Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedगृहिणीचा त्याग बनला धोकादायक खेळ, पाहा ‘रिश्तों का चक्रव्यूह’, आता हंगामा ओटीटीवर

गृहिणीचा त्याग बनला धोकादायक खेळ, पाहा ‘रिश्तों का चक्रव्यूह’, आता हंगामा ओटीटीवर

यामध्ये गुलकी जोशी, नविना बोले, साकिब अयूब, शोइब निकाश शाह, राहुल सुधीर आणि रहात शाह काझमी यांसारख्या उत्कृष्ट कलाकारांचा समावेश आहे

मुंबई, 5 सप्टेंबर 2025: भारतामधील आघाडीच्या डिजिटल एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या हंगामा ओटीटीने 4 सप्टेंबर 2025 रोजी आपला नवा क्राइम थ्रिलर ‘रिश्तों का चक्रव्यूह’ प्रदर्शित केला आहे. ही कहाणी धैर्य, जिद्द आणि सबलीकरणावर आधारित आहे. यात गुलकी जोशी मालतीची भूमिका साकारत आहे. तिच्यासोबत नविना बोले, साकिब अयूब, शोइब निकाश शाह, राहुल सुधीर आणि रहात शाह काझमी यांसारखे दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा शो रहस्य, फसवणूक आणि जगण्यासाठीच्या संघर्षाची दमदार कथा मांडतो.

इंदौरच्या अरुंद गल्ल्यांपासून मुंबईच्या झगमगाटापर्यंत, ‘रिश्तों का चक्रव्यूह’ ही प्रेम, फसवणूक आणि सूडाच्या गुंतागुंतीची गोष्ट आहे. ही गोष्ट एका साध्या गृहिणीची आहे, जी आपल्या तुरुंगात असलेल्या नवऱ्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करते आणि त्यातून तिच्या आयुष्यात मोठा बदल घडतो. यासाठी ती एका धाडसी आणि आकर्षक स्त्रीचं रूप घेऊन कपट आणि धोक्यांनी भरलेल्या जगात प्रवेश करते. सुरुवातीला तिचं पाऊल त्यागासाठी असते, पण हळूहळू ते सत्तेच्या, स्वार्थाच्या आणि कारस्थानांच्या खेळात बदलते. या प्रवासात नाती आणि विश्वास तुटून विखुरले जातात.

लाँचवेळी हंगामा डिजिटल मीडियाचे सीईओ सिद्धार्थ रॉय म्हणाले, “आम्हाला अभिमान आहे की आम्ही आमचा नवीन शो ‘रिश्तों का चक्रव्यूह’ सादर करत आहोत. हा फक्त क्राइम किंवा थ्रिलर शो नाही, तर धैर्य, जिद्द आणि सबलीकरणाची कहाणी आहे. गुलकी जोशी आणि दमदार कलाकारांच्या टीमसह हा शो रहस्य, फसवणूक आणि जगण्यासाठीचा संघर्ष अशा पद्धतीने दाखवतो की तो थरारक आणि अविस्मरणीय आहे.”

मालतीची भूमिका साकारताना आपल्या अनुभवाबद्दल बोलताना गुलकी जोशी म्हणाली, “मालतीची भूमिका साकारणे माझ्यासाठी खूप खास अनुभव होता. ती कठीण परिस्थितीतही हार मानत नाही. नवऱ्याला वाचवण्यासाठी तिचे निर्णय वेदना, निष्ठा आणि जिद्दीने भरलेले आहेत, अगदी नियम तोडावे लागले तरीही. तिची भूमिका करताना मला कमजोरी आणि ताकद दोन्ही अनुभवायला मिळाले, आणि मला आशा आहे की प्रेक्षक तिच्या संघर्षाशी मनापासून जोडले जातील.”

नविना बोले, जी मोनिका ची भूमिका साकारत आहे, ती म्हणाली, “मोनिका माझ्या आतापर्यंत केलेल्या कोणत्याही भूमिकेसारखी नाही — ती हुशार, नाट्यमय आणि नेहमी एक पाऊल पुढे राहणारी स्त्री आहे. तिचे वेगवेगळे पैलू समजून घेणे खूप रोमांचक होतं, आणि मला उत्सुकता आहे की प्रेक्षक तिच्यामुळे कथेत होणारे बदल नक्कीच पाहतील.”

राहुल सुधीर, जो हसमुख मेहता ची भूमिका साकारत आहे, तो म्हणाला,‘रिश्तों का चक्रव्यूह’ प्रेक्षकांना दाखवतो की रहस्यं अगदी मजबूत नातेसंबंधांनाही हादरवू शकतात. हसमुख म्हणून मी एका निर्दयी आणि महत्त्वाकांक्षी बिझनेसमनची भूमिका केली आहे, जो आपले साम्राज्य वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. यासाठी मला माफियाच्या निष्ठा आणि फसवणुकीच्या धोकादायक दुनियेत शिरावे लागले. या भूमिकेमुळे मला गँगस्टरच्या काळ्या आणि गुंतागुंतीच्या बाजूचा शोध घ्यायला मिळाला.”

शोइब निकाश शाह, जो मालतीचा नवरा ‘रवि’ची भूमिका साकारत आहे, तो म्हणाला, “सेटवरचा प्रत्येक दिवस माझ्यासाठी बदल घडवणारा अनुभव होता. रविचा प्रवास हा निवडी आणि त्यांचे परिणाम याबद्दल आहे. तो फक्त नवरा नाही, तर तो त्या अडचणी दाखवतो ज्या अनेक लोक त्यांच्या आयुष्यात अनुभवतात. ही खरी भावना पडद्यावर आणणे अवघड होते, पण टीमच्या उत्साहामुळे ते शक्य झाले. मला विश्वास आहे की प्रेक्षक त्याच्या संघर्षाशी नक्की जोडले जातील.”

साकिब अयूब, जो हिरन मेहता ची भूमिका साकारत आहे, तो म्हणाला, “हिरनची भूमिका करणे माझ्यासाठी रोमांचक आणि आव्हानात्मक दोन्ही होते. हिरन हा निष्ठा आणि ओळख यांच्या मधे अडकलेला पात्र आहे. त्याच्या प्रवासातील गुंतागुंत माझ्यासाठी अभिनेता म्हणून खूप समृद्ध अनुभव ठरली.”

रहात शाह काझमी, जो एका पोलीस ऑफिसरची भूमिका साकारत आहे, तो म्हणाला, “रिश्तों का चक्रव्यूह’ चा भाग होणे माझ्यासाठी समाधानकारक अनुभव होता. या शोमधल्या गुंतागुंतीच्या भूमिकेमुळे मला माझ्या अभिनयात वास्तव आणि प्रामाणिकपणा आणण्याचे आव्हान दिले. माझे पात्र, मिस्टर रॉय, खूपच हिशोबी आहे आणि स्वतःच्या फायद्यासाठी नियम मोडतो. त्या नैतिकदृष्ट्या धूसर भागात काम करणे खूप रोमांचक होते. मला विश्वास आहे की प्रेक्षक त्याच्या अनपेक्षित स्वभावाचा आणि तीक्ष्णतेचा नक्की आनंद घेतील.”

हा थरारक क्राइम थ्रिलर ‘रिश्तों का चक्रव्यूह’आता हंगामा ओटीटीवर आणि टाटा प्ले बिंज, वॉचो, बीएसएनएल, प्लेबॉक्सटीव्ही, रेलवायर ब्रॉडबँड, एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले आणि डॉर टीव्ही यांसारख्या पार्टनर प्लॅटफॉर्म्सवर पाहा.

ॲप लिंक: https://hungamai.onelink.me/w2v3/H

ungamaOTT

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments