Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाराष्ट्राच्या मोबिलिटी भविष्याला विद्युत गती: मॅटर एक्स्पिरियन्स हबचे महाराष्ट्रच्या माननीय उपमुख्यमंत्री श्री....

महाराष्ट्राच्या मोबिलिटी भविष्याला विद्युत गती: मॅटर एक्स्पिरियन्स हबचे महाराष्ट्रच्या माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या हस्ते पुण्यात उद्घाटन.

 

पुणे, 22 ऑगस्ट २०२५ – भारताच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी परिवर्तनाला वेग देणाऱ्या महत्त्वपूर्ण टप्प्याप्रमाणे, मॅटर, इलेक्ट्रिक वेहिकलआणि ऊर्जा-तंत्रज्ञान स्टार्टअप, ने पुण्यातील पहिले मॅटर एक्स्पिरियन्स हब सुरु केले. या प्रसंगी महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीने शोभा वाढवली आणि राज्याच्या स्वच्छ, कनेक्टेड आणि भविष्यातील वाहतुकीसाठीच्या प्रतिबद्धतेला बळ मिळाले.

हा टप्पा मॅटर च्या महाराष्ट्रातील प्रवासातील महत्त्वपूर्ण क्षण आहे — एक प्रगत राज्य जे औद्योगिक धोरणांसाठी आणि दूरदृष्टी ओळखले जाते. पुणे, राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि अभियांत्रिकी आणि इनोव्हेशन केंद्र, ह्या मॅटर डिझाईन हब आणि मॅटर लिंक च्या शहरात आता मॅटर एक्स्पिरियन्स हबची सुरुवात, पुणे मॅटरच्या संपूर्ण क्रिएशन इकोसिस्टमचे थेट ग्राहकांशी जोडणारे शहर बनले आहे — इनोव्हेशन, तंत्रज्ञान आणि एक्स्पिरियन्स यांचा एकत्रित प्रवास इथे सुरू होतो.

तंत्रज्ञान हे लोकांसाठी आणि पर्यावरणासाठी सहाय्यक असावे या विश्वासाने मॅटर ची स्थापना झाली. मॅटर चे ध्येय आहे भारत-केंद्रित, स्वतंत्र इ व्हि इकोसिस्टम तयार करणे — ज्यात ऊर्जा, मोबिलिटी आणि सॉफ्टवेअर इंटेलिजन्सचा समावेश आहे.

आजपर्यंत 370 हून अधिक पेटंट्स, पूर्णतः इन-हाऊस तंत्रज्ञान, आणि 900 हून अधिक अभियंते, डिझायनर्स आणि निर्माते यांच्यासह मॅटर एक अशा भविष्याचे निर्मिती करत आहे जिथे सस्टेनेबल मोबिलिटी ही पर्याय नसून, मूलभूत गरज असेल.

“मॅटर एक्स्पिरियन्स हब हे मोबिलिटीच्या भविष्याचे द्योतक आहे. पुणे शहर म्हणजे कला आणि कृती यांचा संगम आहे, आणि मॅटर एक्स्पिरियन्स इथे साकार होताना पाहून आम्हाला अभिमान वाटतो,” असे मॅटर चे संस्थापक व ग्रुप सीईओ श्री. मोहल लालभाई म्हणाले.

“माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे मॅटर एक्स्पिरियन्स हबचे उद्घाटन केल्याबद्दल आणि सस्टेनेबल मोबिलिटीसाठी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मन:पूर्वक आभार.”

 

श्री. अभिजीत सातव व श्री. अमरेश्वर चिखले , पार्टनर, गियर आणि थ्रोटल एल एल पी – मॅटर एक्स्पिरियन्स हब, पुणे, म्हणाले: “मॅटर ब्रँडची क्रांतिकारी एरा बाईक पुण्यात आणताना आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. पुणे शहर भारताच्या इ व्हि क्रांतीत आघाडी घेण्यासाठी सज्ज आहे. राज्याच्या धोरणात्मक पाठिंब्याने, प्रगत तंत्रज्ञानाने आणि लोकांच्या उत्साहाने हा प्रवास अधिक वेगाने होईल याचा आम्हाला विश्वास आहे.

माननीय उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे उद्घाटनासाठी उपस्थित राहून दिलेल्या प्रेरणेसाठी मनःपूर्वक आभार.”

 

परिचय घ्या क्रांतीचा: एरा – भारताची पहिली गिअरवाली इलेक्ट्रिक बाईक

अनुभव केंद्राच्या मध्यभागी आहे एरा – भारताची पहिली गिअरवाली इलेक्ट्रिक मोटरसायकल, जी पूर्णपणे भारतात डिझाइन, इंजिनियर आणि मॅन्युफॅक्चर केलेली गेली आहे, एरा ही पॉवर, कंट्रोल आणि कनेक्टिव्हिटी यांचा संगम आहे.

🔧 एरा ची मुख्य वैशिष्ट्ये:

हायपर शिफ्ट गियर सिस्टम– जगातील पहिली ४-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स इलेक्ट्रिक बाईकमध्ये

लिक्विड-कूल्ड पॉवरट्रेन – भारतीय हवामान व रस्त्यांसाठी योग्य

7” स्मार्ट टचस्क्रीन डॅशबोर्ड – नेव्हिगेशन, राइड डेटा, संगीत, OTA अपडेट्स

5kWh बॅटरी – 172 किमी प्रमाणित रेंज, IP67 रेटेड

त्वरित वेग – ०–४० किमी/ता. फक्त 2.8 सेकंदात

मॅटरव्हर्सअ‍ॅप – रिमोट कंट्रोल, जिओफेन्सिंग, राइड अ‍ॅनालिटिक्स

स्मार्ट की आणि कीलेस एंट्री

लाइफटाइम बॅटरी वॉरंटी – भारतात प्रथमच

एरा ही केवळ बाईक नाही – ती शहरी मोबिलिटीच्या भविष्याची एक प्लॅटफॉर्म आहे.

 

भविष्याचा अनुभव – आता पुण्यात

मॅटर एक्स्पिरियन्स हब हे एक उच्च-तंत्रज्ञानयुक्त, सहभागी अनुभवाचे स्थान आहे, जे प्रत्येक रायडरला इलेक्ट्रिक प्रवास जवळून अनुभवण्याची संधी देते. येथे आहेत:

मॅटर च्या कोर टेकचे थेट डेमो

स्वतंत्र टेस्ट रायड झोन

इंटरअ‍ॅक्टिव प्रॉडक्ट वॉकथ्रू

सर्व्हिस आणि आफ्टर-सेल्स सपोर्ट

खराडी, पुण्याच्या वेगाने वाढणाऱ्या नवोन्मेष कॉरिडॉरमध्ये स्थित हे केंद्र इ व्हि रायडर्स, आणि टेक प्रेमी साठी खुले आहे.

पुणे राइड करतं इलेक्ट्रिकवर. महाराष्ट्र देतो ऊर्जा भविष्याला.

पुण्यातील मॅटर एक्स्पिरियन्स हब आता सुरू झाले असून, नागरिक, रायडर्स, क्रिएटर्स आणि चेंजमेकर्स यांना २२ व्या शतकाच्या बाईकचा अनुभव घेण्यासाठी आणि एक स्वदेशी, स्वच्छ, इलेक्ट्रिक उद्याच्या प्रवासात सामी

ल होण्यासाठी मॅटरचे आमंत्रन.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments