Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedबीएनसीए तर्फे स्टुटगार्ट तंत्रज्ञान विद्यापीठात मेम्ब्रेन स्ट्रक्चर्सवर कार्यशाळा

बीएनसीए तर्फे स्टुटगार्ट तंत्रज्ञान विद्यापीठात मेम्ब्रेन स्ट्रक्चर्सवर कार्यशाळा

पुणे,21 ऑगस्ट 2025 : डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमनच्या (बीएनसीए) आर्किनिअरींग विभागाने आयएमएस बाउहाऊस,देसाऊच्या सहकार्याने स्टुटगार्ट टेक्नोलॉजी युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस येथे एक मेम्ब्रेन स्ट्रक्चर्स या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती.

बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप यांच्या पुढाकारातून ही कार्यशाळा आयोजित केली. मेम्ब्रेन स्ट्रक्चर्स आर्किटेक्चरमध्ये कमी जाडीचे व लवचिक साहित्याचा वापर मोठ्या बांधकाम क्षेत्रासाठी केला जातो. अशा बांधकाम रचनांचे स्थैर्य व आकार या साहित्यावरील ताणावर अवलंबून असते,ज्यामुळे कमीत कमी सामग्री वापरांसह वैशिष्ट्यपूर्ण आकार तयार करता येतात.

ताण असलेली वास्तूरचनाशास्त्र (टेनसाईल आर्किटेक्चर) यासारखे पारंपरिक अभ्यासक्रमात समाविष्ट नसलेल्या विषयांबाबत प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांना पारंपारिक संरचनांपासून वेगळे असलेल्या ताणण्याजोगे व लवचिक साहित्याच्या वापराबाबत स्पष्टता आली. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना नवीन डिझाईन दृष्टीकोन,तांत्रिक कौशल्य व नाविन्यपूर्ण बांधकाम प्रणालींबाबत वेगळा दृष्टीकोन मिळाला. विद्यार्थ्यांबरोबर या कार्यशाळेत बीएनसीएच्या आर्किनिअरींग विभाग प्रमुख प्रा.डॉ.पूर्वा कुलकर्णी सहभागी झाल्या.तसेच या कार्यशाळेत स्टुटगार्ड विद्यापीठातील प्रा.सारा वॉन्डरवीथ आणि डॉ.हायड्रन वॉगनर बाल्झ यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत सहभागी झालेल्या बीएनसीएच्या 12 विद्यार्थिंनीना याबद्दल प्रमाणपत्रे देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments