~ हाफ सीए सीझन 2 चे मोफत स्ट्रिमिंग 27 ऑगस्टपासून खास करून अमेझॉन एमएक्स प्लेयरवर ~
मुंबई, भारत-21 ऑगस्ट 2025: अॅमेझॉनची विनामूल्य व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा असलेल्या अॅमेझॉन एमएक्स प्लेयर’ने हाफ सीएच्या दुसऱ्या भागासाठी बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना आर्ची आणि नीरजच्या आयुष्याची जवळून झलक मिळाली आहे. पहिला हंगाम जिथे संपला तिथून पुढे जात, ही मालिका आर्ची मेहताची व्यक्तिरेखा खुलवते आहे, त्यात आर्ची तीन वर्षांच्या आर्टिकलशिपसह आपल्या व्यग्र अभ्यासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करते. दरम्यान, नीरज गोयल सीएच्या अंतीम परीक्षेच्या शेवटच्या प्रयत्नासाठी सज्ज होतो आहे. परंतु यशाचा मार्ग गुंतागुंतीचा आहे आणि अशास्थितीत त्याचा भूतकाळ पाठलाग करतो आहे. एहसास चन्ना, प्रीत कमानी, ग्यानेंद्र त्रिपाठी, ऐश्वर्या ओझा, अनमोल कजानी आणि रोहन जोशी यांच्या अप्रतिम सादरीकरणासह ही मालिका प्रत्येक फ्रेममध्ये प्रामाणिकता आणि सापेक्षता आणते. ‘द व्हायरल फीवर’ निर्मित, ततसत पांडे, हरीश पेड्डिंती आणि खुशबू बैद लिखित ‘हाफ सीए सीझन 2’ चे दिग्दर्शन प्रतीश मेहता यांनी केले आहे.
व्यावसायिक डेडलाईन्सचा समतोल राखणे, परीक्षेची तयारी आणि वैयक्तिक त्यागाच्या प्रवासातील सर्वात आव्हानात्मक टप्प्या अनेक सीए इच्छुकांना पार करावा लागतो. त्याचीच वास्तववादी झलक या ट्रेलरमध्ये दिसते. आर्ची तिच्या आर्टिकल्सशिपसाठी प्रयत्न करत असताना, नीरजला त्याची अंतीम सीए परीक्षा उत्तीर्ण करण्याच्या मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागतो. दोघांसाठीही ही सहनशक्ती, लवचिकता आणि आत्मविश्वासाची चाचणी आहे.
अमेझॉन एमएक्स प्लेअरचे कंटेंट हेड अमोघ दुसाद म्हणाले, “अमेझॉन एमएक्स प्लेअरमध्ये आम्ही भारताची दैनंदिन स्वप्ने, संघर्ष आणि विजय प्रतिबिंबित करणाऱ्या कथा आणण्यासाठी वचनबद्ध आहोत. हाफ सीए ही अशीच एक कथा आहे- महत्वाकांक्षा, मैत्री आणि उद्दिष्टांचा अथक पाठपुरावा यांचे प्रामाणिक, भावनिकदृष्ट्या समृद्ध चित्रण करण्यात आले. सीझन 1 ने देशभरातील प्रेक्षकांना खिळवून ठेवले आणि सीझन 2 मध्ये, आम्ही पात्रांच्या जीवनात खोलवर प्रवेश करतो, मोठे अडथळे आणि मजबूत हृदयस्पर्शी क्षणांचा वेध घेतो.”
द व्हायरल फिव्हरचे प्रेसिडेंट विजय कोशी पुढे म्हणाले, “टीव्हीएफमध्ये आम्ही नेहमीच खऱ्या वाटणाऱ्या कथा सांगण्यावर लक्ष केंद्रित करतो कारण त्या लोकांशी जोडल्या गेलेल्या अनुभवांमध्ये रुजलेल्या असतात. सीए क्षेत्र महत्त्वाकांक्षी आहे. तरीही ते इतक्या प्रामाणिकपणे पडद्यावर क्वचितच दाखवले जाते. हाफ सीए सीझन 2 मध्ये, आर्ची आणि नीरज यांना अधिक जोखमीच्या आणि कठीण निवडीचा सामना करावा लागतो. ज्यामुळे त्यांचा प्रवास आणखी मनोरंजक बनतो. अमेझॉन एमएक्स प्लेयरबरोबर भागीदारी केल्याने आम्हाला ही कथा संपूर्ण भारतातील कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवता येते, ती मोफत ऑनलाइन माध्यमापासून लपवण्याची आवश्यकता नाही.”
या मालिकेतील आर्ची मेहताची भूमिका साकारणारे अहसान चन्ना म्हणाली, “सीझन 1 माझ्यासाठी नेहमीच एक विशेष स्थान राखून ठेवेल कारण आर्चीच्या प्रवासात मी अनेक लोकांशी जोडले गेले आहे. ही व्यक्तिरेखा खरी असल्याने आपलीशी वाटते. दररोजच्या गोंधळाशी झुंज देताना स्वप्नाचा पाठलाग करते. सीझन 2 मध्ये, आम्ही थकवा, दबाव, आत्म-शंकेच्या वादळात खोलवर बुडी मारत संघर्षाच्या ठिणगीच्या जोरावर पुढे-पुढे जात राहतो. हे सीए विद्यार्थ्यांचे वास्तव आहे-दिवसागणिक ते उलगडून समोर येते आहे. हा सीझन सीए इच्छुकांना स्मरण करून देईल की ही लढाई एकट्याची नाही ही आशा मला वाटते.”
नीरज गोयलच्या भूमिकेत पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणारा ग्यानेंद्र त्रिपाठी म्हणाला: “नीरज त्याच्या अंतीम प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी स्वत:चे सर्वस्व पणाला लावतो. परंतु या सीझनमध्ये हे दिसून आले आहे की सर्वात दृढनिश्चयी लोकांना देखील भावनिक अडथळे आणि अनपेक्षित विचलित क्षणांना सामोरे जावे लागते. हे कथानक म्हणजे निव्वळ अभ्यासाचा विषय नव्हे, तर मैत्री, एकटेपणा, आत्म-शंका आणि प्रत्येक वेळी तुम्ही धडपडाल तेव्हा पुन्हा उठण्यासाठी लागणारे धैर्य कैद करायचे होते. मला विश्वास आहे की हा सीझन तीव्र वैयक्तिक संघर्ष केलेल्या कोणालाही आपलासा वाटेल.”
हाफ सीए सीझन 2 अमेझॉन एमएक्स प्लेयरवर 27 ऑगस्टपासून विनामूल्य स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल. तसेच एमएक्स प्लेयर अॅपद्वारे मोबाइल आणि कनेक्टेड टीव्हीवर, अमेझॉन शॉपिंग अॅप, प्राइम व्हिडिओ, गुगल टीव्ही, शाओमी टीव्ही, फायर टीव्ही आणि एअरटेल एक्सट्रीमवर उपलब्ध असेल.
ट्रेलर लिंक: https://www.youtube.com/watch?v=_X-pQpiY7iE
XXX


