Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedद इंडियन गराज कंपनीचे दुसरे स्टोअर सुरु

द इंडियन गराज कंपनीचे दुसरे स्टोअर सुरु

पुणे,७ ऑगस्ट २०२५ : भारतातील आघाडीच्या फास्ट फॅशन ब्रँडसपैकी एक असलेल्या द इंडियन गराज कंपनी ( टीआयजीसी) तर्फे नुकतेच एल्प्रो मॉल मध्ये पुण्यातील आपले दुसरे स्टोअर सुरु करण्यात आले आहे.एल्प्रो मॉल मधील हे दालन १३७२ चौरस फूट विस्तारलेले असून जेन- झी पिढीला आकर्षक खरेदी अनुभव देईल. या स्टोअर मध्ये इंडियन गराजचे नवीन कलेक्शन्स असून स्ट्रीट वेअर, रिसॉर्ट स्टाईल, फॅनडम मर्च, ग्लोबल फिट्स, पोलो इत्यादीचा समावेश असून तरूण फॅशन जागरूक लोकांसाठी त्यांच्या विविध आवडी-निवडीनुसार डिझाईन केले गेले आहे.

ॲमनोरा मॉल येथील आपल्या पहिल्या स्टोरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, हे नवीन स्टोर द इंडियन गराज कंपनीची पुण्यातील उपस्थिती आणखी दृढ करीत असून भारताच्या फॅशन बाजारपेठेत विस्तार करण्याच्या आपल्या धोरणात्मक दृष्टीशी सुसंगत आहे.

ह्या स्टोरचे उदघाटन हे इंडियन गराज कंपनीच्या रिटेल विस्तार धोरणाचा एक भाग असून पुढील विस्तारामध्ये महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथे नवीन दालने सुरु करण्यात येतील. देशभरातील टियर-१ आणि टियर-२ शहरांमध्ये जागतिक, जलद, कार्यात्मक आणि फॅशनेबल उत्पादने आणण्याच्या ब्रँडच्या ध्येयाशी हे पाऊल सुसंगत आहे.

द इंडियन गराज कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत तांतेड म्हणाले की, “पुण्यामधील दुसरे दालन हे इंडियन गराज कंपनीच्या ऑफलाईन विस्तार धोरणामधील एक महत्वाचा क्षण आहे. नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि शहरातील फॅशन फॉरवर्ड समुदायाबरोबर आमचा संपर्क अधिक दृढ करण्यासाठी एल्प्रो मॉल मधील दालन एक उत्तम संधी प्रदान करते.”

द इंडियन गराज कंपनीच्या रिटेल प्रमुख अलका डेम्बला म्हणाल्या की, “आम्ही आधुनिक जागा निर्माण करण्यासाठी समर्पित आहोत जी केवळ दुकानेच नाहीत तर ती शैली, अभिव्यक्ती आणि प्रेरणेचे केंद्र असतील. एल्प्रो मॉल चे स्टोर पुण्यातील उत्साही युवा संस्कृती प्रतिबिंबित करण्यासाठी डिझाइन केले आहे, जे सर्व खरेदीदारांसाठी उत्कृष्ट रिटेल अनुभव प्रदान करते.”

एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट्स व्यतिरिक्त, इंडियन गॅरेजचे कलेक्शन www.TIGC.in वर ऑनलाइन उपलब्ध आहेत, संपूर्ण भारतातील ऑफलाइन स्टोर्समध्ये आणि मिंत्रा,अजिओ,अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि युएईच्या नून सारख्या आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. ब्रँड चे एलप्रो मॉल सह भारतात 9 स्टोअर्स आहेत व पुढील 3 ते 5 वर्षात 100 स्टोअर्स सुरू करण्याची योजना आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments