Thursday, September 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूलाचे उद्घाटन ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूलाचे उद्घाटन _नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रयत्नाने सिंहगड रस्त्यावरील नागरिकांना दिलासा

 

पुणे, प्रतिनिधी _

 

पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेल्या दुहेरी उड्डाणपूल प्रकल्पाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री यांनी कोनशिला अनावरण करत,वाहनातून प्रत्यक्ष पुलावरून जाऊन पाहणी केली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रयत्नाने सिंहगड रस्त्यावरील नागरिकांना वाहतूक कोंडी मधून आता दिलासा मिळाला आहे.

यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,उपसभापती विधानपरिषद डॉ.नीलम गोऱ्हे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,आमदार भीमराव तापकीर, आमदार योगेश टिळेकर, आमदार सुनील कांबळे, आमदार बापू पठारे, मनपा आयुक्त नवल किशोर राम, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार,भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी नगरसेवक दीपक मिसाळ, श्रीनाथ भिमाले, करण मिसाळ, पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर,अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमास नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

 

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, पुणे हे महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणारे शहर असून लोकसंख्या आणि वाहनसंख्या झपाट्याने वाढत आहे. सिंहगड रस्ता परिसरात वाहतुकीचा ताण प्रचंड असतो. त्यामुळे सप्टेंबर २०२१ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या उड्डाण पुलाचे कामाचे भूमिपूजन केले होते. फनटाईम थिएटर ते विठ्ठलवाडी या दरम्यान सुमारे २.५ किमीचा पुण्यातील सर्वात लांब उड्डाणपूल निर्माण झाला याचा आनंद आहे. या कामासाठी एकूण ११८ कोटी रुपये खर्च आला आहे. नियोजित वेळेपेक्षा सहा महिने आधी पूर्ण तयार झालेला आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांना आता हा प्रवास अधिक सोपा, जलद आणि सुलभ होणार आहे. सिंहगड रस्ता परिसरातील दीर्घकाळाची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरेल.

 

 

*प्रमुख टप्पे*

 

– प्रथम टप्पा (१५ ऑगस्ट, २०२४): राजाराम पूल चौकातील ५२० मी. लांबीचा उड्डाणपूल (खर्च १५ कोटी).

– दुसरा टप्पा (१ मे, २०२५): विठ्ठलवाडी ते फनटाईम, २.१ किमी लांबीचा पूल (खर्च ६१ कोटी).

– तिसरा टप्पा (१ सप्टेंबर, २०२५): गोयल गंगा चौक ते इनामदार चौक, १.५४ किमी लांबीचा पूल (खर्च ४२ कोटी).

 

*वाहतुकीची कोंडी होणार कमी*

 

– दररोज हजारो प्रवासी, शालेय बस, व्यवसायिक वाहने आणि सार्वजनिक वाहतूक साधनांचा प्रवास अधिक सुकर.

– सिंहगड रस्त्यावरील प्रमुख चौक विना-अडथळा पार करण्याची सुविधा.

– नागरिकांचा दररोज १५ ते २५ मिनिटांचा प्रवास वेळ वाचणार.

– सिंहगड रस्ता, धायरी, नन्हे, खडकवासला, वडगाव बुद्रुक, नांदेड सिटी, तसेच बेंगळुरू–मुंबई राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होणार.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments