पुणे । ऑगस्ट 22, 2025: ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआयएफ) या ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल)च्या सीएसआर शाखेने पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील 108 सरकारी शाळांमधील मुलांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली. एकूण 2.10 कोटी रूपयांच्या गुंतवणूकीसह H₂OPE या उपक्रमाद्वारे उत्तम सामुदायिक स्वास्थ्य, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण आणि शिक्षण हक्क कायदा (आरटीई), 2009 च्या कलम 19 द्वारे निर्देशित शाश्वत विकास ध्येयांमध्ये योगदान देण्याप्रती एचएमआयएफची कटिबद्धता दिसून येते. आरटीई 2009 च्या कलम 19 अंतर्गत शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे.
पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये अधिकृत हस्तांतरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी, जिल्हा परिषद, पुणेचे सीईओ श्री. गजानन पाटील, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंग गिल, ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेडचे फंक्शन हेड श्री. श्यामकुमार सिंह यांच्यासह जिल्हा परिषद शाळांमधील प्रतिनिधी आणि ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेडचे इतर अधिकारी उपस्थित होते
या प्रकल्पाअंतर्गत केलेल्या योगदानामुळे निवडक शाळा आणि आसपासच्या समुदायांमध्ये परिवर्तनात्मक बदल घडून आले आहेत. विद्यार्थी, शिक्षक, शालेय कर्मचारी आणि समुदायातील सदस्यांसह जवळपास 13,000 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभार्थींच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडून आला आहे. प्रकल्पाच्या सर्वांगीण दृष्टिकोनामुळे शालेय स्तरावर पिण्याच्या पाण्याच्या पायाभूत सुविधांमध्ये त्वरित आणि दीर्घकालीन सुधारणा झाल्या आहेत. या प्रयत्नांमुळे सकारात्मक परिणाम दिसून आले, जसे विद्यार्थ्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा, शाळेमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढणे, तसेच स्वच्छता पद्धतींचा मोठ्या प्रमाणात अवलंब आणि अधिक सर्वसमावेशक व सहाय्यक अध्ययन वातावरण निर्माण झाले आहे.
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करताना महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार म्हणाले, ”प्रत्येक मुलाला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध असणे ही फक्त गरज नाही तर त्यांचा अधिकार आहे.” ह्युंडाई मोटर इंडिया फाउंडेशनच्या या उदार योगदानामुळे मावळ तालुक्यामधील ग्रामीण सरकारी शाळांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि गुणवत्ता मोठ्या प्रमाणात वाढेल. या प्रशंसनीय उपक्रमामुळे मुलांना त्यांच्या आरोग्याबाबत चिंता न करता अभ्यास, खेळ आणि त्यांची स्वप्ने साकारण्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल.”
याप्रसंगी मत व्यक्त करताना श्री. पुनीत आनंद, एव्हीपी अँड व्हर्टिकल हेड, कॉर्पोरेट अफेयर्स, कॉर्पोरेट कम्युनिकेशन अँड सोशल, ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेड म्हणाले, ”मुले महाराष्ट्र व भारताचे भविष्य आहेत.” आमच्या H2OPE उपक्रमाच्या माध्यमातून आमचा प्रत्येक तरूण विचारवंताला पाण्यामार्फत होणारे आजार किंवा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अभाव अशा कोणत्याही समस्यांशिवाय विनाव्यत्यय शिक्षण उपलब्ध असण्याची खात्री घेण्याचा मनसुबा होता. या प्रकल्पामधून ह्युंडाईचा दृष्टिकोन ‘प्रोग्रेस फॉर ह्युमॅनिटी’ दिसून येतो, जेथे वृद्धी व स्वास्थ्य दोन्हीला प्राधान्य दिले जाते. ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशनमध्ये आमचे, आम्ही सेवा देत असलेल्या समुदायांवर परिवर्तनात्मक व दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्याचे ध्येय आहे.”
H₂OPE उपक्रमांतर्गत एचएमआयएफने 108 शाळांना खालील सुविधांसह सक्षम केले आहे:
· ISO प्रमाणित RO युनिट्स आणि वॉटर कूलर
· सहा-स्तरीय वॉटर स्टोरेज टाक्या
· पाण्याच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यासाठी TDS / pH मीटर
शाळेतील कर्मचाऱ्यांना जलशुद्धीकरण यंत्रणेचा वापर व देखभाल याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आणि आरोग्य शिक्षण व सर्जनशील अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला स्पर्धांसारख्या विद्यार्थ्यांच्या सहभागात्मक उपक्रमांसह स्वच्छतेसंबंधित जागरूकता सत्रे देखील आयोजित करण्यात आली.
हा उपक्रम केवळ पिण्याच्या पाण्याची यंत्रणा बसवण्यापुरता मर्यादितनसून विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी व अधिक समान भविष्य घडवण्यासाठी देखील आहे. अनेक मुलांसाठी, विशेषत: मुलींसाठी शाळेमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल, त्यांना अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल आणि ते अधिक आत्मविश्वासाने स्वत:च्या महत्त्वाकांक्षा साकारतील. अशा प्रभावी प्रकल्पांच्या माध्यमातून ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशन महाराष्ट्रातील तरूणांच्या सर्वांगीण विकासाप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत शिक्षण, आरोग्य आणि सामुदायिक स्वास्थ्यावर दीर्घकालीन प्रभाव निर्माण करत आहे.


