पुणे, ५ ऑगस्ट २०२५ – फोर्स मोटर्स लिमिटेड या प्रमुख ऑटोमोटिव्ह कंपनी आणि भारतातील सर्वात मोठ्या व्हॅन उत्पादक कंपनीने नेक्स्ट-जनरेशन कनेक्टेड वेईकल प्लॅटफॉर्म फोर्स आयपल्सच्या लाँचची घोषणा केली आहे, जे कार्यचालन उत्कृष्टता आणि वेईकल जीवनचक्र व्यवस्थापनामध्ये नवीन मानक आणते. एआय-समर्थित अंदाजात्मक विश्लेषणाामध्ये जागतिक अग्रणी इन्टाअँगल्ससोबत सहयोगाने विकसित करण्यात आलेले फोर्स आयपल्स मुलभूत वेईकल कार्यसंचालनांमध्ये अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि प्रोप्रायटरी हायब्रिड अॅनालिटिक्सची भर करते.
प्रोजेक्ट डिजिफोर्सअंतर्गत प्रमुख ऑफरिंग फोर्स आयपल्स डिजिटल अपग्रेडच्या पुढे जात वेईकलची कार्यक्षमता, हेल्थ आणि कार्यसंचालन वर्तन समजण्याच्या व व्यवस्थापन करण्याच्या पद्धतीमध्ये मुलभूत बदल आणते. हा प्लॅटफॉर्म अंदाजात्मक माहिती देण्यासाठी सतत वेईकलचा हाय-रिझाल्यूशन डेटा प्राप्त करत त्याचा अर्थ लावतो, ज्यामुळे कार्यक्षमतेमधील घट त्वरित ओळखता येते आणि वेईकलमधील घटकांमध्ये बिघाड होण्याबाबत आधीच समजते.
समकालीन देखरेख सोल्यूशन्सच्या तुलनेत फोर्स आयपल्स विसंगतींचा अहवाल देण्यासोबत त्यांचे संदर्भ समजून घेते. ही यंत्रणा इंजिन, पॉवरट्रेन, इलेक्ट्रिकल आणि थर्मल सिस्टमसह प्रमुख सब-सिस्टममध्ये मूळ-कारणांचे विश्लेषण करते, ज्यामुळे वाढ आणि अनियोजित डाउनटाइम रोखण्यासाठी सक्रिय हस्तक्षेप करता येतो. पृष्ठभाग-स्तरीय लक्षणे आणि पद्धतशीर समस्यांमध्ये फरक करण्याची त्याची क्षमता फ्लीट ऑपरेटरना प्रतिक्रियात्मकपणे नव्हे तर अचूकपणे कार्य करण्यास सक्षम करते.
”फोर्स मोटर्समध्ये आमचा मूल्य-संचालित नाविन्यतेवर विश्वास आहे आणि हे लाँच उच्च दर्जाचे, सर्वोत्तम गतीशीलता सोल्यूशन्स वितरित करण्यासाठी आमच्या मिशनमधील आणखी एक पाऊल आहे. फोर्स आयपल्स तंत्रज्ञान सोल्यूशनपेक्षा अधिक असून ग्राहकांसाठी व्यवसाय सक्षमकर्ता आहे. हे सोल्यूशन पारदर्शकता आणते, कार्यक्षमता सुधारते आणि कार्यसंचालनांमध्ये सुरक्षिततेची खात्री देते, ज्याद्वारे ग्राहक त्यांच्या ताफा कार्यसंचालनांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकतात. आम्हाला विश्वास आहे की, ग्राहक व आमचे सहयोगी या उपक्रमाचे भरभरून कौतुक करतील, तसेच हा उपक्रम आम्हाला ग्राहकांना उत्साहित करण्याची आमची कटिबद्धता अधिक दृढ करण्यास मदत करेल,” असे फोर्स मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रसन फिरोदिया म्हणाले.
सुरक्षित, क्लाऊड-केंद्रित आर्किटेक्चरवर डिझाइन करण्यात आलेला हा प्लॅटफॉर्म वेईकलमधील कार्यरत व मागील उत्कृष्टतेबाबत माहिती देतो, तसेच ही माहिती मोबाइल व डेस्कटॉपवर उपलब्ध होते. ड्रायव्हरचे वर्तन व इंधन कार्यक्षमता ते सिस्टम हेल्थ व कार्यक्षमता मापदंडांपर्यंत फोर्स आयपल्स कार्यसंचालनाबाबत एकीकृत दृश्य देते, ज्यामुळे ताफा व्यवस्थापकांना अकार्यक्षमता शोधण्यास, सर्वोत्तम पद्धती लागू करण्यास आणि मालकीची एकूण किंमत ऑप्टिमाइझ करण्यास मदत होते.
कार्यसंचालनामध्ये सातत्यता असण्याच्या खात्रीसाठी फोर्स मोटर्सने पुण्यातील मुख्यालयामध्ये समर्पित इंटेलिजन्स कमांड सेंटर स्थापित केले आहे. निदान तज्ञ व डोमेन स्पेशालिस्ट्सची टीम असलेली हे केंद्र रिमोट वेईकल मॉनिटरिंग, अलर्ट मॅनेजमेंट आणि तज्ञांच्या मार्गदर्शनांतर्गत समस्येचे निराकरण या सुविधा देते. २४/७ सपोर्ट पायाभूत सुविधेसह या क्षमतेला अधिक दृढ करण्यात आले आहे, जी वेळेवर साह्य करण्यासाठी आणि भारतातील डायनॅमिक ताफा क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. फोर्स आयपल्स आता फोर्स मोटर्सच्या ३०० हून अधिक टचपॉइण्ट्सच्या व्यापक डिलरशिप नेटवर्कच्या माध्यमातून उपलब्ध आहे, तसेच फोर्स मोटर्स आणि इन्टाअँगल्सच्या एकीकृत सर्विस टीम्सकडून प्रत्यक्ष तैनात व पाठिंबा दिला जातो.
”फोर्स मोटर्ससोबतचा सहयोग वास्तविक विश्वामध्ये दररोज आव्हानांचा सामना करणाऱ्या ऑपरेटर्सना उच्च प्रभावी तंत्रज्ञानासह साह्य करण्याची संधी आहे,” असे इन्टाअँगल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप पाटील म्हणाले. ”प्रगत निदान व अंदाजात्मक एआयसह फोर्स मोटर्सच्या उत्पादन क्षमतेशी जुळून जाण्याचे आमचे ध्येय आहे, जे यंत्रणेमधील दृश्यमानता वाढवते, देखरेखीसंदर्भातील नियोजनामध्ये सुधारणा करते आणि वेईकल जीवनचक्रामध्ये अधिक आत्मविश्वासपूर्ण, डेटाचे पाठबळ असलेले निर्णय घेण्यास सक्षम करते. आम्हाला या विभागाला सर्वोत्तमपणे सेवा देण्यासाठी


