मुंबई, जुलै २३, २०२५ – कोटक महिंद्रा बँकेने आज कोटक सॉलिटेअरच्या लाँचची घोषणा केली. हा बँकिंग प्रोग्राम फक्त भारतातील श्रीमंत व्यक्तींसाठी डिझाइन करण्यात आला आहे. हे फक्त उत्पादन नाही तर विशेषाधिकार आहे.
सॉलिटेअर फक्त कोटकसोबत सखोल, बहुआयामी आर्थिक संबंध असलेल्या व्यक्ती व कुटुंबांसाठी आहे. हे उत्पादन खात्यामधील शिल्लकीबाबत नाही तर बँकेने ऑफर केलेल्या ठेवी, गुंतवणूका, कर्ज, विमा व डिमॅट होल्डिंग्जमधील टोटल रिलेशनशिप व्हॅल्यू (एकूण संबंध मूल्य) बाबत आहे आणि याचे कौटुंबिक स्तरावर गणन केले जाते.
”भारतात सधन वर्ग वेगाने वाढत आहे, पण त्यांचा बँकिंग अनुभव अद्यापही चांगला नाही,” असे कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष – एफ्लुएंट, एनआरआय व बिझनेस बँकिंगचे प्रमुख आणि मुख्य विपणन अधिकारी रोहित भासिन म्हणाले. ”सॉलिटेअर या तफावतीला दूर करण्याप्रती आमचा प्रतिसाद आहे. हे उत्पादन नाही तर तत्त्व आहे. सॉलिटेअर यशाला सन्मानित करते, महत्त्वाकांक्षेचा आदर करते आणि बँकिंग पद्धतींमध्ये नवीन बदल घडवून आणते.”
ग्राहकांकडून मिळालेल्या अभिप्रायामधून निर्मिती
सखोल संशोधनातून सधन ग्राहक आणि त्यांच्या बँकांमधील स्पष्ट दुरावा दिसून आला. त्यांना त्यांच्या बँकांपासून वंचित, दुर्लक्षित आणि भावनिकदृष्ट्या तुटलेले वाटले. कोटक यांनी त्यांचे म्हणणे ऐकले – आणि प्रत्यक्ष त्यांच्या मुख्य समस्यांचे निराकरण करणारे सोल्यूशन तयार केले:
– मान्यता आणि वैयक्तिकरणाचा अभाव
– वित्तीय उत्पादनांमध्ये खंडित सेवा
– कुटुंब-स्तरीय बँकिंग अनुभवाचा अभाव
– जीवनशैली आणि महत्त्वाकांक्षेकडे दुर्लक्षित करणाऱ्या सामान्य ऑफर
सॉलिटेअर: समृद्ध बँकिंगमधील नवीन मानक
सॉलिटेअर सर्वोत्तम फायद्यांसह उत्साहपूर्ण अनुभव देतो, जो ग्राहक आणि त्यांच्या कुटुंबाला प्रथम प्राधान्य देतो:
· गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्डसाठी ₹ ८ कोटी पूर्व-मंजूर क्रेडिट लाइन्स**
· पगारदार व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी सेगमेंट-स्पेसिफिक सोल्यूशन्स
· सामाईक क्रेडिट मर्यादा** आणि विशेषाधिकारांसह फॅमिली-फर्स्ट बँकिंग
· विनासायास, अधिक समर्थनासाठी समर्पित रिलेशनशिप अँड सर्विस मॅनेजर्स
· बँकिंग, संपत्ती, विमा^ आणि जीवनशैलीमधील कोटकच्या सर्वोत्तम गोष्टींचा एकत्रित अनुभव
सॉलिटेअर क्रेडिट कार्ड: विशिष्टतेसाठी डिझाइन केलेले
सॉलिटेअर अनुभवाचा भाग म्हणून कोटकने सॉलिटेअर क्रेडिट कार्ड लाँच केले आहे, ज्यामधून या प्रोगामचे तत्त्व दिसून येते:
· इन्व्हाइट-ओन्ली म्हणजेच केवळ निमंत्रितांसाठी: केवळ सॉलिटेअर ग्राहकांसाठी.
· सॉलिटेअर ग्राहकांसाठी कोणतेही वार्षिक शुल्क नाही.
· उच्च क्रेडिट मर्यादा.
· प्राथमिक आणि अॅड-ऑन्ससाठी अमर्यादित लाऊंज उपलब्धता. अतिथी प्रवाशांना देखील लाऊंज उपलब्ध होते. आता, संपूर्ण कुटुंबाला लाऊंज उपलब्ध होऊ शकते.
· कोटक अनबॉक्सद्वारे प्रवास खर्चावर १० टक्के एअर माइल्स मिळवा आणि इतर पात्र खर्चांवर ३ टक्के एअर माइल्स मिळवा, ज्यात अॅक्सिलरेटेड श्रेणींमध्ये प्रति स्टेटमेंट सायकल ₹ १,००,००० एअर माइल्सची मर्यादा आहे. कुटुंबासोबत प्रवासासाठी मोठी बचत.
· झीरो फॉरेक्स मार्कअप – तुमच्या सर्व खर्चांसाठी एक कार्ड.
· ७५०० रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी इंधन अधिभार माफ.
· एअरमाइल्ससाठी रिडेम्पशन पर्यायांची विस्तृत श्रेणी. यामध्ये फ्लाइट बुकिंग, हॉटेल्स आणि लोकप्रिय एअरलाइन व हॉटेल लॉयल्टी प्रोग्राममध्ये माइल्स ट्रान्सफर यांचा समावेश आहे.
”हे कार्ड तुम्हाला रिवॉर्ड देण्यासोबत तुमच्या प्रवासाचा आदर करते,” असे क्रेडिट कार्डसचे व्यवसाय प्रमुख फ्रेडरिक डिसूझा म्हणाले. ”अव्वल स्थानावर पोहोचलेल्या आणि त्यांच्या कुटुंबाला समान दर्जाची सेवा आणि ओळख मिळावी अशी इच्छा असलेल्या व्यक्तींसाठी हे कार्ड डिझाइन करण्यात आले आहे.”
विशिष्टतेला नेले नव्या उंचीवर
सॉलिटेअर फक्त निमंत्रणाद्वारे उपलब्ध आहे. ग्राहकांना त्यांच्या नातेसंबंध मूल्य आणि कोटकच्या परिसंस्थेमधील सहभागाच्या आधारावर निमंत्रित केले जाते. हा प्रोग्राम प्रमाणापेक्षा गुणवत्तेला आणि पोहोचेपेक्षा ओळखीला प्राधान्य देतो.
सॉलिटेअर कोटकचा विश्वास आणि उत्कृष्टतेच्या वारशावर आधारित आहे.
कोटक महिंद्रा बँक भारतातील आघाडीची वित्तीय संस्था आहे. भारतातील अव्वल १०० कुटुंबांपैकी ६० टक्के कुटुंबांचा संपत्ती व्यवस्थापनासाठी या बँकेवर विश्वास आहे. या सखोल आत्मविश्वासामुळे सॉलिटेअर अधिक सक्षम आहे. या तत्त्वामधून भारतातील सर्वात यशस्वी व्यक्ती आणि कुटुंबांच्या महत्त्वाकांक्षा दिसून येतात.


