14 डिसेंबर, 2023 – लेंट्रा या अग्रगण्य डिजिटल कर्ज देणार्या प्लॅटफॉर्मने, त्यांच्या लेंट्रा डिजिटल लेंडिंग समिट या वार्षिक मुख्य कार्यक्रमादरम्यान, त्यांच्या इंटेलिजंट लेंडिंग क्लाऊडची ओळख करून दिली.
डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्ममध्ये एआय चे इंटिग्रेशन करून लक्षणीय झेप घेत, लेंट्राने तीन अत्याधुनिक एआय -चालित उत्पादने सादर केली आहेत. याव्यतिरिक्त, त्यांनी आपल्या अस्तित्वातील उत्पादनांमध्ये 40 नवीन कार्ये समाविष्ट केली आहेत, जी सर्व एआयच्या क्षमतेचा लाभ घेण्यासाठी आणि बँका आणि एनबीएफसीसाठी व्यावहारिक उपयुक्तता प्रदान करण्यासाठी काळजीपूर्वक तयार केली गेली आहेत.
भारताच्या क्रेडिट वापराच्या अहवालातील प्रवृत्तींच्या विकासाबाबत सखोल समज आणि विश्लेषण आवश्यक आहे. लेंट्रामध्ये आम्ही एआयच्या सामर्थ्याचा वापर करून,आमच्या ग्राहकांसाठी उपलब्धता सुनिश्चित करून वैयक्तिकरण आणि स्थानिकीकरणाची वाढती मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.“ – अंकुर हांडा, मुख्य उत्पादन अधिकारी, लेंट्रा.
लेंट्राच्या इंटेलिजंट लेंडिंग क्लाऊड सोल्युशनची रचना ही स्थानिक भाषांची व्याप्ती वाढवण्यासाठी, प्रक्रियेचा वेग वाढवण्यासाठी आणि कार्याचा खर्च कमी करण्यासाठी विकसित होत असलेल्या गरजेची पूर्तता करण्यासाठी केलेली आहे.
एआय ने अलीकडच्या काही काळात विविध कारणांमुळे व्यापक प्रमाणात लक्ष वेधून घेतले आहे, ज्यामध्ये माणसासारख्या परस्पर संवादाच्या त्याची क्षमता वेगळी ठरत आहे. पतधोरणाचे लोकशाहीकरण करण्यासाठी आणि बुद्धिमान निर्णयांद्वारे आर्थिक समावेशकतेला चालना देण्यासाठी कर्जदात्यांना सक्षम करून कर्ज देण्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या आमच्या ध्येयाशी सुसंगत असणारी एआय उत्पादने आणि एआय -प्रेरित वैशिष्ट्यांची लाट आणण्यास आम्ही उत्सुक आहोत. या विस्तारित पोर्टफोलिओमुळे आम्हाला असा विश्वास आहे की, आमचे ग्राहक त्यांच्या व्यवहार्य बुद्धिमत्तेसह सुसज्ज असलेल्या व्यवसायात लक्षणीय सुधारणा अनुभवतील. रंगराजन वासुदेवन, मुख्य माहिती अधिकारी, लेंट्रा.
भारतातील बँका आणि एनबीएफसीसाठी बुद्धिमानतेने स्वयंचलित उपाययोजनांमध्ये लेंट्रा एआयच्या वापरास सक्रियपणे पुढे नेत आहे. या उपाययोजनांमध्ये विद्यमान ग्राहक समूहातील संभाव्य कर्जदारांचा संच ओळखण्यासाठी मशीन लर्निंग मॉडेल्सचा लाभ घेणे, बुद्धिमानतेने ग्राहक सहभाग आणि आणि लीड मिळविण्यायोग्य वातावरणनिर्मितीसाठी एआयचा वापर करणे यांचा समावेश आहे. बँकेसाठी अगदीच वैयक्तिद्भत उत्पादन शिफारशींची अंमलबजावणी करून विक्री वाढवण्यासाठी आणि क्रॉस-सेलच्या संधी वाढवण्यासाठी हे वर्तणुकीशी निगडीत बुद्धिमत्तेचा उपयोग करते.
प्रभावी उपयोजनांमध्ये रुजलेले हे उपक्रम, लेंट्राच्या नवनिर्मितीसाठीच्या वचनबद्धतेचा पुरावा आहेत. त्यांचा इंटेलिजंट लेंडिंग क्लाऊड हा सध्याच्या गरजा पूर्ण करतो आणि बाजारातील योजनाबद्ध हालचालींचा अंदाज लावतो व त्याद्वारे त्यांच्या भागीदारांना आलेखामध्ये पुढे ठेवतो.
एनआयएम स्वत:च एक अविभेदक विक्रेय वस्तू बनल्यामुळे बँकांमधील फोकस हा ‘अनुभव’ ठरत आहे. आम्ही आमच्या नवीन ग्राहकांसाठी एक साधा, सोपा आणि तरीही सुंदर अनुभव कसा तयार करू शकतो? तोच खरा फरक आहे! कर्ज देण्याच्या जगतातील ट्रिक-पोनीजपैकी कर्जाच्या विविध घटकांची पूर्तता करणारे अगदीच थोडे आहेत. येथेच लेंट्रा ही एकमेव पणे वेगळी ठरते. त्यांचे एआय -चालित उपाय हे संपूर्ण कर्ज देण्याच्या आणि संकलनाच्या प्रक्रियेतील मतभेद दूर करतात, ज्यामुळे जलद, न्याय्य आणि अधिक अचूक असणारे निर्णय घेता येतात. लेंट्रा त्यांच्या बुद्धिमत्तायुक्त उपायांच्या सीमांना सातत्याने कशाप्रकारे विस्तारत आहे आणि अंतिम ग्राहकांसाठी सुंदर अनुभव कशाप्रकारे तयार करत आहे याने आम्ही प्रभावित आहोत.“ – सायरस दारूवाला, व्यवस्थापकीय संचालक, जागतिक वित्तीय सेवा, आयडीसी


