Friday, September 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedउत्सव हेरिटेज सिटीज पुणे एडिशनचे उद्घाटन

उत्सव हेरिटेज सिटीज पुणे एडिशनचे उद्घाटन

सतीश मिसाळ एज्युकेशन फाउंडेशन्स, ब्रिक्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आयोजित, तसेच पुणे महानगरपालिका व पुणे मेट्रो यांच्या सहकार्याने संपन्न होत असलेल्या “उत्सव हेरिटेज सिटीज सिरीज 2025, पुणे एडिशन” या कार्यक्रमाचे आज नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा पूजा मिसाळ, संचालक करण मिसाळ, मुख्याध्यापिका श्रीमती पूर्वा केसकर, मेट्रोचे संचालक श्री. माने, ब्रिक संस्थेचे वरिष्ठ अधिकारी शिक्षक सोबतच भारतीय जनता पार्टीचे अनेक सन्माननीय नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे शहरातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या वास्तु आणि उत्सव या दोन्हीचा सुंदर मिलाफ देशभर पोहोचवण्याचा उत्सव या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमांतर्गत हेरिटेज वॉक, स्केचिंग, नॅशनल कॉन्फरन्स, किर्तन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

या कार्यक्रमानिमित्त संस्थेने जनजागृतीसाठी तयार केलेले लघुपट प्रदर्शित करण्यात आले. कै. वस्ताद शेखचंद नाईक तालीम मित्र मंडळ शुक्रवार पेठ येथे संस्थेतर्फे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पथनाट्य देखील सादर केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments