पुणे, दि. 2: (जिमाका वृत्तसेवा) : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या 26 ऑगस्ट 2021 रोजीच्या अधिसूचनेनुसार भारत (बीएच) मालिकेमध्ये नोंदणीकृत वाहनांचा कर वेळेत भरुन वाहनमालकांनी दंड टाळावा,असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी केले आहे.
भारत (बीएच) मालिकेमध्ये वाहने नोंदणीकृत करण्यासाठी दोन वर्षांसाठी घेतला जातो. तसेच वाहनांचा कर वैध असल्याच्या कालावधीचा शेवटचा दिवस पूर्ण झाल्याच्या 7 दिवसानंतर प्रतिदिन 100 रुपये इतका दंड आकारला आकारण्यात येणार आहे, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये श्री. भोसले यांनी कळविले आहे.
0000


