कला, संस्कृति, गायन, वादन, नृत्य, क्रीड़ा यांचा मनोहारी संगम असणाऱ्या ३७ व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये यंदा “जुळ्यांचे संमेलन” हा अभिनव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी पुणे व परिसरातील जुळ्यांच्या सहभागासाठी विनामूल्य नोंदणी करण्यात येत असून punefestival@gmail.com अथवा ७३८७००२०९७,९०४९०२३७६७ या व्हॉट्स अप क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन पुणे फेस्टिव्हल संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.
पुणे फेस्टिव्हल मधील “जुळ्यांचे संमेलन” मंगळवार दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होईल. या साठी सर्वांना विनामूल्य प्रवेश असेल. यामध्ये “जुळी अपत्ये होण्याची वैद्यकीय मीमांसा” या विषयावर तज्ञ डॉक्टरांचे व्याख्यान ‘जुळी अपत्यांची भविष्य भिन्न का असतात?’ या विषयावर प्रख्यात ज्योतिषांचे विवेचन, जुळ्यांची व पालकांची निवडक मनोगते, जुळ्यांचे सत्कार, केरळच्या माल्लापुराम जिल्ह्यातील कोडीन्ही या गावाला “जगाची जुळ्यांची राजधानी” असे संबोधले जाते. त्या गावात सर्वाधिक जुळी जन्माला येतात. त्या कोडीन्ही गावाच्या प्रमुख प्रतिनिधींचा सत्कार व मनोगत, जुळ्यांवर आधारित राम और शाम, सीता और गीता, जुडवा, अंगूर, किशन कन्हैय्या, चालबाज या जुळ्यांवर आधारित चित्रपटातील गाण्यांची चित्रफित व जुळ्यांवरील पुस्तकाचे प्रकाशन असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
ज्या कुटुंबात जुळी अपत्ये आहेत अथवा आपल्या परिचयातील कुटुंबांमध्ये जुळी असतील तर कृपया त्याचे नाव व मोबाईल क्रमांक ईमेल अथवा मोबाईल वर पाठवावे ही विनंती.
प्रवीण प्र. वाळिंबे
माध्यम समन्वयक
७३८७००२०९७/९८२२४५४२३४
३७व्या पुणे फेस्टिव्हल मधे* *”जुळ्यांच्या संमेलनासाठी” नाव नोंदणी सुरु*
RELATED ARTICLES


