Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय संस्कृती संवर्धक संस्था व कसबा भाग यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी...

भारतीय संस्कृती संवर्धक संस्था व कसबा भाग यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी ८० वा स्वातंत्र्य दिन मोतीबाग येथे उत्साहात साजरा.* 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

पुणे
(प्रतिनिधी)
भारतीय संस्कृती संवर्धक संस्था व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,कसबा भाग यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात व उत्साहात साजरा झाला.
संस्थेच्या शनिवार पेठ येथील मोतीबाग कार्यालयात १५ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ८.०० वा माजी सनदी अधिकारी डाॅ. वामन पारखी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर
पश्चिम प्रांत संघचालक नाना जाधव – पश्चिम महाराष्ट्र प्रांत,कसबा भागाचे संघचालक ॲड. प्रशांतजी यादव आणि भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना डाॅ.पारखी यांनी गेल्या ८० वर्षातील आर्थिक बदलांचा व सध्याच्या बदललेल्या भारतीय विकासाचा,प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या आम्ही बि – घडलो, तुम्ही बि – घडाना,
विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, तुका
बि- घडला विठ्ठलाची झाला या उक्तीचा संदर्भ देऊन डाॅ. पारखी यांनी सर्वांनी तुकाराम महाराजांप्रमाणे विठूमाऊली रुपी भारत मातेच्या प्रगती साठी स्वतः बि- घडण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना मा. भय्याजी जोशी यांनी भारत हा अनादी आहे,अनंत आहे व अवध्य आहे असे प्रतिपादन केले.
विशेषत्वाने या कार्यक्रमास दादरा नगर हवेली च्या मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिक अरविंद मनोलकर हे वयाच्या ९५ वर्षीही उत्साहाने उपस्थित होते.
तसेच रा. स्व. संघाच्या पश्चिम क्षेत्राचे संपर्क प्रमुख कैलास सोनटक्के,व
अयोध्या राम जन्म भूमी ट्रस्टचे नवनिर्वाचित सचिव जगदीश आफळे,संस्थेचे विश्वस्त प्रसाद खेडकर,किरण गांधी,प्रकाश आठवले,बाजीराव मणेरे,राजेंद्र वालेकर प्रांत प्रचारक अण्णा वाळिंबे,महानगर प्रचारक रोहित रिसबूड,प्रांत कार्यालय सह प्रमुख प्रतिकपरळीकर,मा.संघचालक शरदराव चंद्रचूड- मोतीबागनगर,
कसबाभाग कार्यवाह राहूल पुंडे, मोतीबाग नगर कार्यवाह प्रमोद वसगडेकर ह्यांची उपस्थिती होती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे विश्वस्त उदय पंचपोर यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी यांनी केले.
पूर्वांचलातील आठ विद्यार्थिनींनी आपल्या पारंपरिक वेशात संपूर्ण वंदेमातरम सादर करुन कार्यक्रमाची उंची वाढवली.
या कार्यक्रमात एकता मासिकाच्या *” पश्चिम बंगाल “* विशेषांकाचे भय्याजी जोशी व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यातआले.या वेळी व्यासपीठावर संपादिका सौ. रुपाली भुसारी उपस्थित होत्या

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments