Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedमर्सिडीज- बेंझतर्फे भारतातील टॉप- एंड लक्झरी परफॉर्मन्स पोर्टफोलिओ आणखी आकर्षक थरारक मर्सिडीज-...

मर्सिडीज- बेंझतर्फे भारतातील टॉप- एंड लक्झरी परफॉर्मन्स पोर्टफोलिओ आणखी आकर्षक थरारक मर्सिडीज- एएमजी सीएलई ५३ 4मॅटिक+ कुपेचे भारतात पर्दापण या हाय परफॉर्मन्स लक्झरी कुपेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, ट्रॅक- ब्रेड इंजिनियरिंग, वेग, सी- क्लासचा स्पोर्टीनेस व ई- क्लासचा प्रशस्तपणा आणि स्टेटस यांचा मेळ

मर्सिडीज- एएमजी सीएलई ५३ 4मॅटिक+ कुपे लक्झरी परफॉर्मन्स क्षेत्रात नव्याने समीकरणे प्रस्थापित करण्यासाठी सज्ज असून आमची टॉप- एंड लक्झरी उत्पादन श्रेणी आणखी मजबूत होणार आहे. जबरदस्त कामगिरी करणारी ही कुपे ड्रायव्हिंग परफॉर्मन्स आणि आकर्षक स्वरूप यांचा मेळ घालणारी आहे. २०२५ मध्ये झालेल्या आठ लाँचेसनंतर आमचे टॉप- एंड लक्झरी वाहनांचे धोरण यशस्वी ठरले असून त्याला ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बाजारपेठेत मर्सिडीज- बेंझला असलेली मागणीही वाढली आहे.” संतोष अय्यर, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, मर्सिडीज- बेंझ इंडिया

· ३.० लीटर एम २५६ एम इनलाइन सिक्स- सिलेंडर इंजिन, दुहेरी टर्बो चार्जिंगद्वारे 5,800-6,100 आरपीएम आणि 560 एनएम टॉर्कसह produces 330 kW (449 hp) निर्मिती

· इंटिग्रेटेड स्टार्टर- जनरेटरद्वारे (आयएसजी) कमी कालावधीच्या बुस्टिंगसाठी अतिरिक्त 17 kW (23 hp) आणि २०५ Nm चा पुरवठा, ४८- व्होल्ट ऑन- बोर्ड इलेक्ट्रिकल सिस्टीमसाठी पुरवठा

· अत्याधुनिक एमबीयूएक्स आणि एएमजीसाठीच्या खास डिस्प्लेमध्ये क्लासिक, स्पोर्ट आणि एएमजी एक्सक्लुसिव्ह सुपरस्पोर्ट मोडचा समावेश, सेंट्रल राउंड टॅकोमीटरसह

· पूर्णपणे व्हेरिएबल एएमजी परफॉर्मन्स 4MATIC+ ऑल व्हील ड्राइव्ह, रियर ते ऑल व्हीलदरम्यान सतत ट्रान्झिशन

· एएमजी स्पीडशिफ्ट टीसीटी ९जी ट्रान्समिशन अडॅप्टेड शिफ्ट टाइम्ससह, जलद प्रतिक्रिया, डबल- डिक्लचिंग सोय आणि मल्टीपल डाउनशिफ्ट्स

· एएमजी राइड कंट्रोल चासिस, स्टील सस्पेन्शनसह, स्पोर्टी स्प्रिंग- डॅम्पर सेटअप आणि अडॅप्टिव्ह अडजस्टेबल डॅम्पिंग सिलेक्टेबल, तीन चाकांमध्ये

· स्टँडर्ड रियर अक्सिल स्टियरिंग २.५ अंशाच्या सर्वाधिक स्टियरिंग व्हीलसह ऑपरेट होत असल्यामुळे जास्त चांगला वेग आणि स्थैर्य मिळते.

· ० ते १०० किमी अक्सलरेशन ४.२ सेकंदांत व इलेक्ट्रॉनिक मर्यादेसह टॉप- स्पीड २५० km/h (पर्यायी २७० km/h, एएमजी ड्रायव्हर्स पॅकेजसह)

· पाच एएमजी डायनॅमिक सिलेक्ट ड्रायव्हिंग प्रोग्रॅम्स – स्लिपरी, कम्फर्ट, स्पोर्ट, स्पोर्ट+ आणि कस्टमाइज्ड वाहनांच्या वैशिष्ट्यांसाठी इंडिव्हिज्वल

· संयुक्त इंधन वापर (WLTP): 9.3-9.7 l/100km

· मर्सिडीज- एएमजी सीएलई ५३ 4मॅटिक+ कुपेची किंमत १.३५ कोटी रुपये (एक्स शोरूम, पूर्ण भारतात)

पुणे – भारतातील सर्वात डिझायरेबल लक्झरी कार कंपनी मर्सिडीज- बेंझने आज असामान्य मर्सिडीज- एएमजी सीएलई ५३ 4मॅटिक+ कुपे लाँच करत भारतातील टॉप- एंड लक्झरी परफॉर्मन्स पोर्टफोलिओ आणखी मजबूत केला. हे स्पोर्टी, अभिजात, दोन दरवाजांचे मॉडेल सी- क्लासचा वेग आणि स्पोर्टीनेस व ई- क्लासची जागा, अभिजातता व स्टेटस अशा दोन्ही विश्वांचा मेळ घालणारं आहे. आकर्षक स्वरूप, जबरदस्त कामगिरीसह हे मॉडेल ड्रायव्हिंगचा असामान्य अनुभव देणारं आहे.

इनक्लाइन सिक्स- सिलेंडर, इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर आणि अतिरिक्त इलेक्ट्रिक कॉम्प्रेसर

सीएलई ५३ 4मॅटिक+मध्ये सर्वसमावेशक पद्धतीने अद्ययावत ३.० लीटर एम २५६एम इनक्लाइन सिक्स- सिलेंडर टर्बो इंजिनचे व्हर्जन देण्यात आले आहे. उच्च कामागिरी करणाऱ्या या इंजिनची ही नवी आवृत्ती एम २५६एम या नावाने ओळखली जात असून त्यात ऑप्टिमाइज्ड कंबशन चेंबर्स, नव्याने डिझाइन करण्यात आलेले इनलेट व आउटलेट चॅनेल्स, नवीन पिस्टन रिंग्ज, ऑप्टिमाइज्ड इंजेक्शन, एक्झॉस्ट गॅस टर्बोचार्जर यांचाही समावेश करण्यात आला आहे. नवीन अतिरिक्त इलेक्ट्रिक कॉम्प्रेसरसह याचे प्रेशर ०.४ बारवरून १.५ बारपर्यंत वाढते. पर्यायाने सातत्यपूर्ण ऑपरेशन्समधील ५६० एनएमचा उच्च टॉर्क आणि ओव्हरबूस्टमध्ये ६०० एनएम १२ सेकंदांपर्यंत मिळते.

मात्र, टॉर्कपेक्षा काय जास्त महत्त्वाचे आहे, तर त्याची उपलब्धता आणि इंजिनला एकंदर प्रतिसाद. सुधारित, अतिरिक्त इलेक्ट्रिक कंप्रेसर यासाठी जबाबदार आहे. हे आता दीर्घकाळ, जवळपास सतत चालू राहू शकते. ड्रायव्हर्सना हे जाणवू शकते, विशेषतः मध्यम वेग असताना. त्यासाठी एक्झॉस्ट गॅस टर्बोचार्जर उच्च कामगिरीसाठी मोठा बनवण्यात आला होता.

नवीन, अत्याधुनिक इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर (आयएसजी) गियरबॉक्स बेल हाउसिंगमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. ४८ व्होल्ट इलेक्ट्रिकल सिस्टीममधील मध्यवर्ती घटक असलेला आयएसजी इलेक्ट्रिकल जनरेटरचे काम करतो, शिवाय हायब्रीड सुविधाही हाताळतो. त्यामध्ये 17 kW (23 hp) ताकदीसह कमी कालावधीचे बुस्टिंग आणि २०५ एनएम टॉर्क, त्यातून सुधारणा, लोड पॉइंट शिफ्टिंग, सेलिंग आणि स्टार्ट- स्टॉप फंक्शनदरम्यान इंजिनचे जलद रिस्टार्ट यांचा समावेश होतो.

अडॅप्टेड स्विचिंग टाइम्स, उच्च कार्यक्षमता – एएमजी स्पीडशिफ्ट टीसीटी ९जी ट्रान्समिशन

३.० लीटर इन- लाइन इंजिनला एएमजी स्पीडशिफ्ट टीसीटी ९जी ट्रान्समिशनची जोड देण्यात आली असून त्यात अडॅप्टेड शिफ्ट टाइम्स, जलद हालचाल, दुहेरी डिक्लचिंग फंक्शन आणि विविध डाउनशिफ्ट्स यांचा समावेश आहे. अपशिफ्ट किंवा डाउनशिफ्ट लगेचच अमलात आणले जाते. ट्रान्समिशन तत्काळ काम करते, विशेषतः स्पोर्ट्स+ ड्रायव्हिंग प्रोग्रॅममध्ये आणि मॅन्युअल मोडमध्ये. डायनॅमिक अक्सलेरशन मॅन्युवर्स आणि अडजस्टेड शिफ्टिंग टाइम्स उपलब्ध आहेत. ते इंधन बचत करणाऱ्या ड्रायव्हिंग स्टाइलसह उपलब्ध असून ते निवडलेल्या ड्रायव्हिंग प्रोग्रॅमिंगवर अवलंबून असतं.

सर्व वैशिष्ट्ये सहज उपलब्ध – एएमजी डायनॅमिक सिलेक्ट

पाच एएमजी डायनॅमिक सिलेक्ट ड्रायव्हिंग प्रोग्रॅम – स्लिपरी, कम्फर्ट, स्पोर्ट, स्पोर्ट+ आणि इंडिव्हिज्वल, सीएलई ५३ ची वैशिष्ट्ये सहज हाताशी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यात कार्यक्षम, आरामदायी ते जास्त स्पोर्टी असे फरक देण्यात आले आहेत. महत्त्वाच्या निकषांमध्ये इंजिनचे जबाबदार वर्तन, ट्रान्समिशन, चासिस आणि स्टियरिंग मोडीफाय करण्यात आले आहेत. एएमजी डायनॅमिक सिलेक्ट ड्रायव्हिंग प्रोग्रॅम कोणताही असला, तरी ड्रायव्हरला एम बटन वापरून मॅन्युअलवर शिफ्ट करता येतं आणि स्टियरिंग व्हील शिफ्ट पॅडल्स वापरून गियर शिफ्ट करता येतात.

पूर्णपणे व्हेरिएबल एएमजी कामगिरी 4मॅटिक+ ऑल- व्हील ड्राइव्ह स्टँडर्ड स्वरूपात

पूर्णपणे व्हेरिएबल एएमजी कामगिरी 4मॅटिक+ ऑल- व्हील ड्राइव्हमध्ये ड्रायव्हिंगचा आनंद देण्यासाठी सर्वाधिक ट्रॅक्शन आणि उच्च दर्जाची सुरक्षा यांचा मेळ घालण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे, सर्व प्रकारच्या परिस्थितीत – कोरडे रस्ते, ओले किंवा निसरडे पृष्ठभाग यांवर ते कार्यक्षम ठरतात. रियर ते ऑल- व्हील ड्राइव्ह आणि आणि उलट प्रक्रियेतील ट्रान्झिशन सतत होतं, कारण इंटेलिजंट कंट्रोल वाहनाच्या संपूर्ण यंत्रणेत समाविष्ट करण्यात आलं आहे.

मध्यम वेग असताना आणि ऑल- व्हील ड्राइव्हची गरज नसताना फ्रंट अक्सेल पूर्णपणे डिकपल होतो. त्यामुळे कार्यक्षमता वाढते. ईएसपी स्पोर्ट सेटिंगपासून पुढे ड्रायव्हिंगचा प्रमुख भर रियरवर असतो.

स्वतंत्र एएमजी राइड कंट्रोल सस्पेन्शन आणि थ्री- स्टेज स्टियरिंग

अफाल्टरबाकमध्ये विकसित करण्यात आलेले एएमजी राइड कंट्रोल चासिस जास्त चपळ, जास्त न्युट्रल कॉर्नरिंग बिहेवियर आणि जास्त ट्रॅक्शनसाठी वापरले जाते. स्टील सस्पेन्शन, स्पोर्टी स्प्रिंग- डॅम्पर सेट- अप आणि अडॅप्टिव्ह अडजस्टेबल डॅम्पिंग यामुळे असामान्य ड्रायव्हिंग आणि आरामदायी रायडिंग यांचा मेळ घातला जातो. प्रत्येक चाकावरील डॅम्पिंग ड्रायव्हिंगच्या परिस्थितीशी आणि रस्त्यांशी वेगाने जुळवून घेते. नेमकेपणाने सांगायचे झाल्यास स्वतंत्र व्हॉल्व्हज आणि डॅम्पर्समधील कंप्रेशन डिरेक्शनमुळे ते शक्य होते. डॅम्पर कॅरेक्टरिस्टिक कर्व्ह तीन लेवलमध्ये आधीपासून निवडता येऊ शकतो – कम्फर्ट, स्पोर्ट आणि स्पोर्ट+

स्टँडर्ड रियर अक्सेल स्टियरिंग २.५ अंशाच्या सर्वाधिक स्टियरिंग अँगलसह काम करते. या अंशापर्यंत मागची चाके, पुढच्या चाकांच्या दिशेला १०० km/h वेगाने वळतात. त्यामुळे व्हीलबेसचे व्हर्च्युअल शॉर्टनिंग होते आणि त्याचे रुपांतर जास्त वेगवान टर्निंग, कमी स्टियरिंग आणि जास्त मॅन्युव्हरेबिलिटीमध्ये होते. १०० km/h पेक्षा जास्त वेग असताना मागची चाके पुढच्या चाकांना समांतरपणे – जास्तीत जास्त ७.० अंशांपर्यंत वळतात आणि ड्रायव्हिंगचे स्थैर्य वाढते.

स्वतंत्र उपकरणे आणि विशिष्ट डिस्प्लेसह इंटेरियर्स

याचे इंटेरियर पॅसेंजर्सचे अनोखी उपकरणे, खास मटेरियल्स आणि अत्याधुनिक एमबीयूएक्स इन्फोटेनमेंट सिस्टीमसह स्वागत करते. स्वतंत्रपणे मांडण्यात आलेला १२.३ इंच पूर्णपणे डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ११.० इंच ड्रायव्हर ओरिएंटेड सेंट्रल डिस्प्ले, युजर फ्रेंडली पोट्रेट फॉरमॅटमध्ये देण्यात आला आहे. त्याशिवाय त्यात ६४ रंगांसह अम्बियंट लायटिंगही देण्यात आले आहे.

ड्रायव्हर डिस्प्लेमध्ये ग्राहकांना क्लासिक, स्पोर्ट आणि एएमजी एक्सक्लुसिव्ह सुपरस्पोर्ट अशा वेगवेगळ्या डिस्प्ले स्टाइल्समधून निवड करता येईल. सुपरस्पोर्ट मोडमध्ये सेंट्रल राउंड टॅकोमीटर, डिझाइन्ड हॉरिझॉंटंल डिस्प्ले टॅकोमीटरच्या डाव्या आणि उजव्या बाजूला देण्यात आला आहे. ड्रायव्हरला एएमजी मेन्यूच्या मदतीने इंजिन डेटा, गियर इंडिकेटर, वॉर्म अप सेटअप, जी मीटर आणि रेस टायमर असे विविध खास डिस्प्ले वापरता येतील.

आर्टिकोमधील इंटिग्रल सीट्स मानवनिर्मित लेदर/मायक्रोकट ब्लॅक मायक्रोफायबर, एएमजी स्पेसिफिक ग्राफिक्ससह बनवण्यात आले आहेत. रेड कॉन्ट्रास्टिंग, टॉपस्टिचिंगमध्ये स्पोर्टीनेस आणि दमदार लॅटरल सपोर्ट यांचा मेळ घालण्यात आला आहे. डबल स्पोक डिझाइनमधील स्टँडर्ड, फ्लॅट बॉटम्ड, एएमजी परफॉर्मन्स स्टियरिंग व्हील आणि त्यात समाविष्ट असलेली बटन्स रोजच्या वापरासाठी, महत्त्वाच्या ड्रायव्हिंग सोयी व सर्व ड्रायव्हिंग सोयींसाठी इंटिट्युटिव्ह ऑपरेटिंग लॉजिक देतात.

तांत्रिक वैशिष्ट्यांचा आढावा

मर्सिडीज- एएमजी सीएलई ५३ 4मॅटिक+ कुपे

इंजिन

इनक्लाइन सिक्स सिलेंडर पेट्रोल इंजिन दुहेरी चार्जिंगसह

डिस्प्लेमेंट

2,999 cm³

रेटेड पॉवर

330 kW / 449 hp at 5,800-6,100 rpm

रेटेड टॉर्क

560 Nm (briefly 600 with overboost) at 2,200-5,000 rpm

रेटेड क्षमता आयएसजी

17 kW / 23 hp

रेटेड टॉर्क आयएसजी

205 Nm

ड्राइव्ह

पूर्णपणे व्हेरिएबल ऑल- व्हील ड्राइव्ह एएमजी परफॉर्मन्स 4मॅटिक+

ट्रान्समिशन

एएमजी स्पीडशिफ्ट टीसीटी ९ जी ट्रान्समिशन

अक्सलरेशन 0-100 km/h

4.2 सेकंद

सर्वोच्च वेग

250 km/h (optional 270 km/h)

एकत्रित इंधन वापर (WLTP)

9.3-9.7 l/100 km

एकत्रित CO₂ उत्सर्जन (WLTP)

212-220 g/km

किंमत आणि उपलब्धता

मर्सिडीज- एएमजी सीएलई ५३ 4मॅटिक+ कुपेची किंमत १.३५ कोटी रुपये (एक्स शोरून, भारत) असून तिचे बुकिंग मर्सिडीज बेंझच्या देशभरातील वितरकांकडे उपलब्ध असेल. या गाडीचे वितरण लगेच केले जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments