Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedअॅमेझॉन एमएक्स प्लेयर आणि सीजे इएनएम’तर्फे लोकप्रिय 18 के-ड्रामा खासकरून भारताच्या एव्हीओडी...

अॅमेझॉन एमएक्स प्लेयर आणि सीजे इएनएम’तर्फे लोकप्रिय 18 के-ड्रामा खासकरून भारताच्या एव्हीओडी क्षेत्रात प्रीमियरकरिता परवाना करारावर स्वाक्षऱ्या

8 सप्टेंबरपासून, जागतिक स्तरावर प्रेक्षक पसंतीला उतरलेला 18 के-ड्रामा केवळ अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर विनामूल्य स्ट्रीम होणार ~

 

अॅमेझॉन एमएक्स प्लेयर, अॅमेझॉनची विनामूल्य स्ट्रीमिंग सेवा लीडिंग एंटरटेनमेंट कंपनी सीजे ईएनएमसह विशेष कंटेंट भागीदारीसह जागतिक मनोरंजन पोर्टफोलिओचा विस्तार करीत आहे. अॅमेझॉनने एमएक्स प्लेयरचे अधिग्रहण केल्यानंतर सीजे ईएनएम आणि अॅमेझॉन एमएक्स प्लेयर यांच्यातील भारतातील हा पहिला अधिकृत कंटेंट पॅकेज करार आहे.

 

नवीन करारामध्ये सीजे ईएनएमच्या 18 के-ड्रामा मालिकांचा समावेश आहे- ज्यापैकी अनेकांना जागतिक बाजारपेठेत आधीच यश मिळाले आहे. आता भारतीय प्रेक्षकांसाठी हे उपलब्ध केले जातील. स्थानिक प्रेक्षकांशी अधिक सखोलपणे जोडले जाण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, ही नाटकं हिंदी, तमीळ आणि तेलगू भाषेत डब केली जातील. जी स्ट्रीमिंगसाठी पूर्णपणे विनामूल्य असतील.

 

या पॅकेजचे नेतृत्व करणारी लवली रनर ही अलीकडील मालिका आहे. या मालिकेत के-पॉप रोमान्स दिसेल. दिनांक 8 सप्टेंबर रोजी मालिका प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर, ‘माय लवली लायर’,’ ट्विंक्लिंग वॉटरमेलन’, ‘वेडिंग इम्पॉसिबल’ आणि ‘डिलाइटफुली डिसिटफुल’ यासारख्या चाहत्यांच्या आवडत्या रोमान्स टायटल्सचे मिश्रण 8 सप्टेंबर 2025 पासून हळूहळू चार तिमाहींमध्ये प्रदर्शित केले जाईल. यापूर्वीच दर्जेदार ठरलेल्या या टायटल्ससह, अॅमेझॉन एमएक्स प्लेअरचे उद्दिष्ट भारताच्या वाढत्या के-ड्रामा कम्युनिटीला आकर्षित करणे आणि जागतिक स्तरावर आवडणाऱ्या कथा भारतात विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे आहे.

 

ही भागीदारी विशेषतः अर्थपूर्ण आहे. कारण ती केवळ सीजे ईएनएम आणि अॅमेझॉन एमएक्स प्लेयर यांच्यातील सखोल संबंधांचे संकेत देत नाही तर स्थानिक कंटेंट धोरणांद्वारे भारतीय प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याच्या अॅमेझॉन एमएक्स प्लेयरच्या धोरणातील एक नवीन टप्पा देखील दर्शवते.

 

या भागीदारीवर भाष्य करताना, अॅमेझॉन एमएक्स प्लेयरचे डायरेक्टर आणि हेड ऑफ कंटेंट अमोघ दुसाद म्हणाले, “जागतिक कंटेंटची, विशेषतः कोरियन ड्रामाची मागणी भारतात झपाट्याने वाढली आहे. या भागीदारीद्वारे, आम्ही एव्हीओडी’वर भारतीय प्रेक्षकांसाठी अलीकडील ब्लॉकबस्टर सिनेमांसह 18 उत्कृष्ट के-ड्रामा आणत आहोत. त्यापैकी बरेच प्रथमच आहेत. आंतरराष्ट्रीय कथा आता स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध असल्याने, हे आकर्षक कार्यक्रम प्रेक्षकांना पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

 

सीजे ईएनएम येथील इंटरनॅशनल बिझनेस डिपार्टमेंटचे व्हीपी सेबॅस्टियन किम म्हणाले, “आम्ही जगभरातील नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असल्याने हे प्रक्षेपण खूप अर्थपूर्ण आहे.” ते पुढे म्हणाले, “या कार्यक्रमांनी कथा, कलाकार आणि निर्मितीमध्ये त्यांची ताकद आधीच सिद्ध केली आहे आणि ते अॅमेझॉन एमएक्स प्लेअरसह आमच्या नवीन भागीदारीद्वारे भारतीय प्रेक्षकांशी दृढपणे जोडले जातील याचा मला विश्वास आहे.”

 

सर्व कोरियन नाटके केवळ अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर विनामूल्य स्ट्रीम केली जातील. ही नाटकं मोबाईल आणि कनेक्टेड टीव्हीवरील एमएक्स प्लेयर अॅपद्वारे, अॅमेझॉन शॉपिंग अॅप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही आणि एअरटेल एक्सट्रीमवर उपलब्ध असतील.

 

Link: https://www.youtube.com/watc

h?v=ZQVwv0XVmWU

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments