Tuesday, September 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedमगरपट्टा सिटी गणेशोत्सवात अवयवदानाबाबत जनजागृती

मगरपट्टा सिटी गणेशोत्सवात अवयवदानाबाबत जनजागृती

पुणे,3 सप्टेंबर 2025 : अवयवदानाबाबत जनजागृती करण्याचा आपल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर ने मगरपट्टा सिटी येथील गणेशोत्सवात सहभागी होऊन एक माहितीपूर्ण कार्यक्रम आयोजित केला.यामध्ये नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे समूह कार्यकारी अधिकारी डॉ.संजय पठारे यांनी अवयवदानाबाबतचे मिथक आणि तथ्ये या विषयावर मार्गदर्शन केले.यात 500 हून अधिक नागरिकांनी भाग घेतला.डॉ.पठारे यांनी अवयवदानाबाबत असलेल्या गैरसमजूती दूर करत अवयवदानाचा प्राप्तकर्त्यांवर होणारा जीवनदायी परिणाम याबाबत माहिती दिली.

 

या सत्राबरोबरच नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरच्या परिचारिकांच्या माईम या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सादरीकरणाद्वारे अवयवदानाचे भावनिक आणि सामाजिक महत्त्व सांगण्यात आले.मगरपट्टातील रहिवाश्यांच्या कल्याणाकरिता नोबल हॉस्पिटल्स तर्फे 12 विशेष आरोग्य शिबिरांची घोषणा करण्यात आली. या शिबिरांमध्ये हृदय,स्तन आरोग्य,गुडघे आणि मणक्याच्या समस्या,आयव्हीएफ,हर्निया,मधुमेह,युरोलॉजी,अस्थमा, मौखिक आरोग्य,फिजिओथेरपी,मुत्रपिंड आरोग्य आणि पोटांचे आरोग्य यावर लक्ष केंद्रित केले जाईल.प्रतिबंधात्मक आरोग्य आणि लवकर निदान होण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्यासाठी सहभागींना मोफत हेल्थ कूपन्स वाटण्यात आले.

 

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की,हा उपक्रम म्हणजे सांस्कृतिक उत्सव आणि सामाजिक जबाबदारी याचा उत्तम मिलाफ होता.ज्ञान,करूणा आणि समुदाय केंद्रित आरोग्य सेवेचे महत्त्व याद्वारे अधोरेखित करण्यात आले.आरोग्य आणि कल्याणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विविध उपक्रमांसाठी आम्ही नेहमीच आमचे शेजारी असलेल्या मगरपट्टाशी सहयोग केला आहे.

 

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने म्हणाले की, नागरिकांचे आरोग्य जपणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे.अवयवदान आणि त्याचे समाजाला होणारे फायदे याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा हा आणखी एक प्रयत्न

आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments