Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedघरच्या मैदानावर सर्व सामने जिंकण्याचे पुणेरी पलटणचे ध्येय

घरच्या मैदानावर सर्व सामने जिंकण्याचे पुणेरी पलटणचे ध्येय

पुणे १४ डिसेंबर २०२३ – प्रो कबड्डीच्या १०व्या पर्वाचा तिसरा टप्पा आता उद्या शुक्रवारपासून पुण्यात सुरु होत असून, या घरच्या मैदानावर सर्व सामने जिंकण्याचे ध्येय पुणेरी पलटण संघाने ठेवले आहे.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सामने होणार असून, पुण्याची पहिली लढत हरियाना स्टिलर्सशी होणार आहे. सामन्याच्या पूर्व संध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पुणेरी पलटणचा कर्णधार अस्मल इनामदार आणि प्रशिक्षक बी. सी. रमेश दोघांनीही अपराजित राहण्याचा उद्देश व्यक्त केला. आमचा संघ घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्यासाठी कमालीचा उत्सुक आहे. आम्ही गेल्या वर्षी अंतिम फेरी गाठली होती. यावर्षी पुन्हा एकदा अंतिम फेरीचे उद्दिष्ट बाळगले आहे. या वेळी विजेतेपद पटकाविण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू असे कर्णधार अस्लम इनामदार म्हणाला.

नव्या पर्वात पहिल्या दोन सामन्यात पलटणने जयपूर पिंक पॅंथकर्स आणि यु मुम्बा संघाविरुद्ध विजय मिलवून झकास सुरुवात केली आहे. घरच्या मैदानावर आता त्यांची गाठ हरियाना स्टिलर्सविरुद्ध पडणार आहे. विजयी मालिका पुण्यातही सुरु ठेवण्यासाठी पलटणचे खेळाडू सज्ज आहेत. संघाच्या कामगिरीबाबत बोलताना बीसी रमेश म्हणाले, आम्ही आतापर्यंत दोन सामन्यात चांगला खेळ केला आहे. तेच सातत्य कायम राखून आम्ही पुण्यातही विजयी मोहिम कायम राखू असा विश्वास आहे. अंतिम फेरी गाठण्याचे उद्दिष्ट आहेच, पण त्यापूर्वी त्या मोहिमेला गती देण्यासाठी आम्ही याची सुरुवात घरच्या मैदानावरील चारही सामने जिंकून करण्याचे पहिले उद्दिष्ट बाळगले आहे.

संघ समतोल आहे. कर्णधार अस्लम इनामदार, उपकर्णधार महंमदरेझा शाडलोई यांना संघातील अन्य खेळाडूंची सुरेख साथ मिळत आहे. पुणेरी पलटणने आपल्या फ्रॅंचाईजीच्या युवा अकादमी आणि युवा पलटणच्या माध्यमातून स्वतःचा वेगळा संघ तयार केला आहे. यातूनच अस्लम, आकाश शिंगे आणि पंकज मोहितेसारखे खेळाडू उदयास आले.

पलटण संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश कांडपालव म्हणाले, या अकादमीने पुणेरी पलटण आणि भारतीय संघाला चांगले खेळाडू दिले आहे. अस्लम आणि आकाश नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघातून खेळले आहेत. असेच चांगले खेळाडू भविष्यातही घडविण्यासाठी आमची अकादमी प्रयत्नशील राहिल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments