Friday, September 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे पुस्तक महोत्सवाच्या पहिल्या 'हेरिटेज वॉक'ला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

पुणे पुस्तक महोत्सवाच्या पहिल्या ‘हेरिटेज वॉक’ला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

 

पुणे: साहित्य आणि संस्कृतीच्या माध्यमातून पुणे शहराचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी, पुणे पुस्तक महोत्सवाने गणेशोत्सवाचे औचित्य साधून आपल्या पहिल्या ‘हेरिटेज वॉक’चे यशस्वी आयोजन केले. शनिवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी सोमवार पेठेतील ऐतिहासिक त्रिशुंड गणपती मंदिराच्या परिसरात आयोजित या उपक्रमात १०० हून अधिक नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते.

इतिहास अभ्यासक अमोघ वैद्य यांनी उपस्थितांना मंदिराच्या समृद्ध इतिहासाची माहिती दिली. मंदिराची अद्वितीय शिल्पकला, पेशवेकालीन महत्त्व आणि शहरातील इतर ऐतिहासिक स्थळांशी असलेले त्याचे नाते यांसारख्या अनेक पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला. गणेशोत्सवाच्या या काळात बाप्पाच्या दर्शनासोबतच शहराच्या इतिहासाला जाणून घेण्याची संधी मिळाल्याने सहभागी नागरिकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

यावेळी बोलताना पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक, राजेश पांडे म्हणाले, “आमच्या पहिल्याच हेरिटेज वॉकला मिळालेला हा प्रतिसाद खरोखरच प्रेरणादायी आहे. पुणेकरांनी दाखवलेल्या उत्साहामुळेच आम्ही आता दर महिन्याला दोन असे हेरिटेज वॉक आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून आम्ही शहराच्या समृद्ध इतिहासाची ओळख करून देण्याचा प्रयत्न करू.”

या यशस्वी उपक्रमामुळे पुणे पुस्तक महोत्सवाने केवळ साहित्यिक चळवळच नाही, तर शहराच्या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासाठीही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments