Friday, September 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedआपले सरकार सेवा केंद्राकरिता महाविद्यालयाने अर्ज सादर करावे-निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम

आपले सरकार सेवा केंद्राकरिता महाविद्यालयाने अर्ज सादर करावे-निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम

पुणे, दि.२९ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) :- सर्व महाविद्यालयांना आपल्या महाविद्यालयात आपले सरकार सेवा केंद्रा स्थापन करण्याकरिता २० सप्टेंबर अखेर विहित नमुन्यात अर्ज सादर करावे, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली.

 

 

 

जिल्ह्यातील महाविद्यालयात आपले सरकार सेवा केंद्र स्थापनेबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कार्याशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार श्वेता पवार, उच्च शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक यांच्यासह जिल्ह्यातील एकूण २१६ महाविद्यालयांनी उपस्थित होते.

 

 

 

या कार्यशाळेत आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी महाविद्यालयांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला असून आज सुमारे दहा ते पंधरा महाविद्यालयांचे अर्ज प्राथमिक स्वरूपात प्राप्त झालेले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments