पुणे (दि. २५ ऑगस्ट) : राजगड गृहनिर्माण सहकारी सोसायटी, हडपसर पुणे येथील संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक शनिवार २३ ऑगस्ट रोजी शांततेत व उत्साहात पार पडली. सोसायटीच्या नव्या संचालक मंडळासाठी ही निवडणूक आयोजित करण्यात आली होती, ज्यात सोसायटी मधील रहिवाशी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपला मतदानाचा हक्क बजावला.
निवडणूक प्रक्रिया सकाळी ९ वाजता सुरू होऊन दु. ३ वाजेपर्यंत सुरू होती. यामध्ये एकूण ३४० सदस्यांपैकी १९५ सदस्यांनी मतदान केले.
यावेळी एकूण २७ उमेदवारांनी संचालक मंडळासाठी अर्ज भरले होते, त्यापैकी १७ उमेदवार निवडून आले. नवीन संचालक मंडळाच्या निवडीनंतर सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. निवडून आलेल्या सर्व संचालक मंडळाचे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. सर्व निवडून आलेल्या सदस्यांनी सोसायटीच्या विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
नवनिर्वाचित सदस्यामध्ये – श्रीपाद जोशी, बालाजी कांबळे, सिद्धार्थ सिध्दुल, अतुल पाटील, शेख रज्जाक, चंद्रकांत जावळे, नीलम शिर्के, उषा चौधरी, जयश्री माळवदकर, छाया टेकवडे, पार्वती कुर्मे, सुर्यकांत भोसले, नरेंद्र अहिरे, दीपक मोरे, जान्हवी भोकरे, सूर्यवंशी सुजाता यांचा समावेश आहे.
या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. यशपाल मखरे यांनी जबाबदारी सांभाळली. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि नियमबद्ध रितीने पार पडल्याबद्दल सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे.


