Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिकमार विद्यापीठातर्फे ९वी आंतरराष्ट्रीय परिषद २२ पासून इंटरनॅशनल कॉन्फरेंस ऑन कंस्ट्रक्शन, रियल...

निकमार विद्यापीठातर्फे ९वी आंतरराष्ट्रीय परिषद २२ पासून इंटरनॅशनल कॉन्फरेंस ऑन कंस्ट्रक्शन, रियल एस्टेट, इफ्रास्ट्रक्चर अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट (ICCRIP)

पुणे, २० ऑगस्टः बांधकाम क्षेत्रात देशातील पहिले अग्रणी असलेल्या निकमार विद्यापीठातर्फे कंस्ट्रक्शन, रियल एस्टेट, इफ्रास्ट्रक्चर अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट (ICCRIP) या विषयावर दोन दिवसीय ९वी आंतरराष्ट्रीय परिषद दि.२२ व २३ ऑगस्ट २०२५ दरम्यान बाणेर येथील निकमार विद्यापीठाच्या सभागृहात होणार आहे. या परिषदेत बांधकाम क्षेत्रातील शेकडो मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी महिती परिषदेचे समन्वयक व निकमार विद्यापीठाच्या संशोधन व विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. रजनीकांत राजहंस यांनी दिली.
या परिषदेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि.२२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वा. हिंदूस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी लि.चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अर्जुन धवन यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. यावेळी सीडीआयआरचे महासंचालक श्री.अमित प्रोठी व एल अँड टी चे कार्यकारी समिती सदस्य व अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांचे सल्लागार एम.व्ही. सतीश यांचे बीजभाषण होईल. तसेच निकमार विद्यापीठाचे अध्यक्ष व चिफ पॅट्रन प्रा.डॉ. विजय गुपचूप, पॅट्रन व कुलगुरू डॉ. सुषमा एस. कुलकर्णी उपस्थित राहतील.
या परिषदेमध्ये ५०हून अधिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. १८ देशातील २००हून अधिक संशोधक पेपर सादर केले जाईल. ही परिषद सहा प्रमुख श्रेणींवर लक्ष केंद्रित असेल. या मध्ये संशोधन, केस स्टडीज, डॉक्टरेट संगोष्ठी, प्रॅक्टिशनर्सचे दृष्टिकोन, उद्योग प्रदर्शन आणि हॅकेथॉनचा समावेश असेल.
परिषदेत निकमार विद्यापीठाचे माजी महासंचालक डॉ. मंगेश जी. कोरगावकर, एचसीसी लि.चे माजी संचालक एन.आर.आचार्यूलू, आयआयटी मद्रासचे प्रा.डॉ.कोशी वर्घसे, टाटा प्रोजेक्ट लि.चे एच.आर.प्रमुख अधिकारी रितेश प्रतापसिंग सहभागी होऊन विचार मांडतील.
शनिवार, २३ ऑगस्ट रोजी सायं. ५.३० वा. होणार्‍या समारोप समारंभात हरियाणाचे प्रमुख माहिती आयुक्त डॉ.टी.व्ही.एस.एन.प्रसाद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यावेळी युनिव्हर्सिटी टेक्नॉलॉजी मलेशियाच्या विकास विभागाचे उपकुलगुरू प्रा.टी.एस.ईडी. टोनिझम महमद, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे बोर्डच्या प्रमुख श्रीमती जया वर्मा-सिन्हा व सीओडब्ल्यूआय इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती विद्या बासरकोड हे बीजभाषण देणार आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments