Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहा वितरणला सक्तीने वीज बिल वसुली करता येणार नाही.! विठ्ठल राजे पवार*

महा वितरणला सक्तीने वीज बिल वसुली करता येणार नाही.! विठ्ठल राजे पवार*

*

*पुणे/औरंगाबाद.*
*दिनांक १८ फेब्रुवारी २०२४.*
शेती साठी कृषि पंपाला अखंडीत विना कटकट वीज पुरवठा करावा असे स्पष्ट आदेश राज्य अन्न सुरक्षा आयोग व उच्च न्यायालय यांनी राज्य सरकार व महावितरणला दिलेले आहेत, *त्या आदेशाचे पालन महावितरण कंपनीने करावे अन्यथा महावितरण कंपनीच्या विरुद्ध FIR अवमान याचिका दाखल करावी लागेल असा स्पष्ट इशारा निवेदन,* शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी महावितरणला दिला आहे.

छत्रपतीसंभाजी नगर असो अथवा राज्यात कुठेही महावितरण पारेशन distribusian कंपनी ला कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करता येणार नाही या बाबत महावितरणने याद राखवी असा इशारा संघटनेने दिला आहे. तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी कष्टकरी कामगार सर्व सामान्य नागरिकांवर जोर जबरदस्ती व सक्तीची वीजबिल वसूली करता येणार नाही, या माननीय न्यायालयाचे आदेशाचे पालन करावे अन्यथा महावितरण कंपनीच्या विरुद्ध FIR अवमान याचिका दाखल करावी लागेल. असे इशारा निवेदन सरकार महावितरण ला देण्यात आले आहे याची नोंद घ्यावी असे म्हंटले आहे. महावितरणने शेतीचा विद्युत पुरवठा खंडित केल्यास व न्यायालयाचे आदेशाचे पालन न केल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ तहशिलदर, पोलिसांकडे शेती पिकांचे आर्थिक नुकसान, ग्राहकाचा मानसिक छळ, शक्तीची वसुली बाबत लेखी तक्रार दाखल करावी व पोहाच घ्यावी त्याची PDF file प्रत संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी याचे कडे तक्रार दाखल करवी, असे आवाहन विठ्ठल राजे पवार यांनी केले आहे.

विठ्ठल राजे पवार (जनहित याचिका कर्ते.)
अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य.
8805401314./9422517044.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments