Friday, September 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहानुभाव पंथ:१६५० तीर्थस्थानांपैकी २५० स्थानांचा जीर्णोद्धार पूर्ण 

महानुभाव पंथ:१६५० तीर्थस्थानांपैकी २५० स्थानांचा जीर्णोद्धार पूर्ण 

 

 

महानुभव पंथाच्या तीर्थस्थान जिर्णोद्धाराचे कार्य हाती घेतल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र भगवान श्री चक्रधरस्वामी यांच्या कृपेने तसेच दानशूर सद्भक्त यांच्या सहकार्याने, पंथातील संत महंतांच्या मार्गदर्शनामुळे महानुभाव पंथाच्या देशभरातील एकूण

१६५० तीर्थस्थानांपैकी २५० पेक्षा अधिक स्थानांच्या जीर्णोद्धाराचे कार्य पूर्ण होऊ झाले असून हे कार्य सुरूच राहील ‘ अशी माहिती महंत कापूसतळणीकर बाबा यांनी

दिली.ते अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या सहकार्याने व नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने आयोजित भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती महोत्सव कार्यक्रमात बोलत होते.

 

यानंतर आयोजित धर्मसभेत अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे महामंत्री महंत कापूसतळणीकर बाबा , महंत मुधोव्यास बाबा शास्त्री, भागवताचार्य महंत चिरडे बाबा , महंत तळेगावकर बाबा शास्त्री, महंत कृष्णराज बाबा पंजाबी ,महंत परमपूज्य आत्याबाईची ,

माजी आमदार बाळासाहेब सानप या सर्वांनी

आपापल्या भाषणातून

भगवान श्री चक्रधर स्वामी यांचे कार्य आणि तत्वद्न्यान हे आजच्या काळात समाजासाठी किती उपयुक्त आहे, हे सांगितले.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष महंत सुकणेकर बाबा यांनी अध्यक्षीय समारोप केला.

 

याप्रसंगी “स्थानजिर्णोद्धार” यासह विविध ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले. आभार प्रदर्शन महंत गोपीराज शास्त्री सुकणेकर यांनी केले.

 

कार्यक्रमास विविध संत,महंत,

भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments