पुणे, ६ ऑगस्ट २०२५ :आरोग्यसेवा प्रदान करत असताना पर्यावरणाप्रती जबाबदारीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरने ‘नोबलराईज’ हा शाश्वतता आणि पर्यावरणासाठी नवोपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम रुग्णाप्रमाणेच पर्यावरणाला केंद्रस्थानी ठेवण्याच्या रुग्णालयाच्या वचनबद्धतेला प्रतिबिंबित करतो.
रुग्णालयाच्या १८ व्या स्थापना दिन समारंभादरम्यान सुरु करण्यात आलेले नोबलराईज हे विविध विभागांमधील आरोग्य सेवकांच्या सहयोगाने सुरु करण्यात आलेली शाश्वतता मोहीम आहे. या उपक्रमाचे औपचारिक अनावरण नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने आणि संचालक डॉ. दिविज माने यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सध्या राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण, पर्यावरणपूरक आणि ऊर्जेचे संवर्धन करणाऱ्या उपाय योजनांमध्ये रुग्ण विश्रांती घेताना ऊर्जेची बचत, शस्त्रक्रिया कक्षांव्यतिरिक्त जागांमध्ये कपडे धुण्यासाठीचे पाणी तसेच रसायनांचा वापर कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक काउच रोल्स, चिकित्सा कक्षाव्यतिरिक्त डिस्पोजेबलच्या जागी पुन्हा वापरता येणारे हेवी-ड्युटी ग्लोव्हज, कर्मचाऱ्यांसाठी सिंगल-यूज पेपर कपच्या जागी सिरेमिक कप, ऑटोमेटेड टॅप आणि नैसर्गिक दुर्गंधीनाशक एजंट्सने सुसज्ज सेन्सर-बेस्ड वॉशरूम, बॅटरीचा अपव्यय कमी करण्यासाठी रिचार्जेबल वैद्यकीय उपकरणे आणि ऊर्जेच्या दीर्घकालीन कार्यक्षमतेसाठी सोलआरएक्स हे सौर पॅनेल यांचा समावेश आहे.कर्मचारी आणि रुग्णालयात येणाऱ्या लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांना सहभाग वाढविण्यासाठी रुग्णालयाच्या लॉबीमध्ये या हरित उपक्रमांचे प्रदर्शन करण्यात आले होते.
नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने म्हणाले की, “एकदंर पर्यावरण आणि समाज साठी सर्वांनी एकत्र येणे ही केवळ एक संकल्पना नसून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. लाईफ इज प्रेशियस … वुई केअर फॉर इट हेच आमचे बोधवाक्य असून रुग्णांसह त्यांच्या भोवतालच्या वातावरणाचीही काळजी घेणे महत्वाचे आहे.नोबलराईज द्वारे रुग्णसेवेमध्ये करुणा, अभिनवता आणि शाश्वतता या तत्वांसाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की, “नोबलराईज या उपक्रमाबाबत विशेष बाब म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पुढाकार. परिचारिका ते तंत्रज्ञ, सर्वजण एक हरित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी योगदान देत आहेत.ही सामूहिक जबाबदारी आहे.आरोग्यसेवक म्हणून आम्ही फक्त रुग्णांच्या आरोग्याबरोबरच ते ज्या वातावरणात बरे होतात ते वातावरण चांगले असणे गरजेचे आहे. रुग्णसेवा किंवा चिकित्सा कार्यक्षमतेशी तडजोड न करता, शाश्वततेच्या दृष्टिकोनातून दैनंदिन वापरात असलेल्या वस्तू आणि पद्धतींचा पुनर्विचार करण्यासाठी नोबलराईज आमच्या टीमना प्रोत्साहित करते.”
डॉ. दिविज माने पुढे म्हणाले की, मागील काही वर्षात उचललेल्या महत्वाच्या पावलांना हा उपक्रम पुढे नेत आहे. याआधी गेल्या काही वर्षात उचलेल्या काही पर्यावरणपूरकतेच्या दृष्टीने हाती घेतलेल्या उपक्रमांमध्ये अद्ययावत स्मार्ट एचव्हीएसी (हीटिंग, व्हेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग) प्रणाली,ऊर्जेचा वापर वाचवण्यासाठी चिलर्सचे आधुनिकीकरण,जास्त खरेदी किंमत असली तरीही पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याचा वापर या सर्वाचा समावेश आहे. याशिवाय,आमची ४० टक्के ऊर्जा सौर ऊर्जेसारख्या अक्षय्य ऊर्जा स्रोतांमधून येते. सामान्य कचऱ्याचे व्यवस्थित वर्गीकरण ज्यामुळे हा कचरा हा उघड्यावर जाणार नाही अशा अनेक गोष्टींबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत.
समूह कार्यकारी अधिकारी डॉ.संजय पठारे म्हणाले की, रुग्ण आणि पर्यावरण या दोघांचीही काळजी घेत आरोग्यसेवा प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे.
गुणवत्ता आणि नर्सिंग सेवाच्या संस्थापिका तृप्ती नंदा म्हणाल्या की, “पुण्यातील एकमेव जेसीआय-मान्यता प्राप्त रुग्णालय म्हणून, नोबल हॉस्पिटल्स केवळ चिकित्सक सेवेमध्येच नव्हे तर कार्यरत शाश्वततेमध्येही आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती अवलंबण्यासाठी करण्यासाठी वचनबद्ध आहे. आपल्या रुग्णांसाठी असो, लोकांसाठी असो किंवा आपल्या पर्यावरणासाठी असो जेसीआयची तत्वे फक्त मानके नसून ती आमची कार्य संस्कृती आहे.


